कतार, 13 डिसेंबर : दोन वर्षांनी कोरोनातून कुठे सुटकेचा श्वास मिळाला आहे. त्यात आता कॅमेल फ्लूबाबत शास्त्रज्ञांनी अलर्ट जारी केला आहे. फिफा वर्ल्ड कपमुळे या आजाराचा धोका अधिक वाढला आहे. हा आजार म्हणजे कॅमल फ्लू. ज्याला रेस्पिरेटरी सिंड्रोम मर्स (MERS) म्हटलं जातं. उंटांच्या संपर्कात आल्याने पसरणारा हा आजार. उंटामार्फत तो माणसांतही पसरतो. हा आजार कोरोनापेक्षाही जास्त घातक असल्याचं सांगितलं जातं आहे. याबाबत अलर्ट ही जारी करण्यात आला आहे.
20 नोव्हेंबर 2022 पासून कतारमध्ये फिफा वर्ल्ड कप सुरू आहे. जगभरातील लोक फुटबॉल पाहण्यासाठी येत आहेत. पण याचदरम्यान एक भीतीदायक माहिती समोर आली आहे. कतरमध्ये मर्स हा जीवघेणा आजार पसरण्याचा धोका वर्तवला जातो आहे. टुर्नामेंट पाहून परतलेल्या लोकांमध्ये या आजाराची लक्षणं दिसत आहेत.
हे वाचा - कोरोनामुळे टीनएजर्सचा मेंदू होतोय अकाली वृद्ध; संशोधकांचा धक्कादायक दावा
उंटामार्फत माणसात पसरणारा हा व्हायरस. आखाती देशांमध्ये हा व्हायरस जास्त असतो. कारण तिथं उंटांचा वापर जास्त होतो. त्यामुळे आखाती देशात हा फ्लू पसरण्याचा धोका आहे. कॅमल फ्लूमुळे जगभरात दहशत निर्माण झाली आहे. जगरातील फुटबॉल प्रेमी कतरमध्ये फिफा वर्ल्ड कप पाहण्यासाठी आले आहेत. दुबई ते आखातील देशातील अनेक शहरांतही ते जात आहेत.
डॉक्टरांनी कतारहून परतणाऱ्या फुटबॉल प्रेमींना फ्लूपासून बचाव करण्याचा इशारा दिला आहे. यूके हेल्थ सिक्युरिटी एजन्सीनेही अलर्ट जारी करत ताप आणि श्वास घ्यायाला त्रास होणाऱ्या लोकांची माहिती मिळवण्याच्या सूचना दिल्या आहेत. तर ऑस्ट्रेलियाच्या आरोग्य मंत्रालयांने गाइडलाइन्स जारी केल्या आहेत.
हे वाचा - चहानंतर लगेच पाणी पिता? आत्ताच सोडा सवय; होतात हे गंभीर दुष्परिणाम
जागतिक आरोग्य संघटनेच्या रिपोर्टनुसार मर्स व्हायरसचं पहिलं प्रकरण 2012 साली सौदी अरबमध्ये समोर आलं होतं. एप्रिल 2012 ते ऑक्टोबर 2022 मर्स-सीओव्हीच्या 2600 प्रकरणांची नोंद आहे. यामुळे 935 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. कोरोनासारखाच हा श्वासावाटे पसरणारा आजार आहे. तो मानवातून मानवात पसरतो.
कॅमल फ्लूची लक्षणं
कोरडा खोकला
घशात खबखव
न्युमोनिया होण्याचा धोका
पोटात जंत
पोटाची समस्या
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Disease symptoms, Health, Lifestyle