मुंबई, 20 डिसेंबर : 2021 हे वर्ष संपण्यासाठी आता काहीच दिवस बाकी राहिले आहेत. नाताळचा (Christmas) सणही अगदी काही दिवसांवर आला आहे. नाताळ, नववर्षाचा आनंद साजरा करण्यासाठी आणि सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी प्रत्येक जण आपपल्या परीनं तयारी करत आहे. या निमित्ताने अनेक जण पार्ट्यांचं (Party) आयोजन करतात. पार्ट्यांमध्ये विविध खाद्यपदार्थांबरोबरच मद्याचीही (Alcohol) रेलचेल असते. मद्य पिणं ही काहींची आवड असते, तर या कालावधीत काही जण फॅशन, स्टाइल म्हणूनही मद्यपान करतात. थंडी (Cold) वाढली, की मद्याला मागणी वाढल्याचं चित्र दिसून येतं. मद्यपानामुळे थंडी कमी होते, असं यामागचं कारण सांगितलं जातं. परंतु, हिवाळ्यात (Winter) मद्यपान हे घातक ठरू शकतं. थंडीच्या दिवसात मद्यपान केल्यानं हृदयावरचा दाब वाढतो, प्रसंगी हार्ट अॅटॅक (Heart Attack) येण्याची शक्यता असते. त्यामुळे हिवाळ्यात मद्यपान अपायकारक ठरू शकतं, असं तज्ज्ञ सांगतात.
हिवाळ्यात कोणत्याही निमित्तानं दारू पिणं हे आरोग्यासाठी अपायकारक ठरू शकतं. थंडीत दारू प्यायल्यानंतर पेशींमधली रक्ताभिसरणाची गती मंदावते. त्यामुळे हार्ट अटॅक येण्याची शक्यता वाढते. थंडीपासून बचाव करण्यासाठी दारू पिण्याचा विचार करत असाल, तर तो धोकादायक ठरतो, याबाबतची माहिती 'टीव्ही नाइन हिंदी'ने प्रसिद्ध केली आहे.
काही दिवसांपूर्वी हवामान विभागाने (Meteorological Department) त्यांच्या अॅडव्हायजरीमध्ये (Advisory) सांगितलं होतं, की 'कडाक्याची थंडी किंवा थंडीच्या लाटेदरम्यान फ्लू, सर्दी, खोकला, नाकातून रक्त येणं आदी आजार होण्याची शक्यता असते; मात्र असे आजार पूर्वीपासूनच असतील तर थंडीत तुम्हाला आणखीच त्रास होऊ शकतो. तीव्र थंडी असताना मद्यपान टाळावं. दारू प्यायल्यानंतर शरीराचं तापमान कमी होतं आणि ही बाब धोकादायक ठरू शकते. या कालावधीत व्हिटॅमिन सी असलेल्या फळांचं सेवन करावं. यामुळे थंडीच्या प्रभावापासून बचाव करता येईल. कडाक्याच्या थंडीत दारू पिणं टाळावं. थंडीत मद्यपान केल्यास शरीरावर अनेक प्रतिकूल परिणाम होतात आणिते सहजासहजी जाणवतदेखील नाहीत.'
दारू प्यायल्यानंतर शरीराचं मूळ तापमान कमी होतं, असं एका संशोधनातून दिसून आलं आहे. यामुळे हायपोथर्मियाचा (Hypothermia) धोका वाढतो. कडाक्याच्या थंडीत हा जीवघेणा ठरू शकतो. हायपोथर्मिया हा एक आजार असल्याने त्याकडे दुर्लक्ष करू नये. या स्थितीत शरीर उष्णता निर्माण करण्यापूर्वीच ती गमावतं आणि शरीराचं तापमान धोकादायक पातळीपर्यंत घसरतं. दारू प्यायल्यानंतर शरीराचं तापमान वाढतं आणि उष्णता जाणवते, असं काही जण म्हणतात. परंतु, तज्ज्ञांचं म्हणणं वेगळं आहे. दारू प्यायल्यानंतर उष्णता जाणवते; पण शरीराचं तापमान कमी होतं. थंडीच्या लाटेत इम्युनिटीवर (Immunity) मोठा परिणाम होतो आणि ही बाब आरोग्यासाठी अपायकारक ठरू शकते. त्यामुळे हिवाळ्यात आणि त्यातही थंडीच्या लाटेत दारू पिणं टाळावं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.