जाहिरात
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / हेल्थ / Hair Wash करताना सावधान! केस धुताना महिलेला Beauty Parlour Stroke Syndrome

Hair Wash करताना सावधान! केस धुताना महिलेला Beauty Parlour Stroke Syndrome

प्रतीकात्मक फोटो (सौजन्य - Canva)

प्रतीकात्मक फोटो (सौजन्य - Canva)

ब्युटी पार्लरमध्ये हेअर वॉश करायला गेलेल्या महिलेला स्ट्रोक आल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

  • -MIN READ Hyderabad,Telangana
  • Last Updated :

    हैदराबाद, 01 नोव्हेंबर :  स्ट्रोक म्हणजे काय हे तुम्हाला माहिती असेल. आजवर तुम्ही ब्रेन स्ट्रोक बाबत ऐकलं असेल पण कधी ब्युटी पार्लर स्ट्रोक सिंड्रोमबाबत ऐकलं आहे का? एका महिलेला असाच स्ट्रोक आला आहे. केस धुताना या महिलेला स्ट्रोक आला. पार्लरमध्ये जाऊन केस धुणं या महिलेला महागात पडलं आहे. ब्युटी पार्लरमध्ये हेअर वॉशनंतर तिचा जीव जाण्याचा धोका होता. तेलंगणाच्या हैदराबादमधील ही धक्कादायक घटना आहे. 50 वर्षांची महिला ब्युटी पार्लरमध्ये हेअर कट करायला गेली. हेअरकट करण्यापूर्वी तिने हेअरवॉश करून घेतला पण त्याचवेळी तिला स्ट्रोक आला. चक्कर येणं, उलटी अशी स्ट्रोकची सामान्य लक्षणं आहेत. पार्लरला गेलेल्या या महिलेमध्ये अशी लक्षणं दिसली. आपल्याला गॅसची समस्या असावी म्हणून ही महिला गॅस्ट्रो तज्ज्ञांकडे गेली. पण तिला गॅसची समस्या नसल्याचं निदान झालं आणि त्यानंतर तिला न्यूरोजलॉजिस्टकडे पाठवण्यात आलं. हे वाचा -  धक्कादायक! डोक्यावर केस आले नाहीतच पण असा परिणाम झाला की…; त्याने स्वतःलाच संपवलं तिच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांच्या मते, केस धुण्यासाठी जेव्हा तिने आपली मान वाकवली तेव्हा तिच्या मेंदूपर्यंत रक्तपुरवठा करणारी नस दबली गेली आणि त्यामुळे तिला स्ट्रोक आला.

    News18लोकमत
    News18लोकमत

    जुबली हिल्समधील अपोलो रुग्णालयाकील सीनियर कन्सलटन्ट न्यूरोलॉजिस्ट डॉ. सुधीर कुमार म्हणाले, स्ट्रोक आल्यानंतर जवळपास 24 तासांनी महिला आपल्याकडे आली. तेव्हा स्ट्रोकची प्रमुख लक्षणं नव्हती. ती कमजरो दिसत होती. त्यामुळे तिला स्ट्रोक आला असावा अशी शक्यता आम्हाला वाटत होती. त्यामुळे आम्ही तिला एमआरआय करायला सांगितलं. त्यात तिच्या मानेच्या मागील भागात क्लॉट्स दिसले. पार्लरमध्ये असा स्ट्रोक येण्याची घटना पहिल्यांदा अमेरिकेत 1993 साली घडली होती. त्यानंतर बरीच प्रकरणं समोर आली आहे  डॉक्टरांच्या मते, सलूनमध्ये मानेचा मसाज करणाऱ्या पुरुषांमध्ये अशी समस्या बरीच पाहायला मिळते. हे वाचा -  वाढत्या वयासोबत मासिक पाळीत होतात हे मोठे बदल, या संकेतांकडे करू नका दुर्लक्ष टाइम्स ऑफ इंडियाच्या रिपोर्टनुसार अशी बरीच प्रकरणं पाहणारे केआईएमएस सिकंदराबादमधील कन्सलटन्ट न्युरोलॉजिस्ट डॉ. प्रवीण कुमार यदा यांनी सांगितलं की, मसाज करणारी व्यक्ती जेव्हा मान किंवा डोक्यावर जास्त दाब देऊन दाबते, तेव्हा अशी समस्या येते. सलूनमध्ये मानेला झटका देऊन दोन्ही बाजूंनी मान फिरवतात तेव्हासुद्धा ही समस्या होते. या प्रक्रियेत रक्तवाहिनीला हानी पोहोचते आणि स्ट्रोक येतो.

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात