Skin Care Tips Using Garlic : आपल्या स्वयंपाक घरात नेहमी उपलब्ध असलेला लसूण आरोग्यासाठी तसेच त्वचेसाठी खूप फायदेशीर आहे. लसणाच्या (Garlic ) मदतीने तुम्ही एक सुंदर चेहरा मिळवू शकता. लसणामध्ये अँटी-ऑक्सिडंट्ससह अनेक पोषक घटक असतात. या व्यतिरिक्त, व्हिटॅमिन बी 6, कॅल्शियम, फॉस्फरस, मॅग्नेशियम आणि लोह यासारखी पोषक तत्त्वे देखील त्यात मुबलक प्रमाणात आढळतात. लसणामध्ये (Garlic) प्रथिने, थायमिन आणि पॅन्टोथेनिक अॅसिड असते, जे त्याचे पोषणमूल्य आणखी वाढवते. चेहऱ्यावरील त्वचेच्या समस्या (skin problems) दूर करण्यासाठी लसूण कसा उपयोगी आहे ते पाहुया. सुरकुत्या दूर करण्यासाठी फायदेशीर जर तुमच्या चेहऱ्यावर सुरकुत्या पडत असतील तर तुम्ही सकाळी मध आणि लिंबासह लसणाचे सेवन करावे. यामुळे सुरकुत्या कमी होऊ शकतात. लसणाची एक कळी सोलून कापून घ्या आणि सकाळी उठल्याबरोबर लिंबू आणि मधाच्या पाण्यासोबत घ्या. तुम्हाला काही दिवसात फरक दिसू लागेल. हे वाचा - तुमचं Aadhaar-Pan कार्ड लिंक आहे का? नसेल तर मिनिटांत असं करा लिंक मुरुमांच्या डागांनी त्रस्त आहात जर तुमच्या चेहऱ्यावर मुरुमांच्या खुणा असतील तर तुम्ही लसूण चिरून, बारीक करून पेस्ट तयार करू शकता. ही पेस्ट पिळून रस काढा आणि मुरुमांच्या भागात लावा. लावून सुमारे 5 ते 10 मिनिटे चेहरा सुखू द्या आणि नंतर पाण्याने धुवा. काही दिवस हा उपाय केल्याने मुरुमे आणि त्याचे डाग कमी होतील. स्वच्छ चेहरा अर्ध्या टोमॅटोमध्ये लसणाची एक कळी मिसळून पेस्ट बनवा. ती पेस्ट चेहऱ्यावर लावा आणि 10 मिनिटे तशीच राहू द्या आणि नंतर स्वच्छ पाण्याने धुवा. यामुळे आपल्या त्वचेची छिद्रे स्वच्छ आणि बंद होण्यास मदत होईल. हे वाचा - धक्कादायक! दुसऱ्या लग्नासाठी बापानं 4 मुलींचा घेतला जीव; पत्नीच्या मृत्यूनंतर मेहुणीसोबत बांधायची होती लग्नगाठ स्ट्रेच मार्क्स कसे काढायचे? ऑलिव्ह ऑइलमध्ये लसणाचा रस मिसळा. त्यानंतर कोमट लसूण तेलाने तुमच्या स्ट्रेच मार्क्सची मालिश करा. हा उपाय काही दिवस करा, तुम्हाला स्ट्रेच मार्क्स कमी झाल्याचे जाणवेल.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.