जाहिरात
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / हेल्थ / ब्लॅक की मिल्कवाली? कोणती Coffee प्यावी तुम्हीही कन्फ्युझ आहात, मग हे संशोधन वाचा

ब्लॅक की मिल्कवाली? कोणती Coffee प्यावी तुम्हीही कन्फ्युझ आहात, मग हे संशोधन वाचा

कोणती कॉफी आरोग्यासाठी फायदेशीर.

कोणती कॉफी आरोग्यासाठी फायदेशीर.

दुधाच्या कॉफीसंदर्भात संशोधनातून काही निष्कर्ष समोर आले आहेत.

  • -MIN READ Trending Desk Delhi
  • Last Updated :

    मुंबई, 02 फेब्रुवारी : आपण तणाव कमी करण्यासाठी, रिलॅक्स होण्यासाठी आपण रोज चहा किंवा कॉफी घेतो. आजकाल ग्रीन टी, ब्लॅक कॉफी घेण्याकडे लोकांचा कल वाढला आहे. ही पेयं आरोग्यासाठी हितावह मानली जातात. ही दोन्ही पेयं जास्त प्रमाणात घेणं आरोग्यासाठी नुकसानदायी ठरू शकतं. त्यामुळे चहा, कॉफी प्रमाणात घेणं आवश्यक आहे. बहुतांश जण दुधाच्या कॉफीऐवजी ब्लॅक कॉफीला जास्त पसंती देतात. वजन नियंत्रण आणि आरोग्यासाठी ब्लॅक कॉफी चांगली मानली जाते; पण दूधमिश्रित कॉफीदेखील आरोग्यासाठी चांगली असते. एका संशोधनातून ही बाब नुकतीच समोर आली आहे. दूधमिश्रित कॉफी प्यायल्याने शरीरातली जळजळ कमी होते. तसंच या कॉफीमुळे अनेक शारीरिक समस्या दूर होतात, असं संशोधनातून स्पष्ट झालं आहे. दुधाच्या कॉफीसंदर्भात या संशोधनातून आणखी काही निष्कर्ष समोर आले आहेत, त्याविषयी सविस्तर जाणून घेऊ या. वजन कमी करण्यासाठी किंवा आरोग्यासाठी तुम्ही ब्लॅक कॉफी घेत असाल; पण दुधाची कॉफीदेखील तितकीच उपयुक्त असते, ही बाब कदाचित तुम्हाला माहिती नसेल. जर्नल ऑफ अ‍ॅग्रीकल्चर अँड फूड केमिस्ट्रीने केलेल्या एका संशोधनानुसार, कॉफीत दूध घालून प्यायल्याने शरीराला अनेक लाभ होतात. दूधमिश्रित कॉफी प्यायल्याने डायबेटीस, शरीरातली जळजळ यांसारख्या समस्या दूर होऊ शकतात. कॉफीमुळे केवळ सूज कमी होत नाही, तर त्यामुळे मेटाबॉलिझमला चालना मिळते. इन्सुलिन सेन्सिटिव्हिटीत सुधारणा होते. दूधमिश्रित कॉफी चवदार असते; मात्र ही कॉफी मर्यादित प्रमाणात घेणं गरजेचं आहे. कारण यामुळे शरीराचं नुकसानदेखील होऊ शकतं. `डेली मेल`च्या एका वृत्तात या संशोधनाचा उल्लेख करण्यात आला आहे. संशोधकांच्या मते, कॉफी हा पॉलिफेनॉलसारख्या अनेक अँटीऑक्सिडंट्सचा चांगला स्रोत आहे. दुधात अमिनो अ‍ॅसिड असतं. या दोन्ही घटकांच्या सेवनाने शरीरातली जळजळ सहज कमी होऊ शकते. जीवाणू, विषारी घटक आणि ट्रॉमामुळे शरीरात जळजळ होऊ शकते. पॉलिफेनॉल्स आणि अमिनो अ‍ॅसिडमुळे अशा प्रकारची समस्या दूर होते. दुधात प्रोटीन आणि कॅल्शियमव्यतिरिक्त नऊ प्रकारची आवश्यक अमिनो अ‍ॅसिड्स असतात. ही अ‍ॅसिड्स शरीरासाठी अत्यंत आवश्यक असतात. या अभ्यासाचे प्रमुख प्रा. निसेन यांनी संशोधनाविषयी माहिती दिली. ते म्हणाले, `पॉलिफेनॉल नावाच्या अँटीऑक्सि़डंटने अमिनो अ‍ॅसिडवर प्रक्रिया केली असता रोगप्रतिकारक पेशींची संख्या वाढल्याचं दिसून आलं. यामुळे शरीरातली जळजळ लवकर कमी होऊ लागते.`

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात