जाहिरात
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / हेल्थ / चीनमधून आणखी एका महामारीचा धोका? पहिल्यांदाच माणसामध्ये आढळला बर्ड फ्लूचा संसर्ग

चीनमधून आणखी एका महामारीचा धोका? पहिल्यांदाच माणसामध्ये आढळला बर्ड फ्लूचा संसर्ग

चीनमधून आणखी एका महामारीचा धोका? पहिल्यांदाच माणसामध्ये आढळला बर्ड फ्लूचा संसर्ग

प्रथमच, मानवामध्ये एच3एन8 (H3N8) बर्ड फ्लूचा संसर्ग आढळून आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, चीनच्या हेनान प्रांतात (Henan province) बर्ड फ्लूच्या H3N8 स्ट्रेनचा पहिला मानवी संसर्गाची नोंद झाली आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

**बीजिंग, 27 एप्रिल :**जगात प्रथमच, मानवामध्ये एच3एन8 (H3N8) बर्ड फ्लूचा संसर्ग आढळून आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, चीनच्या हेनान प्रांतात (Henan province) बर्ड फ्लूच्या H3N8 स्ट्रेनचा पहिला मानवी संसर्गाची नोंद झाली आहे. माध्यमांच्या अहवालानुसार, मंगळवारी ही माहिती समोर आली आहे. त्याच वेळी, चीनच्या राष्ट्रीय आरोग्य आयोगाने (NHC) जारी केलेल्या निवेदनात ही बाब घोषित करण्यात आली आहे. पण त्याचवेळी लोकांमध्ये त्याचा प्रसार होण्याचा धोका कमी असल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे घाबरण्यासारखे काही नाही. H3N8 बद्दल अधिक माहिती देताना चीनच्या नॅशनल हेल्थ कमिशनने सांगितले की, एका चार वर्षांच्या मुलाला याचा त्रास झाला होता. NHC नुसार, तापासह अनेक लक्षणे विकसित झाल्यानंतर मुलाला H3N8 विषाणूची लागण झाल्याचे आढळून आले. त्यांच्या संपर्कात आलेली कोणतीही व्यक्ती या विषाणूच्या विळख्यात आली नाही, ही दिलासादायक बाब आहे. NHC नुसार, मुलगा त्याच्या घरात पाळलेल्या कोंबड्या आणि कावळ्यांच्या संपर्कात आला होता. त्यानंतर त्याच्यामध्ये तापासह अनेक लक्षणे दिसली आणि तपासणीत त्याला संसर्ग झाल्याचे आढळून आले. हेही वाचा -  Coronavirus: देशातील विविध भागांत कोरोना बाधितांच्या संख्येत होतेय वाढ; महाराष्ट्रात पुन्हा मास्क सक्ती होणार? महामारीचा धोका कमी - आरोग्य आयोगाने सांगितले की H3N8 प्रकार घोडे, कुत्रे आणि पक्ष्यांमध्ये जगात प्रथम आढळला आहे. तथापि, H3N8 चे कोणतेही मानवी प्रकरण नोंदवले गेले नाही. म्हणजेच ही जगातील पहिली मानवी केस आहे. या प्रकारात अद्याप मानवांना प्रभावीपणे संक्रमित करण्याची क्षमता नव्हती. अशा स्थितीत मोठ्या प्रमाणावर साथीचे आजार होण्याचा धोका कमी आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: bird flu , china
  • First Published :
जाहिरात
जाहिरात