जगातील सर्वांत मोठ्या कोविड-19 लसीकरण मोहिमांपैकी एक मोहीम भारतात चालू आहे आणि 6 मेपर्यंत लसीचे 16 कोटींपेक्षाही अधिक डोस देण्यात आले आहेत. लास ही या महामारीतून बाहेर पडण्यासाठी एक उत्तम धोरण देते. कोविड-19 लसीच्या सुरक्षितता आणि सामर्थ्य यासंबंधीची माहिती उपलब्ध असुनही देशभरात दिल्या जात असलेल्या लसींबद्दल लोकांच्या मनात शंका आणि अज्ञान आहे. हे विशेषकरून जेथे तंत्रज्ञान पुरेशा प्रमाणात पोहचू शकलेले नाही व कोविड सुसंगत वर्तन(CAB) किंवा लसींविषयीचे सरकारी संदेश मर्यादित प्रमाणात पोहचतात अशा भारतातील ग्रामीण आणि आदिवासी भागांमध्ये याचे प्रमाण जास्त आहे.
आणि म्हणूनच लस सर्वांपर्यंत पोहचवण्याच्या बरोबरीनेच ग्रामीण भारतामध्ये प्रभावी संप्रेषण आणि जनजागृतीचे धोरण अवलंबले आहे, जेणेकरून वेळोवेळी लसीविषयी अचूक आणि पारदर्शक माहितीचा प्रसार होऊ शकेल. यामुळे लसीविषयीचा संकोच दूर होईल, शंका मावळतील, स्वीकृती वाढेल आणि अधिक नागरिकांना लस घेण्यासाठी उत्तेजन मिळेल. अशा एखाद्या धोरणासाठी भौगोलिकदृष्ट्या पोहचण्यास अवघड असलेल्या आणि तंत्रज्ञानाचा अभाव असलेल्या गावांपर्यंत पोहचण्याचा एक विकेंद्रित दृष्टीकोन ठेवणे गरजेचे असते.सामुदायिक लसीकरण, कोविड-19 लसीविषयीचे गैरसमज दूर करणे, भय दूर करणे तसेच पात्र लोकसंख्येला लसीकरणासाठी नोंदणीची सुविधा उपलब्ध करून देणे यांची असलेली गरज ही संवेदनशील समुदायांकरिता चिंतेची बाब आहे. यासाठी ज्ञान, दृष्टीकोन आणि प्रत्यक्ष कृतीमध्ये सुधारणा करण्याची आवश्यकता आहे.
लसीकरणाविषयीचे ज्ञान: ग्रामीण भागांमध्ये, सर्वप्रथम समुदायांमध्ये लस म्हणजे काय आणि तिचा हेतू यांविषयी जनजागृती करणे महत्त्वाचे आहे. अशा प्राथमिक माहितीच्या अभावी लोक अफवा आणि गैरसमजांना बळी पडतात. यासाठी संदेश हे स्थानिक भाषेत असले पाहिजेत आणि समुदायांच्या सामाजिक-सांस्कृतिक पार्श्वभूमीनुसार संदर्भित केले पाहिजेत. तसेच राज्यानुसार बदल आणि ग्रामीण, आदिवासी, विमुक्त आणि धनहीन यांसारख्या असुरक्षित समुदायांना मार्गदर्शन करणे गरजेचे आहे.
दृष्टीकोन: अचूक ज्ञानामुळे लसीकरणाविषयीचा योग्य दृष्टीकोन प्राप्त होतो. तेव्हाच लोक पसरवल्या जाणाऱ्या गैरसमजांचे मूल्यांकन आणि अफवांचा सामना करू शकतील.
प्रत्यक्ष कृती: सुधारित ज्ञान आणि दृष्टीकोन समुदायातील सदस्यांच्या भूमिकांना प्रत्यक्ष कृतीला चालना देतो. या संदर्भात, याचा अर्थ असा की, लसीकरणासाठी नोंदणी करणे आणि वेळच्या वेळी दोन्ही डोस घेतले जातील याची काळजी घेणे.
ग्रामीण भागात लसीकरण चालवण्यामधील सर्वांत मोठे आव्हान म्हणजे तंत्रज्ञानाचा मर्यादित वापर आणि त्याहून तंत्रज्ञान वापरण्याविषयी समुदायांमध्ये असलेले मर्यादित ज्ञान. “को-विन डॅशबोर्ड म्हणजे काय?”, “मी नोंदणी कशी करू?”, “मी माझी अपॉईन्टमेंट कशी निश्चित करू?”, “माझ्या जवळचे लसीकरण केंद्र कोठे आहे?” असे प्रश्न सर्रास विचारले जातात. यामुळे तंत्रज्ञानाचा अत्याधिक वापर करणाऱ्या आणि पारंपारिक वैद्यकीय संदेश केंद्रित असलेल्या शहरी समुदायाच्या तुलनेने ग्रामीण समुदायांना हा एक मोठा तोटा होतो. समुदायातील सदस्यांसाठी नोंदणी उपलब्ध करून ही दरी भरून काढणे अत्यंत महत्त्वाचे आहे. ग्रामीण स्तरावर नोंदणी केंद्रे उभारून आणि लोकांना नोंदणी करण्यासाठी गती देण्याकरिता ग्राम पंचायत सदस्य, अंगणवाडी सेविका, आशा वर्कर्स, इ. महत्त्वाच्या प्रभावशाली व्यक्तींचा वापर करून हे करता येऊ शकते. सर्व वयोगटासाठी शासनातर्फे सर्वसमावेशक लसीकरण नोंदणीसाठी अनुमती मिळेपर्यंत हे एक महत्त्वाचे धोरण राहू शकते. ग्रामीण भारतापर्यंत लसीकरण पोहचवणे हे एक किचकट काम आहे. तरीही, विकेंद्रित योजना आणि समुदायावर आधारित दृष्टीकोन यांद्वारे हे मिळवता येऊ शकते. कोविड सुसंगत वर्तन (CAB) आणि लसीकरण हाच सामान्य स्थितीकडे नेणारा निश्चित आणि एकमेव मार्ग आहे याविषयी लोकांना सुशिक्षित करणे महत्त्वाचे आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Sanjeevani