जाहिरात
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / हेल्थ / Monkeypox : त्वचेवर आलेले फोड मंकीपॉक्स आणि चिकनपॉक्स; कसा ओळखायचा फरक?

Monkeypox : त्वचेवर आलेले फोड मंकीपॉक्स आणि चिकनपॉक्स; कसा ओळखायचा फरक?

प्रतीकात्मक फोटो (सौजन्य - Shutterstock)

प्रतीकात्मक फोटो (सौजन्य - Shutterstock)

मंकीपॉक्स आणि चिकनपॉक्स म्हणजे कांजण्या या दोन्ही आजारांची लक्षणं काहीशी सारखीच आहेत. त्यामुळे हे दोन्ही आजार एकच आहेत, असा चुकीचा समज लोकांमध्ये दिसतो.

  • -MIN READ Trending Desk
  • Last Updated :

    मुंबई, 01 ऑगस्ट : जगभरात कोरोनानंतर (Corona) आता मंकीपॉक्स (Monkeypox) या विषाणूजन्य आजाराचा (Viral Disease) संसर्ग वाढत असल्याने चिंतेचं सावट पसरलं आहे. भारतासह अनेक देशांमध्ये मंकीपॉक्सचे रुग्ण आढळून आले आहेत. मंकीपॉक्सचा वाढता संसर्ग पाहता डब्ल्यूएचओ (WHO) अर्थात, जागतिक आरोग्य संघटनानं `जागतिक आणिबाणी` घोषित केली आहे. मंकीपॉक्स आणि चिकनपॉक्स म्हणजे कांजिण्या (Chickenpox) या दोन्ही आजारांची लक्षणं (Symptoms) काहीशी सारखीच आहेत. त्यामुळे हे दोन्ही आजार एकच आहेत, असा चुकीचा समज लोकांमध्ये दिसतो. परंतु, या दोन्ही विषाणूजन्य आजारांची लक्षणं रुग्णांमध्ये दिसण्याच्या पद्धतीत फरक आहे, असं वैद्यकीय तज्ज्ञ सांगतात. त्यामुळे हे दोन्ही आजार वेगवेगळे आहेत. मंकीपॉक्स हा एक व्हायरल जुनोसिस अर्थात जनावरांकडून माणसांमध्ये पसरणारा आजार आहे. देवीच्या रुग्णांमध्ये जी लक्षणं पूर्वीच्या काळी दिसत होती, तशीच लक्षणं या आजारात दिसतात; पण वैद्यकीयदृष्ट्या ती कमी गंभीर आहेत. गेल्या आठवड्यात दिल्लीतल्या लोकनायक जयप्रकाश रुग्णालयात ताप आणि पुरळ अशी लक्षणं असलेला रुग्ण दाखला झाला. परंतु, त्या संशयित रुग्णाला मंकीपॉक्सचा संसर्ग झाला नसल्याचं स्पष्ट झालं. मात्र या रुग्णाला कांजिण्या झाल्याचं आढळून आलं. त्याचप्रमाणे बंगळुरूला गेलेल्या इथिओपियन नागरिकाची लक्षणं दिसत असल्याने चाचणी केली असता, त्याला कांजिण्या झाल्याचं स्पष्ट झालं. भारतात आतापर्यंत मंकीपॉक्सचे चार रुग्ण आढळून आले आहेत. त्यापैकी तीन रुग्ण केरळमध्ये तर एक रुग्ण दिल्लीत आढळला. हे वाचा -  Alert! भारतात खतरनाक होतोय Monkeypox; 24 तासांत 2 धक्कादायक बातम्या मंकीपॉक्स आणि चिकनपॉक्सची लक्षणं काहीशी सारखीच आहेत. त्यामुळे निदान करताना काहीसा गोंधळ होत असल्याचं दिसून येतो. पण या दोन्ही आजारांच्या लक्षणांमध्ये फरक आहे. लाइव्ह हिंदुस्तान च्या रिपोर्टनुसार याबाबत फोर्टिस मेमोरियल रिसर्च इन्स्टिट्यूटचे इंटरनल मेडिसीन विभागाचे संचालक डॉ. सतीश कौल यांनी माहिती दिली आहे. डॉ. कौल म्हणाले, ``मंकीपॉक्सच्या जखमा (Wounds) या कांजिण्या आजाराच्या जखमांच्या तुलनेत मोठ्या असतात. मंकीपॉक्स झालेल्या रुग्णाच्या हात आणि तळव्यांवर जखमा दिसून येतात. कांजिण्यामुळे अंगावर उठलेली पुरळ (Rashes) सात ते आठ दिवसात कमी होऊ लागते. पण मंकीपॉक्समध्ये असं होत नाही. कांजण्यामुळे झालेल्या जखमांना खाज सुटते. मंकीपॉक्समध्ये हे लक्षण दिसत नाही. `` ``मंकीपॉक्सचा विषाणू पसरण्यासाठी जनावरांची आवश्यकता असते. पण या विषाणूची लक्षणं घसा खवखवणं, ताप आदींपर्यंत मर्यादित राहतात. या आजारात अंगावर उठलेल्या पुरळमध्ये द्रव पदार्थ दिसून येतो. हेच या आजाराचं प्रमुख लक्षण असतं. यामुळे विषाणू फैलावतो आणि शरीरातील रोगप्रतिकार शक्ती कमकुवत करतो. परंतु, त्याच्या जटिलतेमुळं समस्या उद्भवतात. कोणत्याही प्रकारचा जीवाणू संसर्ग पू असल्याने वाढतो आणि त्यामुळे शरीरात आणखी गुंतागुत निर्माण होते,`` अशी माहिती बत्रा रुग्णालयाचे वैद्यकीय संचालक डॉ. एससीएल गुप्ता यांनी दिली. हे वाचा -  Monkeypox first death in India : भारतात मंकीपॉक्सचा पहिला बळी; 22 वर्षांच्या तरुणाचा मृत्यू मेंदाता रुग्णालयातल्या डरमॅटॉलॉजी विभागाचे व्हिजिटिंग कन्सल्टंट डॉ. रमणजित सिंग यांनी मंकीपॉक्सच्या लक्षणांबाबत माहिती दिली. ते म्हणाले, ``ताप, अस्वस्थता, डोकेदुखी, घसा खवखवणं, खोकला, लिम्फडेनोपॅथी (लिम्फनोड्सला (Lymph Nodes) सूज येणं) ही मंकीपॉक्सची सुरुवातीची लक्षणं आहेत. ही सर्व लक्षणं त्वचेवर जखमा, पुरळ आणि इतर समस्यांपूर्वी चार दिवस आधी दिसतात. या जखमा, पुरळ हात आणि डोळ्यांपासून सुरू होतात आणि नंतर संपूर्ण शरीरावर पसरतात.`` ``पावसाळ्यात विषाणू संसर्गाचा धोका अधिक असतो. या काळात कांजिण्याचे रुग्ण अन्य संसर्गासह मोठ्या प्रमाणात दिसतात. या रुग्णांमध्ये पुरळ आणि मळमळ यांसारखी लक्षणं देखील दिसतात. या स्थितीमुळे काही रुग्ण गोंधळून जातात आणि कांजिण्याला मंकीपॉक्स समजतात. रुग्णाला मंकीपॉक्स झाला आहे की नाही हे त्याचा क्रम आणि लक्षणं समजून घेऊन ठरवला जातो,`` असं डॉ. रमणजित सिंग यांनी सांगितलं.

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात