जाहिरात
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / हेल्थ / एकाच किडनीवर जगणं किती कठीण? जाणून घ्या पाळावी लागतात कोणती बंधने

एकाच किडनीवर जगणं किती कठीण? जाणून घ्या पाळावी लागतात कोणती बंधने

kidney

kidney

बहुतांश लोकांच्या शरीरात दोन किडनी असतात. मात्र, काही व्यक्ती अशा असतात ज्यांच्या शरीरात फक्त एकच किडनी असते. त्यामागे अनेक कारणं असतात. काहीजण एकाच किडनीसह जन्माला आलेले असतात तर काहीजण वैद्यकीय स्थिती किंवा दुखापतीवर उपचार करण्यासाठी एखादी किडनी काढून टाकतात.

  • -MIN READ Trending Desk Maharashtra
  • Last Updated :

    मुंबई, 15 फेब्रुवारी- बहुतांश लोकांच्या शरीरात दोन किडनी असतात. मात्र, काही व्यक्ती अशा असतात ज्यांच्या शरीरात फक्त एकच किडनी असते. त्यामागे अनेक कारणं असतात. काहीजण एकाच किडनीसह जन्माला आलेले असतात तर काहीजण वैद्यकीय स्थिती किंवा दुखापतीवर उपचार करण्यासाठी एखादी किडनी काढून टाकतात. कधी-कधी किडनी प्रत्यारोपणाची गरज असलेल्या व्यक्तीला किडनी दान केल्यानंही एखाद्या व्यक्तीच्या शरीरात एकच किडनी शिल्लक राहते. एका सशक्त किडनीवर माणूस जिवंत राहू शकतो. पण, त्यासाठी फार काळजी घ्यावी लागते. कारण, तुमच्या शरीरात असलेल्या एकमेव किडनीमध्ये जर बिघाड झाला तर तुमचा जीव धोक्यात येऊ शकतो. ‘हेल्थलाईन’नं याबाबत वृत्त प्रसिद्ध केलं आहे. शरीरातील द्रव संतुलन राखण्यात, रक्तातील प्रथिनांच प्रमाणं संतुलित ठेवण्यात आणि रक्तदाब नियंत्रित करण्यात किडनी महत्त्वाची भूमिका बजावतात. आपल्या शरीरातील किडनी रक्तातील कचरा आणि अतिरिक्त द्रव फिल्टर करते. त्यातील टाकाऊ घटक मूत्राच्या रुपात बाहेर टाकले जातात. एक किडनी एखादं शरीर सामान्यपणे कार्य करत राहील एवढं रक्त फिल्टर करू शकते. म्हणूनच कोणतीही व्यक्ती फक्त एकाच किडनीसह आयुष्य जगू शकते. पण, त्यासाठी काही नियम आणि बंधनं सहन करावी लागतात. पौष्टिक आहार, निरोगी जीवनशैली, नियमित व्यायाम आणि डॉक्टरांकडून नियमित तपासणी करणं यांसारख्या गोष्टींच्या माध्यमातून तुम्ही किडनी निरोगी ठेवू शकता. (हे वाचा: धूम्रपान करता? तरीही Lungs ठेऊ शकता Healthy! आहारात घ्या हे पदार्थ ) एक किडनी असलेल्या व्यक्तींनी आपल्याला दुखापत होणार नाही, याची काळजी घेतली पाहिजे. त्यांनी बॉक्सिंग, फुटबॉल, हॉकी, मार्शल आर्ट्स, रग्बी, सॉकर, कुस्ती यांसारखे खेळ आणि रॉक क्लायंबिंग, मोटर रेसिंग, बंजी जंपिंग यांसारख्या धाडसी अॅक्टिव्हिटी टाळल्या पाहिजेत. या शिवाय, एक किडनी असलेल्या व्यक्तीनं नॉनस्टेरॉइडल अँटी-इन्फ्लेमेटरी ड्रग्ससारख्या (NSAIDS) हानिकारक औषधाचं सेवन टाळलं पाहिजे. जर शरीरातील एकमेव किडनीला गंभीर दुखापत झाली तर ती पूर्णपणे काम करणं बंद करेल. परिणामी, तुम्हाला जगण्यासाठी डायलिसिस किंवा किडनी प्रत्यारोपणाची आवश्यकता भासेल. सिंगल किडनी असणाऱ्या व्यक्तींनी मद्यपान आणि धुम्रपानापासून दूर राहिलं पाहिजे. कारण, या दोन्ही बाबी शरीरातील विविध अवअवयांवर दुष्परिणाम करतात. जर तुम्हाला एकच किडनी असेल तर मद्यपानामुळे तिच्यावर अतिरिक्त ताण येईल आणि कालांतरानं ती निकामी होईल. नॅशनल किडनी फाउंडेशननं दिलेल्या माहितीनुसार, जेव्हा 85 ते 90 टक्के किडनी निकामी होते तेव्हा डायलिसिस सुरू करावं लागतं. त्यामुळे जर तुम्हाला एकच किडनी असेल आणि तीदेखील निकामी होण्याच्या मार्गावर असेल तर डायलिसिस किंवा किडनी प्रत्यारोपणाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही.

    News18लोकमत
    News18लोकमत

    ज्या व्यक्तींच्या शरीरात एकच किडनी आहे त्यांनी वर्षातून किमान एकदा तरी डॉक्टरांकडून तपासणी करून घेतली पाहिजे. जेणेकरून किडनीशी संबंधित लहान-मोठ्या समस्या लगेच लक्षात येतील. एकच किडनी असलेले बहुतेक लोक सामान्य, निरोगी जीवन जगतात. तुमच्याकडे एक किडनी असो किंवा दोन, निरोगी जीवनशैली जगल्यास त्या व्यवस्थित काम करतात.

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात