हवा प्रदूषणामुळं पुरुषांमधील शुक्राणूंची संख्या होतेय कमी, नव्या संशोधनातील माहिती

हवा प्रदूषणामुळं पुरुषांमधील शुक्राणूंची संख्या होतेय कमी, नव्या संशोधनातील माहिती

Air pollution reduced sperm count: वायुप्रदूषणामुळे मेंदूला सूज आल्यावर पुरुषांमधील शुक्राणूंची संख्याही कमी होत असल्याचे प्रथमच आढळून आले आहे. याबाबत नवी संशोधन समोर आलं असून त्यावर मार्ग काढण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.

  • Share this:

नवी दिल्ली, 29 ऑक्टोबर : वायू प्रदूषणामुळे आपल्या शारीरिक क्षमतेवरच परिणाम होत नाही तर पुरुषांच्या प्रजनन क्षमतेवरही त्याचा परिणाम होत आहे. डॉक्टर एनडीटीव्हीच्या बातमीनुसार, युनिव्हर्सिटी ऑफ मेरीलँड स्कूल ऑफ मेडिसिनच्या संशोधकांनी दावा केला आहे की, हवा प्रदूषणामुळे पुरुषांमधील शुक्राणूंची संख्या कमी होत (Air pollution effects on male fertility) आहे. संशोधनात दिलेल्या माहितीनुसार, वायू प्रदूषणामुळे मेंदूच्या आत सूज येते, ज्याचा थेट संबंध पुरुषांच्या प्रजनन क्षमतेशी असतो.

हे नवे संशोधन एन्व्हायर्नमेंटल हेल्थ पर्स्पेक्टिव्हमध्ये प्रकाशित झाले आहे. स्त्री आणि पुरुषांमध्ये ताण-तणावाचा संबंध प्रजनन क्षमतेवर पडत असल्याचे यापूर्वीच्या संशोधनातून स्पष्ट झालं आहे. उदाहरणार्थ, भावनिक तणावामुळे स्त्रियांमध्ये अनियमित मासिक पाळी येऊ शकते. मात्र, वायुप्रदूषणामुळे मेंदूला सूज आल्यावर पुरुषांमधील शुक्राणूंची संख्याही कमी होत असल्याचे प्रथमच आढळून आले आहे.

शास्त्रज्ञ उपचार शोधताहेत

आघाडीचे संशोधक आणि UMSOM मधील औषध सहायक प्राध्यापक, झेकांग यिंग यांनी सांगितले की, प्रजनन क्षमतेवर प्रदूषणाचा काय परिणाम होतो, यावर आम्ही संशोधन करत आहोत. ते म्हणाले की, आम्ही आमच्या संशोधनात पाहिले की, जेव्हा उंदरांच्या मेंदूतील सुजलेला भाग काढून टाकला, तेव्हा त्याच्या शुक्राणूंच्या संख्येत झालेली कमतरता पुन्हा पूर्वपदावर येवू लागली. यिंग म्हणाले की, आम्ही सध्या अशी थेरपी विकसित करण्याच्या प्रयत्नात आहोत, ज्यामुळे प्रदूषणामुळं पुरुषांची बाधित झालेली प्रजनन क्षमता चांगली करता येईल.

हे वाचा - भयंकर ! आधी पार्टी केली मग मित्रावर 40 मिनिटांत केले 107 वार, प्रायव्हेट पार्ट कापून डोळाही काढला

90 टक्के लोकसंख्येला वायू प्रदूषणाचा धोका

यूएमएसओएमचे कार्डिओलॉजी संशोधन संचालक चार्ल्स हाँग म्हणाले की, प्रदूषणामुळं केवळ लोकांच्या प्रजनन क्षमतेवरच परिणाम झालेला नाही तर मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयविकार इत्यादींवरही परिणाम होण्याची शक्यता आहे. हे सर्व हवेच्या प्रदूषणामुळे मेंदूला सूज येण्याच्या परिणामामुळे असू शकते.

हे वाचा - Men’s health : चांगल्या सेक्स लाईफसाठी पुरुषांनी या गोष्टी नक्की खाव्यात; आहेत अनेक फायदे

संशोधन पेपरमध्ये असे म्हटले आहे की, जगातील सुमारे 92 टक्के लोकसंख्या अशा भागात राहते जेथे 2.5 मायक्रोमीटरपेक्षा लहान सूक्ष्म कण हवेत असतात. हे जागतिक आरोग्य संघटनेने (डब्ल्यूएचओ) निर्धारित केलेल्या किमान सुरक्षा मानकांपेक्षा जास्त आहे. वाहने,​ ​कारखाने, जंगलातील आग, लाकूड जाळणे इत्यादींमुळे हे सूक्ष्म कण येतात. हे कण शरीरासाठी अत्यंत हानिकारक असतात. या कणांचा प्रजनन क्षमतेवरही परिणाम होत आहे.

Published by: News18 Desk
First published: October 29, 2021, 10:00 PM IST

ताज्या बातम्या