मराठी बातम्या /बातम्या /heatlh /

डोळे देतात गंभीर आजारांचे संकेत; ‘ही’ लक्षणं दिसल्यास ताबडतोब घ्या तज्ज्ञांचा सल्ला

डोळे देतात गंभीर आजारांचे संकेत; ‘ही’ लक्षणं दिसल्यास ताबडतोब घ्या तज्ज्ञांचा सल्ला

प्रत्येक मोठ्या आजाराची लक्षणं शरीरात दिसत असतात. शरीर आतल्या बदलांचे संकेत देत असतं

प्रत्येक मोठ्या आजाराची लक्षणं शरीरात दिसत असतात. शरीर आतल्या बदलांचे संकेत देत असतं

प्रत्येक मोठ्या आजाराची लक्षणं शरीरात दिसत असतात. शरीर आतल्या बदलांचे संकेत देत असतं

मुंबई, 9 जुलै : अनेक वेळा आपण आपल्या शरीरात होणारे बदल किंवा त्रास गांभीर्याने घेत नाही. अगदी अंथरुणावर पडायची वेळ आली, की मग शरीराकडे लक्ष देतो आणि तोपर्यंत आजाराने गंभीर रूप घेतलेलं असतं. खरं तर प्रत्येक मोठ्या आजाराची लक्षणं शरीरात दिसत असतात. शरीर आतल्या बदलांचे संकेत देत असतं; पण रोजच्या धावपळीत आपल्याला त्याकडे लक्ष द्यायला वेळ मिळत नाही. शरीरातल्या इतर अवयवांप्रमाणेच आपले डोळेदेखील (Eyes) अनेक आजारांचे आणि शरीरातल्या बदलांचे संकेत देतात. आपण त्या संकेतांकडे दुर्लक्ष न करता ते गांभीर्याने घ्यायला हवेत. या संदर्भात माहिती देणारं वृत्त 'आज तक'ने प्रसिद्ध केलं आहे.

अनेकांना नीट दिसत नाही किंवा डोळ्यांमध्ये वेदना होतात. अस्पष्ट दिसत असेल किंवा रेषा दिसत असतील तर ताबडतोब डोळ्यांची तपासणी करून घ्यावी. डोळ्यांद्वारे कोणाच्याही आरोग्यबद्दल कळू शकतं, असं तज्ज्ञ सांगतात. एखाद्या व्यक्तीला बऱ्याच काळापासून डोळ्यांमध्ये काही समस्या असेल, तर ते गंभीर आजाराचं लक्षण असू शकतं. डोळ्यांमध्ये खालीलपैकी कोणतीही लक्षणं दिसली तर ताबडतोब डॉक्टरांची भेट घ्या.

डोळे फडफडणं

अल्कोहोल, कॅफीन किंवा निकोटीनच्या अतिसेवनामुळे डोळे फडफडतात. ही बाब सामान्य आहे; पण एखाद्याचे डोळे यातलं कोणतंही कारण नसताना वारंवार फडफडत असतील तर ते बर्नआउटचं (Burn Out) लक्षण असू शकते. बर्नआउट म्हणजे शारीरिक थकवा. तुमचे डोळे सतत फडफडत असतील, तर तुम्हाला शारीरिक श्रम आणि तणाव कमी करण्याची गरज आहे, असा त्याचा अर्थ होतो.

डोळ्यांत पांढरे डाग

तज्ज्ञांच्या मते, एखाद्याच्या कॉर्नियावर पांढरे डाग (White Spot) दिसत असतील, तर ते कॉर्नियाच्या संसर्गाचं लक्षण असू शकतं. यामुळे हळूहळू डोळ्यांना नुकसान होऊ शकतं. म्हणून डोळ्यांत पांढरे डाग आढळल्यास डोळ्यांच्या डॉक्टरांना भेटा.

अस्पष्ट दिसणं

डोळ्यांनी अस्पष्ट दिसणे हे मधुमेह (Diabetics) आणि मोतिबिंदूचंही लक्षण असू शकतं. हाय ब्लड शुगरमुळे रेटिनाच्या रक्तवाहिन्यांना नुकसान होऊ शकतं. अशा स्थितीत डॅमेज झालेल्या रक्तवाहिन्या सुजतात, त्यातून रक्त येऊ लागतं किंवा त्यातून एक द्रव बाहेर पडू लागतो. यामुळे स्पष्ट दिसत नाही. दोन्ही किंवा एका डोळ्याने अस्पष्ट दिसू लागतं. तसंच मोतिबिंदू डोळ्यांत प्रकाश जाऊ देत नाही. त्यामुळे अस्पष्ट दिसण्याचा त्रास होऊ शकतो.

घामाघूम होईपर्यंत व्यायाम करणाऱ्यांना कोव्हिड धोका? वाचण्यासाठी 'हा' आहे सोपा पर्याय

डोळे सुजणं किंवा लाल होणं

अ‍ॅलर्जी, संसर्ग किंवा थकव्यामुळे उठल्यानंतर तुमचे डोळे सुजलेले (Red Eyes) आणि लाल दिसू शकतात. त्यामुळे तुम्ही आराम करायला हवा.

रिंग्ज

एखाद्या व्यक्तीच्या डोळ्याच्या कॉर्नियावर विशेष प्रकारच्या रिंग्ज दिसत असतील तर ते हाय कोलेस्टेरॉलचं लक्षण असू शकतं. तुमचं कोलेस्टेरॉल जास्त असल्यास त्याचं लक्षण डोळ्यांत दिसू लागतं. लिपिड कॉर्नियाच्या बाहेरच्या बाजूस एक रिंग तयार होऊ लागते. 40 वर्षांपेक्षा कमी वयाच्या व्यक्तींनी अशा संकेतांकडे विशेष लक्ष दिलं पाहिजं. डोळ्यांत अशा रिंग्ज दिसल्यास ताबडतोब डोळ्यांच्या तज्ज्ञांशी संपर्क साधायला हवा.

First published:

Tags: Eyes damage, Health, Health Tips