जाहिरात
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / हेल्थ / पाण्यानेच कमी होईल शरीरातील बॅड कोलेस्टेरॉल; फक्त पाणी असं प्या

पाण्यानेच कमी होईल शरीरातील बॅड कोलेस्टेरॉल; फक्त पाणी असं प्या

प्रतीकात्मक फोटो

प्रतीकात्मक फोटो

कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी गरम पाणी किती उपयोगी आहे, ते जाणून घेऊया.

  • -MIN READ Trending Desk Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

    मुंबई, 05 फेब्रुवारी : आजच्या धकाधकीच्या जीवनात अनेकजण त्यांच्या आरोग्याकडे लक्ष देत नाहीत. मात्र, आरोग्याकडे लक्ष न दिल्यामुळे ते मोठ्या आजारांचा बळी ठरू शकतात. अलीकडच्या काळात शरीरातील कोलेस्टेरॉल वाढल्याचे प्रकार समोर येऊ लागलेत. अशा प्रकरणांमध्ये दिवसेंदिवस वाढ होतेय. डायबेटिसप्रमाणेच कोलेस्टेरॉलचं प्रमाण वाढल्यानेही त्रास होतो. या आजाराच्या लक्षणांची वेळीच काळजी घेतली नाही, तर त्याचा वाईट परिणाम होतो. एक्सप्रेसच्या वृत्तानुसार, कोलेस्टेरॉल हा मेणासारखा पदार्थ आहे, जो रक्तवाहिन्यांमध्ये जमा होतो. त्यामुळे रक्तवाहिन्या अरुंद होऊ लागतात. जेव्हा कोलेस्टेरॉलचं प्रमाण जास्त असतं, तेव्हा त्याचा थेट परिणाम रक्ताभिसरणावर होतो आणि रक्त हृदयापर्यंत नीट पोहोचत नाही. अशा वेळी हृदयविकाराचा झटका येऊ शकतो. तसेच मेंदूला होणारा रक्त पुरवठा खंडित झाल्यास ब्रेन स्ट्रोकचाही धोका वाढतो. त्यामुळे कोलेस्टेरॉल नियंत्रित करणं गरजेचं आहे. त्यासाठी आरोग्यतज्ज्ञांचा सल्ला घेऊन औषधं घेता येतात. परंतु, जर तुम्हाला औषध घ्यायचं नसेल, तर घरगुती उपायांनीसुद्धा नैसर्गिकरित्या ते नियंत्रित करता येतं. त्यामधीलच एक उपाय म्हणजे गरम पाणी पिणं. गरम पाण्यानं कोलेस्टेरॉल कमी होतं. कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी गरम पाणी किती उपयोगी आहे, ते जाणून घेऊया. रक्तवाहिन्यांमध्ये खराब फॅट लिपिड्स जमा झाल्यामुळे कोलेस्टेरॉल निर्माण होतं. या समस्येवर गरम पाणी हा अतिशय प्रभावी उपाय आहे. गरम पाणी प्यायल्यानं शरीरात निर्माण होणारं खराब फॅट लिपिडचे प्रमाण कमी होऊन शरीरात चरबी जमा होण्यापासून रोखली जाते. गरम पाण्यामुळे शरीरातील रक्तभिसरणाचा वेग वाढतो. कारण रक्तातील द्रवपदार्थाच्या कमतरतेमुळे रक्त घट्ट होऊ लागते, आणि त्यामुळे रक्ताभिसरणावर परिणाम होतो. परंतु कोमट पाणी रक्त पातळ करते, आणि रक्ताभिसरण सुधारतं. गरम पाणी ट्रायग्लिसराइड कमी करण्यास मदत करतं. कोलेस्टेरॉलचं सर्वांत मोठं कारण म्हणजे तेलकट अन्नपदार्थांचे सेवन हे आहे. यामुळे शरीरात कोलेस्टेरॉल वेगानं वाढतं. ट्रायग्लिसराइड हे तेलकट अन्नातून बाहेर पडते, आणि हेच कोलेस्टेरॉलचे मुख्य कारण आहे. गरम पाणी ट्रायग्लिसराइडचे कण नसांना चिकटण्यापासून प्रतिबंधित करतात. गरम पाणी आणि लसूणदेखील कोलेस्टेरॉलची समस्या कमी करते. रिकाम्यापोटी पाण्यासोबत लसणाचं सेवन केल्यास कोलेस्टेरॉल कमी होण्यासोबतच हृदयाशी संबंधित समस्याही दूर होतात. दरम्यान, गरम पाणी पिण्याचे विविध फायदे आहेत. परंतु, नियमित गरम पाणी पिण्यास सुरुवात करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणं योग्य ठरू शकतं.

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात