जाहिरात
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / हेल्थ / पोटदुखी झाली आणि एका मागोमाग एक 6 अवयव झाले खराब; विशीतच तरुणाचा जीवनमृत्यूशी संघर्ष

पोटदुखी झाली आणि एका मागोमाग एक 6 अवयव झाले खराब; विशीतच तरुणाचा जीवनमृत्यूशी संघर्ष

पोटदुखी झाली आणि एका मागोमाग एक 6 अवयव झाले खराब; विशीतच तरुणाचा जीवनमृत्यूशी संघर्ष

लहानपणापासून त्याच्या पोटात वेदना होत होत्या. नंतर त्याला पोटातील अज्ञात आजार असल्याचं समजलं.

  • -MIN READ Painkulam,Kanniyakumari,Tamil Nadu
  • Last Updated :

उटावा, 19 जुलै : आपल्यापैकी प्रत्येकाला कधी ना कधी पोटदुखीची समस्या होतेच. पण त्याकडे आपण फार गांर्भीयाने लक्ष देत नाही. घरच्या घरीच काही उपाय करून त्यापासून आराम मिळवतो. पण बऱ्याचदा हा उपाय तात्पुरता ठरतो. म्हणजे यानंतर पुन्हा पोटदुखी सुरू होते. पण पोटातील वेदनांना हलक्यात घेऊन नका कारण नंतर त्या चांगल्याच महागात पडू शकतात. कॅनडातील एका तरुणाला आधी अशीच पोटदुखी सुरू झाली आणि आता त्याचे तब्बल 6 अवयव खराब झाले आहेत. 20 वर्षांचा एरिक कॉलम कॅनडातील फोर्ट सेंट जॉनमध्ये आपल्या कुटुंबासोबत राहतो. लहानपणापासूनच त्याच्या पोटात वेदना होत होत्या. पण या वेदना तो सहन करत होत्या. गेल्या दोन वर्षांपासून पोटदुखीमुळे त्याची अवस्था खूप वाईट झाली आहे. वेदना वाढत गेल्या आणि कित्येक इन्फेक्शन झाले. परिणामी त्याचं त्याचं छोटं आतडंही काढावं लागलं.  त्याच्या लिव्हर आणि किडनीमध्ये समस्या निर्माण झाली आहे. गेल्या काही वर्षांपासून त्याची प्रकृती खूप बिघडली आहे. हे वाचा -  पावसाळ्यात ताप आल्यास व्हायरल समजून दुर्लक्ष करू नका; नक्की करा या महत्त्वाच्या चाचण्या एरिक एका विचित्र अज्ञात आजाराने ग्रस्त आहे. त्याला पोटातील आजार झाला आहे. हा आजार नेमका काय आहे, याबाबत डॉक्टरांनाही माहिती नाही. आज तक ने मिररच्या रिपोर्टचा हवावा देत दिलेल्या वृत्तानुसार  एरिकने सांगितलं की, लिव्हर, किडनी आणि इतर इन्फेक्शनमुळे त्याचा 6 ऑर्गन ट्रान्सप्लांटची गरज आहे. आतापर्यंत कोणत्या रुग्णाचे 6 ऑर्गन ट्रान्सप्लांट झाले नाही आहेत. त्यामुळे अवयव प्रत्यारोपणानंतरही त्याची वाचण्याची शक्यता 50 टक्के असेल, असं डॉक्टर म्हणाले. अवयव प्रत्यारोपण म्हणजे काय? काही समस्या, आजारांमुळे शरीरातील अवयव काम करणं बंद होतात. त्यावेळी त्या व्यक्तीच्या शरीरातील अवयव काढून इतर व्यक्तींचे अवयव त्या ठिकाणी लावले जातात. हे वाचा -  मृत्यूला स्पर्श करून परतलेल्या व्यक्तीने सांगितला आश्चर्यचकित अनुभव, म्हणाला, देह सोडल्यानंतर.. ब्रेनडेड रुग्ण म्हणजे ज्यांचा मेंदू मृत झाल्याने त्यांचा मृत्यू झाला असतो पण शरीरातील इतर अवयव कार्यकर असतात, अशा रुग्णांचे अवयव दान केले जातात. हे अवयव गरजू रुग्णाच्या शरीरात प्रत्यारोपित म्हणजे ट्रान्सप्लांट केले जातात. यकृत, किडनी, डोळे, फुफ्फुस असे काही अवयव जिवंतपणीही दान करता येतात.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात