वजन कमी करण्यापासून ते मधुमेहापर्यंत अनेक आजारांवर शाकाहाराचे आहेत हे आश्चर्यकारक फायदे

वजन कमी करण्यापासून ते मधुमेहापर्यंत अनेक आजारांवर शाकाहाराचे आहेत हे आश्चर्यकारक फायदे

1 ऑक्टोबरला जागतिक शाकाहारी दिवस जगभरात साजरा केला जातो. हा दिवस साजरा करण्याचा हेतू लोकांना शाकाहारी अन्न आणि त्याचे फायदे याची जाणीव करून देणं हा आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 01 ऑक्टोंबर : शाकाहारी खाणं केवळ वजन कमी करण्यासाठी चांगलं असतं, असा काहींचा समज असतो.  परंतु, विज्ञान आणि अनेक अभ्यासांमध्ये हे सिद्ध झालंय की, शाकाहारी खाल्ल्यानं आरोग्यालाही इतर अनेक फायदे होतात. काय आहेत हे फायदे जाणून घेऊया. यासाठी 1 ऑक्टोबरला जागतिक शाकाहारी दिवस जगभरात साजरा केला जातो. हा दिवस साजरा करण्याचा हेतू लोकांना शाकाहारी अन्न आणि त्याचे फायदे याची जाणीव करून देणं हा आहे.

शाकाहार असतो पोषक तत्त्वांनी समृद्ध - शाकाहारी जेवणात भरपूर तंतुमय पदार्थ (फायबर - Fiber) आणि अँटीऑक्सिडंट्स असतात, हे अनेक अभ्यासांमध्ये सिद्ध झालंय. त्यामध्ये पोटॅशियम, मॅग्नेशियम, फॉलेट, लोह आणि अ, क आणि ई सारखी जीवनसत्त्वं आदी सर्व आवश्यक पोषक घटक असतात. जर तुम्हाला शरीरातील ही सर्व पोषकद्रव्यं नैसर्गिक पद्धतीनं राखायची असतील तर, आहारात वनस्पती आणि फोर्टिफाइड फूडचा (Fortified foods) समावेश करावा.

वजन कमी करण्यासाठी प्रभावी - आजकाल अनेकजण स्थूलपणा आणि वजन कमी करण्यासाठी शाकाहारी बनत आहेत. अभ्यासानुसार, शाकाहारी लोकांमध्ये मांसाहारी लोकांपेक्षा बॉडी मास इंडेक्स (बीएमआय) कमी असतो. शाकाहारी खाल्ल्यानं पोटात आपोआपच कॅलरी कमी जातात, यामुळं स्थूलपणा आणि वजन कमी होतं.

रक्तातील साखर होते कमी - मधुमेहाच्या रुग्णांना शाकाहारी राहिल्याचा सर्वाधिक फायदा होतो. शाकाहारी अन्न केवळ रक्तातील साखर कमी करत नाही तर, मूत्रपिंडाचं कार्यही सुधारतं. ज्यांना हा आजार नाही आणि ते शाकाहारी आहेत त्यांनाही भविष्यात मधुमेहाची शक्यता खूप कमी होते. एका संशोधनानुसार, वनस्पतीजन्य प्रथिनांमुळं मूत्रपिंडाच्या आजाराचा धोका कमी होतो.

हे वाचा - Shocking! डोक्यात घुसून कुरतडून कुरतडून खाल्ला संपूर्ण मेंदू; Brain Eating Amoeba ने घेतला चिमुकल्याचा जीव

काही प्रकारच्या कर्करोगांपासून बचाव - शाकाहारी खाल्ल्यानं काही प्रकारच्या कर्करोगांपासून संरक्षण होतं. उदाहरणार्थ, शेंगा नियमितपणं खाल्ल्याने कोलोरेक्टल कर्करोगाचा धोका 9-18 टक्के कमी होऊ शकतो. संशोधन असंही दर्शवतं की, दररोज किमान 7 ताजी फळं आणि भाज्या खाल्यानं कर्करोगानं मृत्यू होण्याचा धोका 15 टक्क्यांपर्यंत कमी होतो. शाकाहारी अन्न साधारणपणे सोया उत्पादनांमध्ये जास्त असतं, जे स्तनांच्या कर्करोगापासून संरक्षण करतं.

हे वाचा - VIDEO : पत्नी डॉक्टरच्या केबिनमधून बाहेर पडताच, नवरा शिरला आत; डॉक्टरची केली भयावह अवस्था!

हृदयरोगाचा धोका होतो कमी - ताजी फळं, भाज्या, शेंगा आणि तंतुमय पदार्थ खाल्ल्यानं हृदयरोगाचा धोका कमी होतो. शाकाहारी आहार सुनियोजित पद्धतीनं खाल्ले तर हे सर्व घटक अतिशय चांगल्या प्रमाणात शरीरापर्यंत पोहोचतात. अभ्यासानुसार, जे लोक शाकाहारी आहार घेतात, त्यांना उच्च रक्तदाबाचा धोका 75 टक्क्यांनी आणि हृदयरोगाचा धोका 42 टक्क्यांनी कमी असतो.

Published by: News18 Desk
First published: October 2, 2021, 6:15 AM IST

ताज्या बातम्या