मराठी बातम्या /बातम्या /heatlh /

Weight gain tips : काही केल्या वजन वाढेना; उत्तम शरीरयष्टीसाठी आता हे उपाय एकदा करूनच पाहा

Weight gain tips : काही केल्या वजन वाढेना; उत्तम शरीरयष्टीसाठी आता हे उपाय एकदा करूनच पाहा

प्रतीकात्मक फोटो

प्रतीकात्मक फोटो

लठ्ठपणा कमी करणं हे जितकं कठीण काम आहे, तितकंच कठीण आहे वजन वाढवणं.

  • Trending Desk
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई, 31 ऑगस्ट :  वजन (weight) वाढणं ही जशी सर्वसामान्य समस्या (common problem) आहे, त्याचप्रमाणे वजन न वाढणं, वजन कमी असणं हीदेखील मोठी समस्या आहे. अनेक जण वजन न वाढल्याने त्रस्त असतात. कितीही खाल्लं तरी वजन वाढत नाही, अशी अनेकांची समस्या असते. लठ्ठपणा (obesity) कमी करणं हे जितकं कठीण (difficult) काम आहे, तितकंच कठीण आहे वजन वाढवणं. (weight gain) तुम्हाला माहिती आहे का, की अशा अनेक गोष्टी आहेत, की ज्या वजन वाढवण्यासाठी मदत करतात.

वजन कमी असल्यामुळे किंवा बारीक असण्यामुळे अनेक आरोग्य समस्या उद्भवू शकतात. कारण खूप कमी कॅलरीज खाल्ल्याने शरीराला पुरेसं पोषण मिळत नाही. त्यामुळे चयापचय (metabolism) मंदावतं आणि रोगप्रतिकारशक्तीदेखील कमकुवत होते. अशा परिस्थितीत असे अनेक पदार्थ आहेत, ज्यांचं सेवन सातत्याने केल्यास वजन वाढवण्यासाठी मदत होऊ शकते. चला तर मग हे पदार्थ नेमके कोणते आहेत, हे जाणून घेऊ या.

1. तांदूळ वजन वाढवण्यासाठी खूप फायद्याचे आहेत. तांदूळ जगभरात सहज उपलब्ध होतात. अनेक जणांचे मुख्य अन्न तांदूळ आहे. योग्य प्रमाणात कार्बोहायड्रेट्ससह वजन वाढवण्यासाठी भात हा एक सोपा स्रोत आहे. तुम्ही त्यात बटर, ग्रेव्ही, पनीर आणि अंडी यांसारखे पदार्थ चवीनुसार, आवडीनुसार मिक्स करू शकता.

हे वाचा - Belly Fat Prevention : रोजच्या सवयींमध्ये करा हे छोटे बदल, कधीच वाढणार नाही बेली फॅट

2. सुका मेवा किंवा नट्स हा निरोगी, चवदार आणि कॅलरीयुक्त स्नॅक्स आहे. ते वजन वाढवण्यासाठी तुम्ही दिवसाच्या कोणत्याही वेळी सेवन करू शकता. कच्च्या बदामामध्ये कॅलरीज आणि भरपूर प्रथिनं आणि फायबर्स असतात.

3. बटाटे वजन वाढवण्यास आणि स्नायूंमधलं ग्लायकोजेन वाढविण्यास मदत करतात. बटाटे हा फायबर्सचा एक महत्त्वाचा स्रोत आहे, जो आतड्यांतल्या बॅक्टेरियाजचं पोषण करण्यास मदत करतो.

4. साल्मनसारख्या अनेक प्रकारच्या फॅटी माशांमध्ये अँटिऑक्सिडंट्स आणि ओमेगा - 3 फॅटी आम्ल असतं. ते वजन वाढवण्यासाठी खूप उपयुक्त असतं. फॅटी मासे रोगप्रतिकारशक्ती चांगली आणि निरोगी ठेवण्यास मदत करतात.

5. तुम्ही घरी बनवलेल्या स्मूदीमध्ये तुमच्या इच्छेनुसार कॅलरीज वाढवू शकता. हा अत्यंत पौष्टिक आणि वजन वाढवण्याचा सोपा मार्ग आहे. केळी, सुका मेवा, नट्स, बेरी, सफरचंद आदीपासून बनवलेल्या स्मूदीज काही किलो वजन वाढवण्यासाठी आवश्यक असलेल्या कॅलरीज आणि पोषण प्रदान करतात.

हे वाचा - जीममध्ये वजन घटवायला गेलेल्या महिलेची झाली भयंकर अवस्था; बोलवावे लागले पोलीस

6. स्नायू तयार करण्यासाठी सर्वांत प्रभावी गोष्टींपैकी एक म्हणजे रेड मीट. आहारात रेड मीटचा समावेश केल्यास वजन वाढण्यास मदत होईल.

अर्थात वजन वाढवताना हेसुद्धा लक्षात ठेवलं पाहिजे, की आपलं वजन हेल्दी पद्धतीने वाढेल. त्यासाठी हेल्दी पद्धतीने वजन वाढण्याच्या अनुषंगाने पोषकतत्त्वं असलेल्या पदार्थांचाच खाण्यात समावेश करा.

First published:

Tags: Lifestyle, Weight, Weight gain