जाहिरात
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / हेल्थ / बॉयफ्रेंडसमोर लाज वाटायची म्हणून वारंवार रोखली फार्ट; गायिकेची झाली भयंकर अवस्था

बॉयफ्रेंडसमोर लाज वाटायची म्हणून वारंवार रोखली फार्ट; गायिकेची झाली भयंकर अवस्था

प्रतीकात्मक फोटो (सौजन्य - Canva)

प्रतीकात्मक फोटो (सौजन्य - Canva)

आपल्या बॉयफ्रेंडसमोर तिने फार्ट रोखली आणि त्यानंतर तिला थेट हॉस्पिटलमध्ये दाखल करण्याची वेळ आली.

  • -MIN READ
  • Last Updated :

ब्राझिलिया, 21 मार्च : पोटात होणारा गॅस शरीरातून बाहेर फेकला जाणं म्हणजे फार्ट ही नैसर्गिक शारीरिक प्रक्रिया आहे (Gas in stomach). आपल्याला कितीही खराब वाटत असली, लज्जास्पद वाटत असली तरी ही क्रिया शरीरासाठी महत्त्वाची नाही (Weird things about human body). जर फार्ट रोखलं तर त्याचा शरीरावर विपरित परिणाम होतो. एका गायिकेला याचा चांगलाच अनुभव आला. आपल्या बॉयफ्रेंडसमोर तिने फार्ट रोखली आणि त्यानंतर तिला थेट हॉस्पिटलमध्ये दाखल करण्याची वेळ आली (Brazilian woman admitted in hospital for holding fart). 27 वर्षांची विवियाने डी क्वीरोज पेरेरा (Viviane de Queiroz Pereira) ब्राझीलमधील एक प्रसिद्ध गायिका आहे. तिने एमटीव्ही अवॉर्डही जिंकला आहे. पोका (Pocah) म्हणून ती प्रसिद्ध आहे. तिच्या आवाजासोबतच तिच्या स्टाइल आणि ग्लॅमरचेही बरेच चाहते आहेत. सोशल मीडियावर तिचे बरेच फॉलोअर्स आहेत. विवियाने आता चर्चेत आली आहे ती तिचं गाणं, स्टाइलमुळे नाही तर तिने केलेल्या विचित्र कामामुळे. हे वाचा -  बापरे! कसला विचित्र आजार; बोचकारून बोचकारून महिलेने स्वतःच्या त्वचेची लावली वाट विवियानेच्या पोटात एके सकाळी अचानक तीव्र वेदना सुरू झाल्या. वेदना इतक्या होत्या की तिला सकाळी साडेपाच वाजताच रुग्णालयात दाखल करावं लागलं. तिथं तिची तपासणी करण्यात आली. डॉक्टरांनी तिच्या पोटात गॅस अडकला होता (Singer fart trapped in stomach) , जी तो बाहेर काढू सकत नाही आणि त्यामुळेच तिच्या पोटात दुखत असल्याचं सांगितलं. डेली स्टारच्या रिपोर्टनुसार विवायानेला आपल्या बॉयफ्रेंडसमोर फार्ट करायला लाज वाटायची. त्यामुळे फार्ट येताच ती रोखायची. त्यामुळे पोटात गॅस साचत गेला आणि अचानक तिच्या पोटात वेदना होऊ लागल्या. हे वाचा -  Shocking! सुट्टीचा आनंद लुटताना कमी झाली महिलेची 4 इंच हाइट; नेमकं काय झालं पाहा इतक्या असह्य वेदना झाल्यानंतर पोटातील गॅस बाहेर काढणं किती गरजेचं आहे, हे तिला समजलं.  त्यामुळे आता फार्ट नैसर्गिक प्रक्रिया आहे, पार्टनरसमोर फार्ट करायला लाजण्याची काहीच गरज नाही. लाजण्यापेक्षा गॅस बाहेर सोडावा, असा सल्ला तिने इतर महिलांना दिला आहे. गॅस शरीराबाहेर न सोडण्यापेक्षा बॉयफ्रेंडसोबत रुग्णालयात जाणं आणि तिथं आपल्या पोटात गॅस अडकला आहे असं समजणं यामुळे जास्त लाज वाटत होती.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात