लंडन, 25 मार्च : एखादा तुटलेला अवयव जोडल्याची काही प्रकरणं तुम्हाला माहिती आहेत. आपल्याला हे अशक्य आणि अवघड वाटत असलं तरी डॉक्टर हा चमत्कार करून दाखवतात. पण आता डॉक्टरांनी केलेल्या एका विचित्र सर्जरीचं प्रकरण समोर आलं आहे. यूकेतील डॉक्टरांनी एका महिलेचा हात तिच्या पोटातच शिवला आहे. यामागील कारणही तितकंच धक्कादायक आहे. यूकेच्या पीटरबरोमध्ये राहणाऱ्या 34 वर्षीय सॅडी केम्पोच्या पोटात अचानक वेदना होऊ लागल्या. ती तात्काळ रुग्णालयात गेली. तिथं तिला पेनकिलर दिली आणि बरं वाटलं नाही तर पुन्हा यायला सांगून घरी पाठवलं. दुसऱ्याच दिवशी ती पुन्हा रुग्णालयात पोहोचली. त्यानंतर दोन आठवडे ती बेशुद्धावस्थेत होती. डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार सॅडीला किडनी स्टोन होता आणि त्यामुळेच तिला वेदना होत होत्या. यामुळे तिला इन्फेक्शन झालं होतं आणि त्याचं रूपांतर सेप्सिसमध्ये झालं. सेप्सिस एक जीवघेणी समस्या आहे. ज्यामुळे शरीर स्वतःच्याच टिश्यू आणि ऑर्गनवर हल्ला करू लागतात. हे वाचा - कसं शक्य आहे? ना प्रेग्नन्सीची लक्षणं, ना बेबी बम्प; रात्री पोटात वेदना झाल्या आणि सकाळी महिलेने अचानक दिला बाळाला जन्म न्यूयॉर्क पोस्ट च्या रिपोर्टनुसार सेप्सिसपासून सॅडीचा जीव वाचवण्यासाठी सुरुवातीला डॉक्टरांनी तिच्या हाताची बोटं कापली त्यानंतर तिचा तो हात पोटाच्या एका भागाला जोडला, जेणेकरून तिच्या हाताला रक्तपुरवठा होत राहिल. जेव्हा तिचा हात पोटातून बाहेर काढला तेव्हा तो खूप विचित्र दिसू लागला. सॅडीने सांगितलं, तिचा नवा हात शार्कसारखा दिसतो आहे. जेव्हा मी माझा हात पहिल्यांदा पाहिला आणि त्याचं बोट हलवण्याचा प्रयत्न करू लागली तेव्हा मला धक्काच बसला. माझा हात शार्कसारखा दिसत होता. जीवघेण्या आजारापासून या महिलेला वाचवण्यासाठी तिच्यावर विचित्र सर्जरी करण्यात आली आणि या सर्जरीनंतर या तिचा हात असा शार्कसारखा दिसू लागला आहे (Woman hand look like shark). हे वाचा - अर्धांगवायूमुळे 7 वर्ष बोलू शकला नाही; ऑपरेशन होताच केली अशी मागणी की डॉक्टरही शॉक सॅडी म्हणाली, सेप्सिसमुळे खूप काही गमावलं. माझा हात, एक रिलेशनशिप आणि स्वावलंबत्व. हा आजार कुणालाच होऊ नये असं मला वाटतं, त्यामुळे याबाबत मला लोकांना जागरूक करायचं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.