Home /News /heatlh /

जन्मापासून जुळलेला होता मेंदू; डोक्याने जोडलेल्या Conjoined twins ना वेगळं करायला गेले डॉक्टर आणि...

जन्मापासून जुळलेला होता मेंदू; डोक्याने जोडलेल्या Conjoined twins ना वेगळं करायला गेले डॉक्टर आणि...

जन्मापासून डोक्याने जोडलेले असलेल्या सयामी जुळ्यांना वेगळं करण्याचा प्रयत्न डॉक्टरांनी केला.

    ब्राझिलिया, 02 ऑगस्ट : सयामी जुळ्यांची काही प्रकरणं तुम्हाला माहिती असतील. अशी जुळी जी एकमेकांना शरीराने जोडलेली असतात. कुणी छातीने, कुणी हाताने, कुणी पोटाने एकमेकांशी जोडलेलं असतं. म्हणजे त्यांच्या शरीराचा एक विशिष्ट अवयव एकच असतो. अशा जुळ्यांना एकमेकांपासून वेगळं करणं म्हणजे आव्हान. त्यातली जर या मुलांच्या शरीराच्या आतील अवयव एकच असेल तर त्यांना वेगळं करणं त्यांच्या जीवावरही बेतू शकतो. अशाच जुळ्यांना वेगळं करण्याचा प्रयत्न डॉक्टरांनी केला. ब्राझीलमधील कंज्वाइंड ट्विन्स म्हणजे सयामी जुळी बर्नार्डो आणि आर्थर लीमा जन्मापासूनच डोक्याने एकमेकांशी जोडलेली होती.  त्यांच्या डोक्याचा काही भाग एकच होता. त्यांचा मेंदूही जोडलेला होता. जन्मापासून डोक्याने एकमेकांशी जो़डलेले असलेले बर्नार्डो आणि आर्थर यांना वयाच्या तिसऱ्या वर्षी सर्जरी करण्याचा निर्णय घेण्यात आला. हे वाचा - आश्चर्य! म्हशीच्या पोटी जन्माला आलं 4 डोळ्यांचं रेडकू; विचित्र पिल्लाला पाहून डॉक्टर म्हणाले, 'असे प्राणी...' अडीच वर्षांपूर्वी ते आपल्या पालकांसोबत रोराइमाहून रियोला आले. तेव्हापासून  रियो जी जेनेरियोमध्ये ग्रेट ऑरमंड स्ट्रिट हॉस्पिटलमध्ये त्यांची देखभाल केली जात होती. या हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर सर्जरी झाली. त्यांच्या तब्बल 7 सर्जरी झाल्या. शेवटची सर्जरी 33 तासांपेक्षाही जास्त वेळ चालत होती. तब्बल 100 वैद्यकीय कर्मचाऱ्यांचा समावेश होता.  ही सर्जरी प्रत्यक्षत करण्याआधी कित्येक महिने व्हर्चुअल रिअॅलिटीच्या माध्यमातून या ऑपरेशनचं ट्रायल करण्यात आलं. त्यानंतर फायनल ऑपरेशन केलं. व्हर्चुअल रिअॅलिटी टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून डॉक्टरांनी यशस्वी ऑपरेशन केलं आहे. डॉक्टरांच्या मते, बर्नोडो आणि ऑर्थरला वेगळं करणं खूप आव्हानात्मक होतं. कित्येक सर्जन याचा विचारही करत नाही. अशी प्रकरणं जगात खूप कमी आहेत. हे ऑपरेशन वैद्यकीय जगात खूप महत्त्वाचं आहे. या ऑपरेशनमुळे फक्त मुलं आणि त्यांच्या कुटुंबाला एक नवं भविष्य मिळालंच पण आमच्या टिमलाही या ऑपरेशनमुळे एक आत्मविश्वास मिळाला आहे. हे वाचा - Monkeypox Symptoms : प्रायव्हेट पार्टवरही करतोय हल्ला; मंकीपॉक्सची नवी भयंकर लक्षणं समोर सर्जरी यशस्वी झाल्याने आम्ही आनंदी आहोत. सर्जरीनंतर दोन्ही मुलं चांगल्या पद्धतीने रिकव्हर होत आहेत, असंही डॉक्टरांनी सांगितलं.
    Published by:Priya Lad
    First published:

    Tags: Health, Lifestyle, Surgery

    पुढील बातम्या