जाहिरात
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / हेल्थ / डॉक्टरांनी केला चमत्कार आणि पुन्हा धडधडू लागलं मृतांच्या शरीरातील हृदय

डॉक्टरांनी केला चमत्कार आणि पुन्हा धडधडू लागलं मृतांच्या शरीरातील हृदय

डॉक्टरांनी केला चमत्कार आणि पुन्हा धडधडू लागलं मृतांच्या शरीरातील हृदय

डॉक्टरांनी एक-दोन नव्हे तर तब्बल 6 जणांना जीवनदान मिळालं आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

ब्रिटन, 22 फेब्रुवारी : एखादी व्यक्ती मृत झाली की तिच्या शरीरातील हृदयाची (heart) धडधडही थांबते. पण आता डॉक्टरांनी असा चमत्कार केला आहे की त्यामुळे मृतांच्या शरीरातील हृदयही पुन्हा धडधडू लागलं. यामुळे तब्बल सहा जणांना नव्यानं जीवनदान मिळालेलं आहे. आरोग्य क्षेत्रातील ही मोठी क्रांती असल्याचं म्हटलं जातं आहे. ब्रिटनच्या नॅशनल हेल्थ सर्व्हिसमधील डॉक्टरांनी हा चमत्कार केला आहे. कँब्रिजशायरच्या रॉयल पेपवर्थ हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी एका मशीनमार्फत ही कमाल करून दाखवली. या मशीनला ऑर्गन केअर मशीन म्हटलं जातं. डॉक्टरांनी या मशीनच्या मदतीनं मृत व्यक्तीच्या शरीरातील हृदय पुन्हा जिवंत केलं आणि हृदय मग त्यांनी 6 लहान मुलांमध्ये प्रत्यारोपित केलं. 12 ते 16 व.योगटातील ही मुलं आहेत. हे वाचा -  पुणेरी कोरोना लशीसाठी देशांच्या रांगा; अदार पूनावालांनी घेतला मोठा निर्णय हार्ट ट्रान्सप्लांट किंवा हृदय प्रत्यारोपण तसं काही नवं नाही. पण यासाठी ब्रेन डेड रुग्णांची गरज असते. म्हणजे जी व्यक्ती ब्रेनडेड होते, त्यांचा फक्त मेंदू मृत होतो पण शरीरातील इतर अवयव कार्य करत असतात. त्यामुळे एका विशिष्ट कालावधीत हे अवयव इतर गरजू व्यक्तींच्या शरीरात प्रत्यारोपित करता येतात आणि यासाठी अशा ब्रेनडेड रुग्णांच्या प्रतीक्षेत कित्येक गरजू आहेत. हे वाचा -  Poop Transplant मुळे आयुष्य वाढणार; कॅन्सरग्रस्तांसाठी वरदान ठरणार विचित्र उपचार पण आता हार्ट ट्रान्सप्लांट करण्यासाठी ब्रेनडेड व्यक्तीच हव्या असं नाही तर कोणत्याही मृत व्यक्तीच्या शरीरातील हृदय प्रत्यारोपित करता येऊ शकतं, हे या डॉक्टरांनी दाखवून दिलं आहे.  एनएचएसच्या ऑर्गन डोनेशन अँड ट्रान्सप्लान्टेशन विभागाचे संचालक डॉ. जॉन फोर्सिथ यांनी याबाबत माहिती देताना सांगितलं, हे तंत्रज्ञान फक्त ब्रिटनमध्येच नाही तर संपूर्ण जगात आरोग्य क्षेत्रात महत्त्वाचं ठरेल.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात