मुंबई, 20 एप्रिल : उन्हाळा (Summer) जसा वाढत जातो, तसतसे अनेक जण उन्हाळ्यात काय खावं? काय खाऊ नये याबद्दल जास्त विचार करायला लागतात. उन्हाळ्यात शरीरात उष्णता वाढवणारे पदार्थ खाणं शक्यतो टाळलं जातं. च्यवनप्राश हादेखील त्यातलाच एक प्रकार आहे. च्यवनप्राश (Chyawanprash) हे उष्ण गुणाचं असल्यामुळे ते उन्हाळ्यात खावं की नाही असा प्रश्न अनेकांना पडतो. उन्हाळ्यात च्यवनप्राश खाणं योग्य आहे की अयोग्य किंवा ते खाताना काय काळजी घ्यावी याची माहिती जाणून घेऊ या. उन्हाळ्यात च्यवनप्राशचं सेवन केल्यामुळे त्वचेची अॅलर्जी (Skin Rashes), पुरळ उठणं या समस्यांचा सामना करावा लागू शकतो. शरीरातली उष्णता वाढल्यामुळे अनेक समस्या उद्भवू शकतात. उच्च रक्तदाब (Blood Pressure) आणि मधुमेहाच्या (Diabetes) रुग्णांनी च्यवनप्राशचं सेवन करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला (Doctor’s Advice) नक्की घ्यावा. अन्यथा त्यांना त्रासाचा सामना करावा लागू शकतो. खूप उष्ण असलेल्या च्यवनप्राशमध्ये अनेक घटक आणि औषधी गोष्टी वापरल्या जातात; मात्र उन्हाळ्यात त्याचं सेवन केल्यास नुकसान होऊ शकतं. आवळा किंवा थंड गुणाच्या पदार्थांपासून बनवलेल्या च्यवनप्राशचं सेवन केल्यास त्याचा त्रास होणार नाही. उन्हाळ्यात च्यवनप्राश खाण्यापूर्वी घ्या ही काळजी…. उन्हाळ्यात च्यवनप्राश खाण्यापूर्वी काही गोष्टींची काळजी घेतल्यास होणारा त्रास टाळू शकता. तुम्हाला उन्हाळ्यातही च्यवनप्राशचं सेवन करायचं असेल, तर तुम्ही एकदा तुमच्या आहारतज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्यायला हवा. त्याचप्रमाणे दिवसा च्यवनप्राशचं सेवन करणं टाळावं. कारण त्याचा थोडा त्रास होऊ शकतो. कोणताही आजार असल्यास डॉक्टरांचा सल्ला घेऊनच च्यवनप्राशचा आहारात समावेश करावा. यामुळे संभाव्य त्रास टळेल. डॉक्टरांचा सल्ला महत्त्वाचा… च्यवनप्राश हे आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतं. परंतु त्याचं सेवन जास्त प्रमाणात केलं, तर त्यामुळे फायद्याऐवजी नुकसान जास्त होऊ शकतं. उन्हाळ्यात च्यवनप्राशचं सेवन करताना विशेष काळजी घेतली पाहिजे, जेणेकरून कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही. उन्हाळ्यात च्यवनप्राशचं जास्त सेवन केल्यामुळे अपचन, पोट फुगणं, लूज मोशन अशा समस्या उद्भवू शकतात, असं अनेक अहवालांमध्ये सांगण्यात आलं आहे. त्यामुळे उन्हाळ्यात च्यवनप्राशचं सेवन करताना विशेष काळजी घ्या आणि एकदा डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

)







