मराठी बातम्या /बातम्या /heatlh /राहुल गांधींच्या फिटनेसच रहस्य 'मखाणा' तुमच्यासाठी किती फायदेशीर? जाणून घ्या

राहुल गांधींच्या फिटनेसच रहस्य 'मखाणा' तुमच्यासाठी किती फायदेशीर? जाणून घ्या

मखाणा खाण्याचे फायदे

मखाणा खाण्याचे फायदे

राहुल गांधी यांनी गेले पाच महिने ‘भारत जोडो’ ही पदयात्रा केली आहे. देशातील 12 राज्यांत पायी फिरून त्यांनी जनतेशी संवाद साधला. या यात्रेदरम्यान मखाणा खाल्ल्याने आपल्याला फायदा झाल्याचं राहुल गांधी यांनी म्हटलं आहे.

  • Trending Desk
  • Last Updated :
  • Delhi, India

    नवी दिल्ली, 30 जानेवारी : काँग्रेसचे माजी अध्यक्ष  राहुल गांधी यांनी गेले पाच महिने ‘भारत जोडो’ ही पदयात्रा केली आहे. देशातील 12 राज्यांत पायी फिरून त्यांनी जनतेशी संवाद साधला. या यात्रेदरम्यान मखाणा खाल्ल्याने आपल्याला फायदा झाल्याचं राहुल गांधी यांनी जाहीरपणे सांगितलं होतं. त्यापूर्वीही त्यांनी जाहीरपणे पॉपकॉर्नऐवजी बिहारमधील मखाणा लोकप्रिय करण्याचं आवाहन केलं होतं. राहुल यांना आरोग्यासाठी फलदायी ठरणारा मखाणा तुमच्या-आमच्यासाठी किती फायदेशीर आहे हे जाणून घेऊयात.

    भारतात कायमच उपासाला खाल्ल्या जाणाऱ्या मखाण्याला फॉक्स नट्स किंवा कमळाच्या बियाही म्हटलं जातं. उपवासाला मखाणा खाण्याचं प्रमुख कारण म्हणजे तो कोरडा भाजून खाल्ला जातो तसंच त्यात कॅलरी कमी असतात आणि त्याचा ग्लायसेमिक इंडेक्सही कमी असतो. तसंच मखाणा खाल्ला की पोट भरल्यासारखं वाटतं. मखाण्यात प्रोटिन आणि फायबरचं प्रमाण भरपूर असतं. त्याचबरोबर आपल्या शरीराला दैनंदिन आहारातून जी पोषकद्रव्य हवी असतात जसं की कॅल्शियम, पोटॅशियम आणि मॅग्नेशियम यांचंही प्रमाण मखाण्यात भरपूर असतं. मखाण्यात थोडंसं व्हिटॅमिन बी पण असतं.

    100 ग्रॅम मखाण्यामध्ये किती कॅलरीज 

    100 ग्रॅमच्या कपातील मखाण्यामध्ये साधारणपणे 350 कॅलरीज, 60 mg कॅल्शियम, 9.7 gm प्रोटिन, 0.1 gm फॅट्स, 76.9 gm कर्बोदकं, 14.6 gm फायबर, 500 mg पोटॅशियम आणि 1.4 mg लोह असतं. मखाण्यात सोडियम अत्यल्प असतं आणि सॅच्युरेटेड सॉल्ट अजिबात नसतं. राहुल यांनी आहारात मखाणा घेतल्याचं सांगितल्यानंतर त्यातील पोषक घटकांबाबत चर्चा सुरू झाली आहे. त्यामुळेच स्नॅक म्हणून तसंच नाश्त्याचा पदार्थ म्हणून मखाणा खाणं किती फायद्याचं आहे? असंही विचारलं जातंय.

    मखाण्याचा जीआय 55 पेक्षा कमी 

    भारतीयांच्या आहारातील तांदुळ, गहू आणि मैद्याचा ग्लायसेमिक इंडेक्स (जीआय) जास्त आहे पण मखाण्याचा जीआय 55 पेक्षा कमी आहे. कमी जीआयमुळे तुमच्या रक्तातील साखरेचं प्रमाण मखाणा खाल्ल्यावर तातडीने वाढत नाही. तसंच मखाणा खाल्ल्यामुळे पोट भरल्यासारखं वाटून खा-खा कमी होते पर्यायाने शरीरात पदार्थांवाटे जाणाऱ्या कॅलरींचं प्रमाण कमी होतं. मखाण्यामुळे डायबेटिक व्यक्तीच्या रक्तातील साखरेचं प्रमाण कसं नियंत्रित राहतं हे संशोधनाअंती सिद्धही झालंय. इतर अभ्यासांतूनही असंच सिद्ध झालंय.

    भरपूर प्रमाणात मॅग्नेशियम 

    मखाण्यात मॅग्नेशियमचं प्रमाण भरपूर असल्याने तो शरीरातील ऑक्सिजन आणि रक्तप्रवाह वाढवण्यासाठी मदत करतो ज्यामुळे हृदयासंबंधी आजारांचा धोका कमी होतो. नॉन-अल्कोहोलिक फॅटी लिव्हर आजाराने ग्रस्त उंदरांना मखाणा खायला दिला तर त्यांच्या रक्तातील कोलेस्टेरॉल आणि ट्रायग्लिसराइड्सचं प्रमाण लक्षणीरित्या कमी झाल्याचं प्राण्यांवरील एका अभ्यासात सिद्ध झालं आहे.

    आरोग्यासाठी फायदेशीर  

    मखाण्यातील प्रोटिन व फायबरमुळे वजन कमी करण्यासही ते खाणं फायद्याचं ठरतं. मखाण्यात अर्गिनाइन, ग्लुटॅमाइन, मिथिओनाइन आणि सिस्टाइन ही अमिनो अ‍ॅसिड्स असतात जी एजिंग कमी करतात आणि त्वचा उत्तम राखतात. मखाण्यातील अँटिऑक्सिडंट्स आणि अँडिइन्फ्लेमेटरी घटकांमुळे अर्थ्रायटिस आणि गाउटसारख्या आजारांत आराम मिळतो. गरोदर महिलांनी मखाणा खाल्ल्यास त्यातील कॅल्शियमचा त्यांना फायदा होतो. मेंदूतील कॉग्निटिव्ह क्रियांवर नियंत्रण ठेवणारं थायमाइन हा घटक मखाण्यात मोठ्या प्रमाणात असतो. मखाण्याच्या बिया कच्च्या, भाजून किंवा त्याचं पीठ करूनही खाल्ल्या तरीही चालतं.

    रात्री भिजत घालून, सुप किंवा दुधाच्या पुडिंगमध्ये घालून मखाणा खाता येतो. पण भाजलेला विकत मिळणारा मखाणा खाणं टाळा कारण त्यात भरपूर मीठ असतं. त्यामुळे कायम कच्चा मखाणाच खरेदी करा. घरी तो सुका असताना भाजा आणि कोथिंबीरीबरोबर नाश्ता म्हणून त्याचा आस्वाद घ्या. जेणेकरून तुमचं पोटही भरेल आणि शरीराला त्रासही होणार नाही. तुमच्या प्रकृतीनुसार तुम्ही किती प्रमाणात मखाणा खायला हवा हेही तुमच्या डॉक्टरांना विचारून घ्या. मगच मखाणा खायला सुरुवात करा

    First published:

    Tags: Rahul gandhi