मराठी बातम्या /बातम्या /heatlh /भारताने तयार केला असा 'मंत्रा'; 'या' आजारांवर करणार उपचार

भारताने तयार केला असा 'मंत्रा'; 'या' आजारांवर करणार उपचार

प्रतीकात्मक फोटो

प्रतीकात्मक फोटो

मंत्रा ही रोबोटिक प्रणाली पूर्णतः भारतीय बनावटीची असून, त्याद्वारे कोणत्याही प्रकारची शस्त्रक्रिया केली जाऊ शकते.

 • Trending Desk
 • Last Updated :
 • Delhi, India

  मुंबई, 14 फेब्रुवारी : गेल्या काही वर्षांत तंत्रज्ञानाने मोठी क्रांती केली आहे. आता जवळपास सर्वच क्षेत्रांमध्ये प्रगत तंत्रज्ञानाचा वापर वाढत आहे. अर्थात याला वैद्यकीय क्षेत्रही अपवाद नाही. वैद्यकीय क्षेत्रात आता उपचारांसाठी प्रगत तंत्रज्ञानाचा वापर केला जात आहे. प्रगत तंत्रज्ञानाच्या वापरामुळे डॉक्टरांना एखाद्या आजाराचं निदान, त्यावर उपचार करणं सहज शक्य होत आहे. आता वैद्यकीय तज्ज्ञांचा कल रोबोटिक सर्जरीकडे वाढताना दिसत आहे. अर्थात त्यामागे काही कारणं देखील आहेत. संपूर्ण भारतीय बनावटीची मंत्रा ही सर्जिकल रोबोटिक सिस्टीम नुकतीच कोईम्बतूर येथील खासगी रुग्णालयात बसवण्यात आली आहे. ही सिस्टिम या पूर्वी अनेक रुग्णालयांमध्ये बसवली गेली आहे. ही सिस्टिम पूर्णतः भारतीय बनावटीची असून, त्याद्वारे कोणत्याही प्रकारची शस्त्रक्रिया केली जाऊ शकते. मंत्रा रोबोटिक सिस्टिम नेमकी कशी आहेत, या सिस्टिममध्ये कोणती फीचर्स आहेत, ते सविस्तर जाणून घेऊया.

  जर तुम्ही एखाद्या आजारावर उपचार घेण्यासाठी रुग्णालयात भरती झाला आणि तुमच्यावर रोबो शस्त्रक्रिया करणार आहे, असं तुम्हाला सांगितलं गेलं तर कदाचित तुमचा यावर विश्वास बसणार नाही. मात्र ही कल्पना आता प्रत्यक्षात उतरू लागली आहे. गुरुग्राममधील एसएस इनोव्हेशन कंपनीने मंत्रा नावाची सर्जिकल रोबोटिक सिस्टिम तयार केली आहे. मंत्रा रोबोटिक सिस्टिम कोईम्बतूर येथील एका खासगी रुग्णालयात बसवण्यात आली आहे. या रोबोट सिस्टिमचा वापर अनेक रुग्णालयांमध्ये यापूर्वीच सुरू झालेला आहे. यात दिल्ली येथील राजीव गांधी कॅन्सर इन्स्टिट्यूटचाही समावेश आहे, असं कंपनीने प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटलं आहे.

  ही कंपनी कार्डिओ थोरॅसिक सर्जन डॉ. सुधीर श्रीवास्तव यांची आहे. त्यांनी याबाबत सांगितलं की, ``या रोबोटिक सिस्टिमच्या माध्यमातून सर्वसामान्य रुग्णांना हायटेक वैद्यकीय सेवा मिळणं सोपं होणार आहे. ``

  या रोबोचा वापर अनेक प्रकारच्या शस्त्रक्रियांसाठी केला जाऊ शकतो. राजीव गांधी कॅन्सर इन्स्टिट्युटमध्ये हा रोबो 25 प्रकारच्या शस्त्रक्रिया करतो, असा दावा कंपनीने केला आहे. या सिस्टिमच्या माध्यमातून युरॉलॉजी, गायनॅकॉलॉजिकल, गॅस्ट्रो-इंटेस्टीनल कॅन्सरशी संबंधित शस्त्रक्रिया करता येतात. याशिवाय कार्डिओ थोरोसिक सर्जरी देखील रोबोच्या मदतीने होऊ शकते.

  मंत्रा सर्जिकल रोबोटिक सिस्टिमची काही खास वैशिष्टय आहेत. या सिस्टिममधला प्रत्येक भाग भारतात तयार केला गेला आहे. याचाच अर्थ ही संपूर्ण सिस्टिम देशी बनावटीची आहे. या सिस्टिममध्ये एकूण चार वर्किंग आर्म्स आहेत. स्टेट वर्किंग आर्ममध्ये कॅमेरा बसवण्यात आला आहे. कॅमेरातील फोटो पाहण्यासाठी एलईडी स्क्रीन आहे. ही पूर्ण सिस्टिम ऑपरेट करण्यासाठी एका डॉक्टरची गरज भासते. ऑपरेटिंग सिस्टिमला हँड ब्रेक आहे. या ब्रेकच्या माध्यमातून संपूर्ण सिस्टिम कंट्रोल केली जाते. या सिस्टिममध्ये तीन भाग आहेत. त्यात पहिला भाग सर्जन कमांड सेंटर असून, डॉक्टर येथून सिस्टिम ऑपरेट करतात. पेशंट साइड आर्म कार्टस् हा दुसरा भाग आहे. या भागात रोबोट सर्जरी करेल. व्हिजन कार्ट हा सिस्टिमचा तिसरा भाग आहे. या ठिकाणी डॉक्टर संपूर्ण शस्त्रक्रिया पाहू शकणार आहेत.

  मंत्रा सर्जिकल रोबोटिक सिस्टिम सर्वात किफायतशीर असल्याचा दावा केला जात आहे. ग्लोबल सर्जिकल रोबोटिक सिस्टिमची सरासरी किंमत 15 ते 17 कोटी रुपये आहे. त्या तुलनेत या सिस्टिमच्या एका युनिटची किंमत 4 ते 5 कोटी रुपये आहे. विशेष म्हणजे या रोबोटिक सिस्टिमच्या माध्यमातून शस्त्रक्रिया करताना जास्त चिरफाड करावी लागत नाही. त्यामुळे रुग्णाला त्रास कमी होतो. त्याचप्रमाणे रोबोटिक सर्जरीनंतर रुग्ण बरा होण्यासाठी केवळ दोन ते तीन दिवस लागतात. हेच नॉर्मल सर्जरी केल्यानंतर रुग्ण बरा होण्यास जास्त कालावधी लागतो, असा दावा देखील करण्यात येत आहे.

  First published:
  top videos

   Tags: Health, Lifestyle, Robot, Surgery