जाहिरात
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / हेल्थ / Covid-19 : सी व्हिटॅमिन जास्त घेतल्यानेही होऊ शकतं नुकसान, तज्ज्ञांचं म्हणणं काय?

Covid-19 : सी व्हिटॅमिन जास्त घेतल्यानेही होऊ शकतं नुकसान, तज्ज्ञांचं म्हणणं काय?

Covid-19 : सी व्हिटॅमिन जास्त घेतल्यानेही होऊ शकतं नुकसान, तज्ज्ञांचं म्हणणं काय?

कोरोना विषाणूला आपल्यापासून दूर ठेवण्यासाठी विटामिन डी थ्री, कॅल्शियम, झिंक मल्टीविटामिन अशा गोळ्यांचा उपयोग अलिकडे केला जात आहेत. मात्र, कोणत्याही गोळ्या घेण्याचा एक ठरावीक कोर्स असतो.

  • -MIN READ
  • Last Updated :

नवी दिल्ली, 19 जून : कोरोनाविषाणूमुळे (Corona Virus) जगभरात हाहाकार माजला आहे. या विषाणूचे आता वेगवेगळे प्रकार समोर येऊ लागले आहेत. म्हणजेच त्याच्या स्वरुपात बदल होऊ लागला आहे. गेल्या वर्षी आलेल्या कोरोना विषाणूच्या पहिल्या लाटेपेक्षा दुसरी लाट अधिक गंभीर असल्याचे दिसून आले. कोरोना विषाणूपासून बचाव करण्यासाठी आपली प्रतिकारशक्ती चांगली असणे गरजेचे आहे, असे आता त्यात जवळपास सर्वांना समजले आहे. आणि त्यासाठी सी विटामिन आपल्याला योग्य प्रमाणात मिळणं आवश्यक आहे. कोरोना विषाणूमुळे अलीकडे अनेक जण सी-व्हिटॅमिन  (Vitamin C)  विषयी जागरूक झाल्याचे दिसून येत आहे. सी-व्हिटॅमिन हे मुख्यत्वे लिंबूवर्गीय फळांमध्ये मिळत असते. काहीजण सी विटामिनसाठी डॉक्टरांच्या सल्ल्याने गोळ्या घेतात. सध्या सी-व्हिटॅमिन विषयी अनेक जण जागरूक झाल्याचे दिसत आहे. मात्र, या विटामिनच्या अतिसेवनामुळे देखील काही दुष्परिणाम होऊ शकतात, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. कोरोना विषाणूला आपल्यापासून दूर ठेवण्यासाठी विटामिन डी थ्री, कॅल्शियम, झिंक मल्टीविटामिन अशा गोळ्यांचा उपयोग अलिकडे केला जात आहेत. मात्र, कोणत्याही गोळ्या घेण्याचा एक ठरावीक कोर्स असतो. त्याच्या पेक्षा जास्त प्रमाणात ह्या गोळ्या घेतल्यास त्यामुळे नुकसान होऊ शकते. आरएमएल रुग्णालयाचे डॉक्टर राजीव सूद यांनी सांगितले की, अशा प्रकारे विटामिनचे औषधांसाठी एका महिन्याचा कोर्स घेतला जातो. ही विटामिन्स मिळवण्यासाठी महिन्याभराचा कोर्स पुरेसा आहे. तसेच झिंकचा जास्त वापर धोकादायक ठरू शकतो, असेही त्यांनी सांगितले. सेवन प्रमाणात आवश्यक आहे 1950 आणि 1960 च्या दशकात व्हिटॅमिन सीच्या कमतरतेबद्दल बरेच अभ्यास झाले होते, त्यावेळी असं आढळले आहे की, कमी व्हिटॅमिन सी घेतल्यानं रुग्णालयात जास्त काळ दाखल व्हावं लागू शकतं. म्हणून दररोज 4 ते 6 ग्रॅम व्हिटॅमिन सी घेण्याची सूचना आहे. एका अभ्यासातून असे दिसून आले आहे की, इतक्या प्रमाणात व्हिटॅमिन घेतल्यास सर्दी आणि फ्लूची लक्षणे 85 टक्क्यांनी कमी होतात. फळांमधून व्हिटॅमिन जास्त प्रमाणात मिळेलच असे नाही. हे समजणे आवश्यक आहे की 20 संत्र्यांमध्ये 1 ग्रॅम व्हिटॅमिन सी मिळू शकते. आपल्याला त्याहून जास्त गरज आहे. हे वाचा -  बनावट लसीकरण : मुंबई पोलिसांनी पाचव्या आरोपीला पकडलं, रेल्वेनं बिहारला होता निघाला कोविड-19 च्या बाबतीत, फुफ्फुसांच्या नुकसानीचे मुख्य कारण म्हणजे जास्तीचे मुक्त रॅडिकल्स आणि ऑक्सिडेटिव्ह प्रेशर. व्हिटॅमिन सी एक शक्तिशाली अँटी-ऑक्सिडेंट आहे, जो या मुक्त रॅडिकल्सना निष्प्रभावी करून फुफ्फुसांना नुकसान पोहोचवू शकतो. जेव्हा ऑक्सिडेंट आणि अँटी-ऑक्सिडंट्समध्ये संतुलन नसते तेव्हा नुकसान होते आणि रुग्णांचा रोग आणखीनच वाढतो. पुरेसे व्हिटॅमिन सी घेतल्यास आपण आपल्या शरीराची अँटी-ऑक्सिडेंट स्थिती वाढवू शकतो.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात