वाराणसी, 28 सप्टेंबर : हल्ली बहुतेक लोक आपलं आरोग्य आणि फिटनेसबाबत जागरूक झाले आहेत. त्यामुळे आहारासोबतच शरीराच्या ठेवणीकडेही लक्ष असतं. घरात किंवा घराबाहेर व्यायाम, जिममध्ये जाऊन एक्सरसाइझ यासोबत योगालाही महत्त्व दिलं जातं. पण असाच योग करताना एका विद्यार्थिनीचा मृत्यू झाला आहे. सकाळी योग करता करता ती जमिनीवर कोसळली आणि तिचा जीव गेला. वाराणसी हिंदू विद्यापीठातील ही धक्कादायक घटना आहे. अनुभा पांडेय असं मृत विद्यार्थिनीचं नाव आहे. कुशीनगरमध्ये राहणाऱ्या अनुभाने मानशास्त्रात पदवी घेतली होती. त्यानंतर बीएचयूमध्ये आयुर्वेदात पीएचडी करत होती. काशी हिंदू विद्यापीठाच्या हॉस्टेलमध्येच ती राहत होती. मंगळवारी सकाळी सातच्या सुमारास ती हॉस्टेलमधील इतर विद्यार्थिनींसोबत योग करत होती. तेव्हा अचानक तिची तब्येत बिघडली. तिला चक्कर आली आणि ती जमिनीवर कोसळली. हे वाचा - एअरपोर्टवरच प्रवाशाला Heart attack; CISF जवानाने असा वाचवला जीव की VIDEO पाहून सर्वांनी केलं सॅल्युट इतर विद्यार्थिनींनी वॉर्डनला याची माहिती दिली. तात्काळ अॅम्ब्युलन्स बोलावण्यात आली. तिला रुग्णालयात नेलं जात होतं. पण रुग्णालयात पोहोचण्याआधी रस्त्यातच तिचा मृत्यू झाला. माहितीनुसार अनुभा उपवासही करत होती. शिवाय तिला एक दुर्मिळ आजार होता, अशी माहिती तिच्या कुटुंबाने दिली. बीएचयू आयुर्वेद विभागाचे अध्यक्ष प्राफेसर केएन द्विवेदी यांनी सांगितलं, विद्यार्थिनीच्या नातेवाईकांशी बोलताना समजलं की तिला टकायासु आर्टेराइटिस आजार होता. हा दुर्मिळ आजार आहे. यात धमन्यांमधू नीट रक्तप्रवाह होत नसल्याने समस्या उद्भभवते. अशा आजारात रुग्णाला अंगमेहनतीचं काम न करण्याचा सल्ला दिला जातो.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.