मराठी बातम्या /बातम्या /heatlh /व्यायाम करूनही वजन कमी होत नाही?, व्यायामासह हा आहार ठरेल फायदेशीर

व्यायाम करूनही वजन कमी होत नाही?, व्यायामासह हा आहार ठरेल फायदेशीर

वजन कमी करण्याच्या टिप्स

वजन कमी करण्याच्या टिप्स

वाढलेल्या वजनामुळे तुमच्या आयुष्यात अनेक अडचणी निर्माण होऊ शकतात. वास्तविक पाहता लठ्ठपणा हा विशिष्ट आजार नाही. पण या कारणामुळे अनेक आजार जडण्याची शक्यता नाकारता येत नाही.

  • Trending Desk
  • Last Updated :
  • Mumbai, India

    नवी दिल्ली, 15 ऑक्टोबर: अनियमित जीवनशैली, असंतुलित आहार व व्यायामाच्या अभावामुळे सध्या स्थुलतेचं प्रमाण वाढत चाललं आहे. व्यक्तीचं वजन वाढायला लागलं, की त्याला हृदयविकार, डायबेटिससारखे आजार जडतात. लठ्ठपणा हा फक्त वयस्कर व्यक्तींमध्येच नाही तर अगदी कमी वयातही पाहायला मिळत आहे. वाढलेलं वजन कमी करण्यासाठी अनेकजण जीममध्ये जातात किंवा ना ना तऱ्हेची महागडी औषधं घेतात. परंतु, त्याचा काहीही परिणाम दिसून येत नाही. पोटाचा घेर कमी होण्याऐवजी तो कायमच राहतो. वजन घटवण्यासाठी आहारावर लक्ष देणं फार महत्त्वाचं असतं. ‘झी न्यूज हिंदी’नं यासंदर्भात वृत्त दिलं आहे.

    वाढलेल्या वजनामुळे तुमच्या आयुष्यात अनेक अडचणी निर्माण होऊ शकतात. वास्तविक पाहता लठ्ठपणा हा विशिष्ट आजार नाही. पण या कारणामुळे अनेक आजार जडण्याची शक्यता नाकारता येत नाही. रक्तातील कॉलेस्टेरॉल वाढल्याने हाय ब्लड प्रेशर म्हणजेच रक्तदाब वाढणं, डायबेटिस, कोरोनरी आर्टरी डिसीज अर्थात हृदयाकडे रक्त पुरवठा करणाऱ्या धमन्यांचा विकार आणि ट्रिपल व्हेसल डिसीज असे आजार होऊ शकतात. वजन कमी करण्यासाठी बहुतांश वेळा हेवी वर्कआउटचा आधार घेतला जातो. दररोज तास न तास व्यायाम केल्यानंतरही वजन कमी होत नाही तेव्हा व्यक्ती निराश व्हायला लागते. पण अशा वेळी व्यायामासोबतच संतुलित आहारावर लक्ष देणंही तितकंच गरजेचं असतं.

    हेही वाचा -  ताप डेंग्यूचा आहे की साधा? लक्षणांमधील या फरकांवरून सहज ओळखा येतं

    संतुलित आहाराद्वारे असं करा वजन कमी

    वजन कमी करण्यासंदर्भात ग्रेटर नोएडातील GIMS रुग्णालयातील प्रसिद्ध आहारातज्ज्ञ डॉ. आयुषी यादव यांनी अनेक महत्त्वाच्या गोष्टी सांगितल्या. त्या म्हणाल्या की, भारतात तळलेले पदार्थ अधिक प्रमाणात खाण्याची सवय दिसून येते. वजन वाढण्यासाठी असे पदार्थ कारणीभूत असतात. वजन वाढू नये असं वाटत असेल तर नाश्ता, दुपारचं आणि रात्रीच्या जेवणात शरीराला आरोग्यदायी असणारे अन्न पदार्थ असणं आवश्यक आहे. विशेषत: आहारात हिरव्या पालेभाज्या, ताजी फळं आदींचा समावेश असावा.

    स्नॅक्स म्हणून आहारात ड्रायफ्रूट्सचं सेवन करू शकता. यात आरोग्यदायी फॅट, प्रोटिन, फायबर आणि काही महत्त्वाची जीवनसत्वंही असतात. याचं सेवन केल्यानं आरोग्याला अनेक फायदे मिळू शकतात. पोटाची आणि कमरेची चरबी कमी करण्यासाठीही याची चांगली मदत होऊ शकते.

    नाश्त्यात ओट्सचा समावेश असावा

    लठ्ठपणा असलेल्या व्यक्तीचा नाश्ता हा आरोग्यदायी असायला हवा. विशेषत: तेल, तुपापासून बनवलेले पदार्थ टाळायला हवेत. नाश्त्यामध्ये ओट्स हा उत्तम पर्याय आहे. ओट्समुळे टाईप-2 डायबेटिसचा धोका बऱ्याचअंशी कमी होतो. या शिवाय दररोजच्या आहारात बेरीचा समावेश करावा. बेरीमध्ये फायबर अधिक प्रमाणात असतं. याचं सेवन केल्यानं बराच वेळ भूक लागत नाही. वजन कमी करण्यासाठी याचाही चांगला फायदा होऊ शकतो.

    दरम्यान, नियमित व्यायाम व संतुलित आहार न घेतल्याने स्थूलत्व येऊ शकतं. यामुळे अनेक आजारांनाही निमंत्रण मिळतं. परंतु आपण स्थूल आहोत म्हणजे हा मोठा गुन्हा आहे, असं समजून स्वत:ला दोष देत बसण्यापेक्षा सकारात्मक जीवन जगण्यासाठी प्रयत्न करायला हवेत व संतुलित आहार घेऊन निरोगी राहण्याचा प्रयत्न करायला हवा.

    First published:

    Tags: Lifestyle, Weight, Weight loss