
खाण्यापिण्याच्या जवळपास सर्वच गोष्टी वेळेनुसार खराब होतात. म्हणजेच ठराविक कालावधीनंतर त्या आपल्या आरोग्यासाठी हानिकारक असतात. यामुळे बाजारातील प्रत्येक वस्तूवर मॅन्युफॅक्चरिंग आणि एक्सपायरी डेट लिहलेली असते. मात्र, अशाही काही गोष्टी आहेत, ज्यांची कोणतीही एक्सपायरी डेट नसते. या वस्तू वर्षानूवर्ष चालत राहतात. वेळेनुसार ना यांची चव बदलते नाही पोषकतत्त्वांमध्येही फरक पडत नाही.

तुम्ही बारकाईने पाहिलं असेल तर अनेक खाद्यपदार्थांवर दोन तारखा लिहलेल्या असतात. एक बेस्ट बिफोर आणि दूसरी एक्सपायरी. अनेकदा लोकं या दोन्हींचा अर्थ एकच काढतात आणि बेस्ट बिफोर तारीख संपल्यानंतर वस्तू टाकून देतात. मात्र, दोन्ही फरक आहे. बेस्ट बिफोरचा अर्थ आहे, की या तारखेच्या आधी वापर केला तर पदार्थातून संपूर्ण पोषण मिळणार तर बेस्ट बिफोर तारीख संपल्यानंतर देखील पदार्थ खराब होत नाही फक्त त्यातील पोषण थोडं कमी होतं. हवाबंद पदार्थ उघडल्यानंतर त्यातील पोषण हळूहळू कमी होत असते, याचीही माहिती तुम्हाला माहिती पाहिजे. कारण, त्याचा हवेशी संपर्क आल्यानंतर प्रतिक्रिया होत असते. त्यामुळे सील उघडल्यानंतर बेस्ट बिफोरला काहीही अर्थ राहत नाही. फक्त एक्सपायरी डेट महत्वाची असते.

खाण्याच्या अशा अनेक गोष्टी आहेत, ज्याची कधीच एक्सपायरी नसते. यापैकी एक पांढरा तांदूळ (White Rice) आहे. अमेरिकेतील उटाह स्टेट युनिव्हर्सिटीमध्ये केलेल्या संशोधनात असे आढळून आले आहे की हे तांदूळ ऑक्सिजन मुक्त कंटेनरमध्ये आणि 40 डिग्री फॅरेनहाइडच्या खाली तापमानात ठेवल्यास 30 वर्षांपर्यंत पांढरे तांदूळ त्यांचे पोषण गमावत नाहीत. दुसरीकडे, ब्राउन राईस 6 महिन्यांपेक्षा जास्त काळ टिकत नाही कारण त्यात नैसर्गिक तेलाचे प्रमाण जास्त आहे.

आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर मानला जाणारा मधही याच श्रेणीत आहे. हे कधीच खराब होत नाही. फुलांच्या रसापासून तयार झालेला मधाची उत्पादनादरम्यान मधमाश्यांच्या एन्झाईम्ससोबत प्रतिक्रिया होते. यामुळे रसाची रचना बदलते आणि ती साध्या साखरेत बदलते, ज्यामुळे त्याचे आयुष्य वाढते. काचेच्या भांड्यात मध घट्ट बंद करून ठेवल्यास तो कधीच खराब होत नाही. सर्वात जुना मध 5500 वर्षांपूर्वीचा असल्याचे मानले जाते.

मीठालाही एक्सपायरी डेट नसते. सोडियम क्लोराईड sodium chloride म्हणजेच मिठाच्या या वैशिष्ट्यामुळे शतकानुशतके अन्न आणि मृतदेह सुरक्षित ठेवण्यासाठी त्याचा वापर केला जात आहे. मीठ लावले की कोणत्याही गोष्टीतील ओलावा निघून जातो आणि त्याचे वय वाढते. हेच सूत्र मीठावरच काम करते. मात्र, कोणत्याही कारणास्तव मिठात आयोडीन मिसळल्यास ते केवळ 5 वर्षे टिकते.

साखर कित्येक वर्ष चालते. हेच कारण आहे की जेलीसारख्या गोष्टी अनेक दिवस टिकाव्या म्हणून आजींच्या पाककृतींमध्ये जास्त साखर घालण्यावर भर होता. जर साखर पावडर स्वरूपात ठेवली तर तिचे आयुष्य काही प्रमाणात कमी होऊ शकते. म्हणूनच साखर पावडर हवाबंद डब्यात ठेवली जाते असे म्हणतात.

ब्रिघम यंग युनिव्हर्सिटीमध्ये Brigham Young University झालेल्या एका संशोधनात असे समोर आले आहे की, बीन्स म्हणजेच राजमा, सोया, हरभरा यासारख्या गोष्टीही 30 वर्षापूर्वी खराब होत नाहीत. त्यात आढळणारी प्रथिने आणि इतर पोषक तत्वेही तशीच राहतात.

पावडर दूध देखील या श्रेणीचे आहे. शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे की या दुधाची चव आणि पौष्टिकता ताज्या दुधापेक्षा खूपच कमी आहे, परंतु तरीही या दुधाला प्राधान्य दिले जाते कारण ते कितीही महिने साठवले जाऊ शकते.

दारूसुद्धा कधीच खराब होत नाही. एकदा उघडल्यानंतर, ऑक्सिडेशन म्हणजेच हवेच्या प्रतिक्रियेमुळे त्याची चव बदलते. शिवाय याचं प्रमाण देखील हळूहळू कमी होऊ लागते. यामुळेच वाइन प्रेमी ते मोठ्या थाटात साठवतात.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.