जाहिरात
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / हेल्थ / संत्री खाऊन साली फेकून देताय....थांबा! जाणून घ्या आश्चर्यकारक फायदे

संत्री खाऊन साली फेकून देताय....थांबा! जाणून घ्या आश्चर्यकारक फायदे

संत्रा:
संत्रा हा व्हिटॅमिन सीचा चांगला स्रोत मानला जातो. रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करण्यासाठी संत्रा खाणे उपयुक्त ठरते. संत्रा शरीरातील पेशींना होणारे नुकसान टाळण्यासाठी प्रतिबंधित करतो. एक ग्लास संत्र्याच्या रसामध्ये 300 मिलीग्राम कॅल्शियम आढळते.

संत्रा: संत्रा हा व्हिटॅमिन सीचा चांगला स्रोत मानला जातो. रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करण्यासाठी संत्रा खाणे उपयुक्त ठरते. संत्रा शरीरातील पेशींना होणारे नुकसान टाळण्यासाठी प्रतिबंधित करतो. एक ग्लास संत्र्याच्या रसामध्ये 300 मिलीग्राम कॅल्शियम आढळते.

कोरोना काळात व्हिटॅमिन सी असणारी फळं खाण्याचा सल्ला बरेच डॉक्टर देत होते. लिंबूवर्गीय फळांमध्ये या व्हिटॅमिनचं प्रमाण भरपूर असतं. असंच एक फळ म्हणजे संत्रं. व्हिटॅमिन सीसोबतच संत्र्यामध्ये कॅल्शियम आणि फॉस्फेटचं प्रमाणही भरपूर (Orange Health Benefits) असतं. एकूणच संत्रं हे आपल्या आरोग्यासाठी अगदी फायदेशीर फळ आहे; पण या फळाची सालही आपल्यासाठी तेवढीच फायद्याची (Orange Peel benefits) आहे, असं सांगितलं तर? विश्वास बसत नसला, तरी हे खरं आहे.

     मुंबई, 14 मे-   कोरोना काळात व्हिटॅमिन सी असणारी फळं खाण्याचा सल्ला बरेच डॉक्टर देत होते. लिंबूवर्गीय फळांमध्ये या व्हिटॅमिनचं प्रमाण भरपूर असतं. असंच एक फळ म्हणजे संत्रं. व्हिटॅमिन सीसोबतच संत्र्यामध्ये कॅल्शियम आणि फॉस्फेटचं प्रमाणही भरपूर (Orange Health Benefits) असतं. एकूणच संत्रं हे आपल्या आरोग्यासाठी अगदी फायदेशीर फळ आहे; पण या फळाची सालही आपल्यासाठी तेवढीच फायद्याची (Orange Peel benefits) आहे, असं सांगितलं तर? विश्वास बसत नसला, तरी हे खरं आहे. तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, संत्र्याचा केवळ आतला गरच नव्हे, तर सालदेखील (Orange Peel) आपल्या शरीरासाठी भरपूर उपकारक ठरते. विशेषतः आपल्या त्वचेसाठी आणि केसांसाठी संत्र्याची साल वापरल्यास त्याचे उत्तम परिणाम दिसून येतात. संत्र्याची साल (Orange Peel usefulness) कशासाठी उपयुक्त आहे, हे जाणून घेऊ या. या बाबतची माहिती देणारं वृत्त ‘झी न्यूज’ने प्रसिद्ध केलं आहे. त्वचा आणि केस तुमची त्वचा ऑयली (Orange Peel for skin) असली, तर संत्र्याची साल तुमच्यासाठी भरपूर फायद्याची ठरू शकते. ही साल वाळवून, त्याची पावडर करून ती मधात मिसळावी. हे मिश्रण चेहऱ्यावर लावावं आणि काही वेळाने धुऊन टाकावं. यामुळे तुमच्या चेहऱ्यावर चमक येईल, तसंच विविध प्रकारचे डागदेखील दूर होतील. केसांसाठीही संत्र्याची साल अगदी वरदान (Orange peel for hair) ठरते. संत्र्याच्या सालीची पावडर आणि मधाचं मिश्रण केसांना लावल्यास ते नैसर्गिक कंडिशनरप्रमाणे काम करतं. यामुळे तुमचे केस मऊ होतात. तसंच, बाजारात मिळणारी केमिकलयुक्त कंडिशनर वापरण्यात असलेला धोकाही दूर होतो. सोबतच, केसांतला कोंडा दूर करण्यासाठीही याचा फायदा होतो. केसांतला कोंडा दूर करण्यासाठी संत्र्याच्या सालीची पावडर खोबरेल तेलात मिसळावी. हे मिश्रण केसांत लावल्याने कोंडा दूर होतो. इम्युनिटी बूस्टर केवळ संत्र्याचा गरच नाही, तर संत्र्याच्या सालीमध्येही रोगप्रतिकारक गुण (Orange Peel health benefits) असतात. संत्र्याची सालं थेट न खाता, ती गरम पाण्यात धुऊन खावीत. कित्येक जण त्यावर साखर आणि लिंबू लावूनही खातात. यामुळे संत्र्याच्या सालीला चांगली चव येते. संत्र्याची साल खाल्ल्यामुळे जळजळ थांबते.

    News18

    झोपेसाठी होतो फायदा संत्र्याची साल खाण्याचा झोपेसाठीही (Orange Peel sleep benefits) फायदा होतो. झोप येत नसेल किंवा शांत झोप होत नसेल, तर संत्र्याच्या साली पाण्यात घालून त्याचं मिश्रण दररोज प्यायल्यास झोपेचं वेळापत्रक व्यवस्थित रुळावर येईल.एकूणच संत्रं हे सर्वच बाबतीत फायदेशीर फळ आहे. त्यामुळे इथून पुढे संत्र्याच्या साली फेकण्यापूर्वी नक्कीच विचार कराल.

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात