मराठी बातम्या /बातम्या /heatlh /

जिभेचे चोचले पुरवणाऱ्या पदार्थांमुळे तुमचं हृदय धोक्यात

जिभेचे चोचले पुरवणाऱ्या पदार्थांमुळे तुमचं हृदय धोक्यात

तुम्हाला यातून बाहेर काढण्यासाठी औषधं नव्हे, तर आहाराच मदत करेल, असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे.

तुम्हाला यातून बाहेर काढण्यासाठी औषधं नव्हे, तर आहाराच मदत करेल, असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे.

तुम्हाला यातून बाहेर काढण्यासाठी औषधं नव्हे, तर आहाराच मदत करेल, असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे.

केंब्रीज, 16 फेब्रुवारी : आजच्या आधुनिक युगात माणसाची जीवनशैली बदलली आहे, हे सर्व जणच अनुभवत आहेत. खाण्याच्या बदललेल्या सवयी (Changed Food Habits) हा बदललेल्या जीवनशैलीचाच एक भाग. जंक फूड (Junk Food), प्रक्रियायुक्त पदार्थ (Processed Foods) म्हणजेच रेडी टू इट पदार्थ, सॉफ्ट ड्रिंक्स, कार्बोनेटेड ड्रिंक्स (Carbonated Drinks) हा सगळा या बदललेल्या सवयींचा भाग. अशा खाण्यामुळे शरीरावर वाईट परिणाम होतात हे आरोग्य विषयातले तज्ज्ञ वारंवार सांगत असतातच. आता हार्वर्ड  विद्यापीठात झालेल्या अभ्यासांतून या विषयावर अधिक प्रकाश टाकण्यात आला आहे.

या नव्या अभ्यासांचा नेमका निष्कर्ष  सांगायचा, तर तुमच्या आहारात लाल, प्रक्रियायुक्त मांस, रिफाइन्ड कार्बोहायड्रेट्स आणि गोड पेयं यांचा समावेश असेल, तर तुम्हाला हृदयविकार (Heart Disease) होण्याचा धोका आहे. अशा प्रकारच्या खाद्यपदार्थांना इन्फ्लेमेटरी फूड्स (Inflammatory Foods) म्हणतात. कारण त्यामुळे इन्फ्लेमेशन अर्थात दाह होतो.  टाइम्स नाऊने त्याबद्दलचं वृत्त दिलं आहे.

जर्नल ऑफ दी अमेरिकन कॉलेज ऑफ कार्डिओलॉजीमध्ये 10 नोव्हेंबर 2020 रोजी एका अभ्यासाचे निष्कर्ष प्रसिद्ध झाले होते. हृदयविकार नसलेल्या दोन लाख 10 हजार व्यक्तींवर हाय इन्फ्लेमेटरी आहार आणि लो इन्फ्लेमेटरी आहाराचा काय परिणाम होतो याची निरीक्षणं नोंदवण्यात आली. सहभागी व्यक्तींच्या खाण्याच्या सवयी दर चार वर्षांनी 32 व्या वर्षांपर्यंत नोंदवण्यात आल्या होत्या. ज्या व्यक्ती हाय इन्फ्लेमेटरी आहार घेत होत्या त्यांना लो इन्फ्लेमेटरी आहार घेणाऱ्यांच्या तुलनेत हृदयविकार होण्याचा धोका 38 टक्के अधिक तर स्ट्रोकचा धोका 28 टक्के अधिक होता.

हे वाचा - कोरोना काळातील एकटेपणा दूर करण्यासाठी मंत्री; Minister of Loneliness ची नियुक्ती

सप्टेंबर 2020 मध्ये हार्वर्ड जर्नलने (Harvard Journal) प्रसिद्ध केलेल्या लेखात असं निरीक्षण नोंदवलं होतं, की प्रक्रियायुक्त मांस, गोड खाद्यपदार्थ आणि रिफाइन्ड धान्य असा इन्फ्लेमेटरी आहार घेत असलेल्या व्यक्तींमध्ये आतड्याचा कॅन्सर (Cancer), हृदयविकार, स्ट्रोक (Stroke) किंवा मधुमेह (Diabetes) हे विकार होण्याचा धोका अधिक आहे. सात मे 2020 रोजी हार्वर्डच्याच आणखी एका अभ्यासात अशीही एक शक्यता वर्तवण्यात आली होती, की इन्फ्लेमेशनल आहारामुळे आतड्याशी संबंधित क्रॉन्स डिसीज हा विकारही होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

नोव्हेंबर 2020 रोजी त्याच जर्नलमध्ये प्रसिद्ध झालेल्या एका अभ्यासात गोड पेयांच्या शरीरावर होणाऱ्या परिणामांबद्दलची निरीक्षणं नोंदवण्यात आली होती. त्यात एक लाख पाच हजार व्यक्तींचा अभ्यास करण्यात आला होता. ज्या व्यक्ती रोज पाऊण कप किंवा त्याहून अधिक प्रमाणात गोड पेयं किंवा कृत्रिम स्वीटनर असलेली पेयं पितात, त्यांना ही पेयं अगदी कमी प्रमाणात पिणाऱ्या किंवा न पिणाऱ्यांच्या तुलनेत हृदयविकाराचा धोका अधिक होता. डाएट सोडा किंवा फ्रूट ज्यूस यांसारखी एरव्ही आरोग्यपूर्ण समजली जाणारी पेयंही नियमितपणे प्यायल्यास शरीराला घातक ठरतात.

फ्रेंच फ्राइज, फ्रोझन फूड, सोडियमचं प्रमाण जास्त असलेलं कॅन्ड फूड, डोनट्स, एरेटेड ड्रिंक्स, पॉलिश्ड तांदूळ, पास्ता, मैदा, व्हाइट ब्रेड, समोसे, लोणची, कार्बोनेटेड ड्रिंक्स, कॉर्न फ्लोअर, केक्स, टोमॅटो केचप, पिझ्झा हे आणखी काही इन्फ्लेमेटरी पदार्थ आहेत.

हे वाचा - प्रत्यारोपणासाठी हृदयाची प्रतीक्षा संपली; शरीरात धडधडणार Total Artifical Heart

तुम्हाला यातून बाहेर काढण्यासाठी औषधं नव्हे, तर आहाराच मदत करेल, असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे. अँटी इन्फ्लेमेटरी फूड्स (Anti Inflammatory Foods) आहारात असल्यास हा धोका टाळता येऊ शकतो, कमी करता येऊ शकतो. प्रक्रिया न केलेले आणि साखर न घातलेले पदार्थ आहारात असण्यावर भर असणं गरजेचं आहे. ताज्या भाज्या, फळं, पॉलिश न केलेलं धान्य, डाळी, मासे, चिकन, नट्स, आरोग्यदायी तेलं आदींचा आहारात समावेश हवा. या पदार्थांमध्ये हिरव्या पालेभाज्या, गडद पिवळ्या आणि नारिंगी रंगाच्या भाज्या (म्हणजेच पिवळी ढोबळी मिरची, गाजर, इत्यादी), धान्यं, फळं, चहा, कॉफी आणि मर्यादित प्रमाणात रेड वाइन आदींचा समावेश असतो.

हळद, काळी मिरी, लिंबूपाणी, ब्लूबेरीज, स्ट्रॉबेरी, रास्पबेरी, सफरचंद, संत्री, पीचेस, नासपती, प्लम्स, डाळिंब, पालेभाज्या, नट्स, कांदा, लसूण, बार्ली, बाजरी, ब्राउन राइस, बल्गर व्हीट, बीट, गाजर, कांदे, वाटाणे, ब्रसेल्स स्प्राउट्स, कॉलिफ्लॉवर, कोबी, रेड चेरीज, ढोबळी मिरची, ऑलिव्ह ऑइल, ओमेगा थ्री फॅटी अॅसिड्स जास्त प्रमाणात असलेले पदार्थ आदींचा आहारात समावेश असणं फायद्याचंअसल्याचं तज्ज्ञांचं म्हणणं आहे.

First published:

Tags: Cancer, Diabetes, Harvard university journal, Health, Heart risk, Lifestyle, Processed food, Taste buds, Tasty food