लस मिळण्यामधील जागतिक विषमतेवर तोडगा कशाप्रकारे काढता येईल?

लस मिळण्यामधील जागतिक विषमतेवर तोडगा कशाप्रकारे काढता येईल?

2021 च्या उत्तरार्धात IAVG ने लसींच्या पुरवठयामध्ये 25% कपात होण्याची शक्यता वर्तवल्याने आता जगाला संसाधंनांना दिशा देणे आणि लसींचा पुरवठा कमी असलेल्या देशांना मदत करणे आवश्यक आहे.

  • Share this:

भारताने अलिकडेच लसीचे डोस वितरीत करण्यामध्ये 85 कोटींचा टप्पा पार केला आहे. देशाची लसीकरणाची सध्याची गती अशीच कायम राहिली तर पुढील वर्षाच्या सुरुवातीपर्यंत सर्व प्रौढ नागरिकांचे लसीकरण पूर्ण होऊ शकते. यआ यशाचे बरेचसे श्रेय आपले देशी लस उत्पादक, SII आणि भारत बायोटेक तसेच Network18 Sanjeevani – A Shot Of Life(संजीवनी - अ शॉट ऑफ लाईफ) या Federal Bank Ltd. च्या एका CSR उपक्रमासारख्याच अन्य सार्वजनिक लसीकरण जनजागृती मोहिमांच्या व्यापकत्वाला जाते. पण आपल्यासारख्या जगतिकीकरण झालेल्या अर्थव्यवस्थेसाठी, आणि विशेषकरून वसुधैव कुटुंबकम् या मूल्यावर विश्वास असलेल्या एका संस्कृतीसाठी भारताची चिंता आतो जगातील या व्हायरसचा धोका असलेल्या ठिकाणी आणि गरीब आणि श्रीमंतांमधील लसीच्या प्राप्तीतील दरी भरून काढण्यासाठी विस्तारली पाहिजे.

WHO च्या स्वतंत्र लस वाटप समूह (IAVG) यांनी हा असमतोल भरून काढण्यासाठी सुचवलेल्या उपायांपैकी एक म्हणजे लस उत्पादक आणि मोठ्या प्रमाणात संसर्ग असलेल्या देशांसाठी आहे जेणेकरून लसींच्या प्रधान्यांमध्ये समानता आणि पारदर्शकता येईल. कोवॅक्सिन लसीच्या पुरवठ्यासाठीच्या कराराला प्राधान्य देऊन आणि अतिरिक्त खराबी किंवा अपव्यय यासाठी कारणीभूत ठरणारे लसींचे चिन्हांकन किंवा साठवणूक टाळून ते या गोष्टी करू शकतात. जपान, ऑस्ट्रेलिया आणि अमेरिकेसह या देशांच्या क्वाड ग्रुपचा एक भाग म्हणून लसीचे 120 कोटी डोस दान करून भारत या निवारक प्रयत्नांचा एक भाग ठरला आहे. प्रादेशिक किंवा राष्ट्रीयतेच्या संकुचित संदर्भांच्या पल्याड जाऊन सामायिक भल्यासाठीच्या भारताच्या कांक्षेचा हा दाखला आहे.

देशांना भौतिक सहाय्य करण्याव्यतिरिक्त, भारत लसीविषयीचा संकोच कसा दूर करावा आणि मोठ्या प्रमाणावर लसीकरण प्रयत्नांची अंमलबजावणी कशी करावी या विषयांवर उपयुक्त केस स्टडी देखील करत आहे. सर्व भारतीयांपर्यंत लसींविषयीची जागृती आणि लसी सर्वांपर्यंत पोहचविण्यासाठीच्या Network18 Sanjeevani – A Shot Of Life(संजीवनी - अ शॉट ऑफ लाईफ) या Federal Bank Ltd. च्या एका CSR उपक्रमाच्या अनुभवांमधून संस्था, NGO आणि नागरी समाज हे चुकीच्या माहितीचे अडथळे पार करण्यामध्ये उपयुक्त ठरू शकतात हे सिद्ध झाले आहे. कुटुंब आणि समुदायांच्या सुरक्षेच्या एखाद्या राष्ट्रीय प्रयत्नाचा एक भाग म्हणून लसीकरण करण्याच्या सामूहिक भावनेचे महत्त्वही यामध्ये सर्वांसमोर आले आहे. पण सर्वांत महत्त्वाचे म्हणजे थोडेसे धैर्य आणि निश्चय असेल तर कोणतेही मोठ्यात मोठे उद्दिष्टही साध्य करता येतेच.


या गुणांची सध्या जगाला भरपूर प्रमाणात गरज आहे. 2021 च्या उत्तरार्धात IAVG ने लसींच्या पुरवठयामध्ये 25% कपात होण्याची शक्यता वर्तवल्याने आता जगाला संसाधंनांना दिशा देणे आणि लसींचा पुरवठा कमी असलेल्या देशांना मदत करणे आवश्यक आहे. एक स्वतंत्र नागरिक म्हणून आपण लसींच्या बाबतीतली समानता आणि आंतरराष्ट्रीय ऐक्य या आदर्शांना पाठिंबा दिला पाहिजे. आपल्याला आरोग्य आणि प्रतिकारशक्तीचे किमान अधिकार नाकारणार्या लोकांपर्यंत पोहचून त्यांना मदत केली पाहिजे. शेवटी, ही महामारी रंग, संस्कृती किंवा धर्म पाहत नाही.

COVID-19 लसीसंबंधी नवनवीन बातम्या आणि माहिती मिळवण्यासाठी, Network18 Sanjeevani – A Shot Of Life(संजीवनी - अ शॉट ऑफ लाईफ) Federal Bank Ltd. ला भेट देत रहा, आणि एक निरोगी, सुरक्षित आणि सुंदर जग निर्माण करण्यासाठी मदत करा.

First published: October 19, 2021, 9:17 PM IST
Tags: Sanjeevani

ताज्या बातम्या