एका नाविन्यपूर्ण आणि पहिल्या-वहिल्या डिजिटल उपक्रमांतर्गत, सोमवार, 21 जून रोजी सकाळी 11.00 वाजता Network18 च्या सर्व वाहिन्यांवर Federal Bank व Network18 यांच्या नेतृत्वाखालील ‘Sanjeevani: A shot of life’ या लसीकरण जनजागृती मोहिमेचे गीत प्रसिद्ध होईल.
या भव्य अशा आभासी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आनंद नरसिंहन करणार आहेत तर संगीतकार आणि गायक शंकर महादेवन आणि या मोहिमेचे राजदूत सोनू सूद हे केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री, डॉ. हर्ष वर्धन यांच्या उपस्थितीत या गीताचे प्रकाशन करतील.
या रचनेमागील चमू, गीतकार तनिष्क नाबर आणि गायक हर्षदीप कौर, सिद्धार्थ महादेवन, आणि शिवम महादेवन यांसह अन्य अनेक ख्यातनाम व्यक्ती या सत्रामध्ये उपस्थित होत्या.
कोविड-19 विरुद्धच्या लढाईमध्ये देशभरातील लोकांना एकत्रता आणणे ही आंतरराष्ट्रीय योग दिनी प्रसिद्ध होणाऱ्या या गीतामागची संकल्पना आहे. हे गीत म्हणजे गैरसमजांचे उच्चाटन करण्याचा आणि लसीविषयीचा संकोच दूर करण्याचा एक प्रयत्न आहे. ‘टीका’(लस) सारख्या सोप्या शब्दांनी बनलेले हे आकर्षक गीत म्हणजे एक आशेची धून आहे जी लोकांना त्यांची पाळी आली की लस घेण्यासाठी प्रोत्साहन देईल.
“टीका लगा” चा आशावादी ताल ही लोकांना लास घेण्याची प्रेरणा देण्यासाठी बनवलेली धून आहे. या गीताची एक झलक आधीच प्रसिद्ध झाली आहे आणि सकारात्मकता आणि उर्जेने परिपूर्ण असलेल्या या गीतामध्ये कोणालाही आशावाद दिसू शकतो.
येथे https://www.youtube.com/watch?v=_BQCBxiIvTk ती झलक पहा आणि संपूर्ण गीताचा पहिला अविष्कार पाहण्यासाठी सज्ज व्हा.
Sanjeevani मोहिमेचे अनुसरण करा आणि https://www.moneycontrol.com/sanjeevani येथे सोमवारी, 21 जून रोजी सकाळी 11 वाजता याचे प्रकाशन पहा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Sanjeevani