मुंबई, 26 जुलै: जगातील अनेक देशांमध्ये गेल्या काही दशकांपासून तापमानात वाढ (Rise in temparature) होत आहे. उकाड्यापासून बचाव करण्यासाठी अनेकजण घरात एसी (Air Conditioner) लावतात. एका सर्वेक्षणानुसार जगभरात सध्या 190 कोटी एअर कंडिशनर्स (190 crore) असून त्यामुळे पृथ्वीचं तापमान वाढत चाललं आहे. नुकत्याच प्रकाशित झालेल्या एका पुस्तकात याबाबतचं संशोधन आणि भविष्यातील परिणाम यांचा धांडोळा घेण्यात आला आहे. अमेरिकेतील पर्यावरण वैज्ञानिक एरिक डिन विल्सन यांच्या ‘आफ्टर कुलिंग : ऑल फ्रेयॉन, ग्लोबल वॉर्मिंग, अँड द टेरिबल कॉस्ट ऑफ कंफर्ट’ या पुस्तकात एअऱ कंडिशनर्सपासून पुढच्या पिढ्यांना काय नुकसान होऊ शकतं, याच आढावा घेण्यात आला आहे. यामुळे केवळ तापमानात वाढ होतेय, एवढंच नव्हे, तर एसीमधून गरम हवेसोबत बाहेर पडणाऱ्या रसायनांमुळे हवेचा दर्जाही बिघडत असून प्रदुषणात वाढ होत असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. गारवा पडतोय महाग एसी, फ्रीज, रेफ्रिजरेटर या सगळ्यांमध्ये गारवा निर्माण कऱण्यासाठी जो क्लोफ्लोरोकार्बन नावाचा गॅस वापरण्यात येतो, त्याचा शोध लागला 1930 साली. या गॅसचा वापर करून होणाऱ्या कुलिंगमधून बाहेर पडणारे घटक वर्षानुवर्षं ओझोनचा थर कमकुवत करत राहिले असून त्याचा पर्यावरणाला मोठा धोका असल्याचं दिसून आलं. त्यानंतर या गॅसचा वापर करणं बंद करण्यात आलं. त्याऐवजी हायड्रोफ्लोरोकार्बन या गॅसचा वापर करण्यात येऊ लागला. यामुळे ओझोनच्या थराला होणारं नुकसान थांबलं, मात्र वातावऱणातील कार्बनडाय ऑक्साईडचं प्रमाण वाढायला सुरुवात झाली. सध्या रेफ्रिजरेटरसाठी वापरण्यात येणाऱ्या याच गॅसचा उपयोग एअर कंडिशनर्समध्येही केला जातो. हे वाचा - भीती प्रत्येकाला वाटतेय! ‘ती परत आलीये’च्या ट्रेलरनं वाढवली उत्सुकता एरिक डिल विल्सन यांच्या म्हणण्यानुसार अनेकदा एसी अत्यावश्यक असतो. अनेकदा रुग्णांसाठी एसी वरदान ठरतो. सातत्यानं गरम वातावरणात राहिल्यामुळे माणसांची चिडचिड होणे, तब्येत बिघडणे असे प्रकार घडतात. मात्र एसीचा सतत वापर केल्यामुळे जर हवेचाच दर्जा बिघडला, तर पुढील पिढ्यांना प्रदुषित हवाच थंड करून मिळेल. त्यासाठी एसीच्या वापरावर मर्यादा घालून घेणं गरजेचं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.