नवी दिल्ली, 15 मार्च : आत्तापर्यंत अनेकदा तुम्ही रात्री झोपताना नाईट क्रिमचा वापर केला असेलच. मात्र, तरीही हिवाळ्यात चेहऱ्यावर कोरडेपणा जाणवतोच. यासाठी तुम्ही कोणत्याही महागड्या क्रीमपेक्षा गाईच्या दुधापासून तयार केलेले तूप वापरू शकता. तुम्ही चेहऱ्यावर तूप लावले तर ते तुमच्या त्वचेला अनेक प्रकारे फायदेशीर ठरते. तसेच चेहऱ्यावर नैसर्गिक चमक (Benefits Of Applying Ghee On Skin) येईल.
Only My Health च्या माहितीनुसार, देशी तुपाचा वापर आयुर्वेदात जखमा भरण्यासाठी वर्षानुवर्षे केला जात आहे. भाजणे, कापणे, सूज बरे करण्याव्यतिरिक्त, फुटलेले ओठ बरे करण्यासाठी देखील याचा वापर केला जाऊ शकतो. त्वचेशी संबंधित इतर फायद्यांविषयी माहिती घेऊया.
तूप लावण्याचे फायदे
1. सन बर्न बरा करण्यासाठी
जर तुमच्या त्वचेवर जास्त सूर्यप्रकाशामुळे सन बर्नची समस्या उद्भवली असेल तर झोपण्यापूर्वी चेहरा पूर्णपणे स्वच्छ करा आणि प्रभावित भागावर तूप लावा. लवकरच सनबर्नच्या खुणा नाहीशा होतील.
2. सूज येणं
शरीरावर कुठेही सूज आली असेल तर ती सूज दूर करण्यासाठी तुपाची खूप मदत होते. सूज टाळण्यासाठी रात्री झोपताना तूप लावा आणि दुसऱ्या दिवशी चेहरा पाण्याने धुण्यापूर्वी सूती कपड्याने चेहरा स्वच्छ करा.
हे वाचा - शरीरात अशी लक्षणं दिसत असतील तर सावधान! ही Diabetes ची सुरुवात असू शकते
3. फुटलेले ओठ होतील बरे
फुटलेल्या ओठांच्या समस्येपासून सुटका मिळवण्यासाठी तूप खूप उपयुक्त ठरू शकते. तुम्हाला फक्त रात्री झोपण्यापूर्वी ओठांवर तूप लावायचे आहे. तुम्हाला हवे असल्यास तुम्ही दिवसाही ओठांवर तूप लावू शकता.
4. संसर्ग रोखणे
संसर्ग दूर करण्यासाठी किंवा त्वचेवरील लालसरपणा दूर करण्यासाठी तुम्ही तुपाचा वापर करू शकता. त्वचेवर सुटणारी खाज, त्वचेच्या संसर्गामुळे लालसरपणा, त्वचेचा कोरडेपणा आदी समस्या सहज दूर होतात.
हे वाचा - रात्री जेवल्यानंतर किमान इतका वेळ तरी चालायला हवं; नंतर आजारांवरील वाचेल खर्च
5. ड्रायनेस
हिवाळ्यात त्वचा कोरडी आणि निर्जीव दिसत असेल तर ही समस्या दूर करण्यासाठी तुपाची खूप मदत होऊ शकते. रात्री झोपण्यापूर्वी कापसाने त्वचेवर तूप लावा. कोरडेपणा एका रात्रीत निघून जाईल.
6. चेहऱ्यावरील काळे डाग
जर काळ्या डागांची समस्या असेल तर तुम्ही रात्री तुपाचा वापर करून ही समस्या दूर करू शकता. नाईट क्रीम म्हणून तुम्ही रोज तूप वापरू शकता.
(सूचना : या लेखात दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.