Home /News /heatlh /

नवं संकट! कोरोना, मंकीपॉक्सच्या दहशतीत अज्ञात आजाराचं थैमान; आतापर्यंत घेतले 61 बळी

नवं संकट! कोरोना, मंकीपॉक्सच्या दहशतीत अज्ञात आजाराचं थैमान; आतापर्यंत घेतले 61 बळी

एका गावात गेल्या दोन वर्षांपासून हा अज्ञात आजार थैमान घालत असल्याचा दावा ग्रामस्थांनी केला आहे.

    रायपूर, 06 ऑगस्ट : देशात कोरोनाची प्रकरणं पुन्हा वाढत आहेत. त्यात मंकीपॉक्सचं संकट आहे आणि आता आणखी एका अज्ञात आजाराची दहशत निर्माण झाली आहे. छत्तीसगढमधील एका गावात या आजाराने थैमान घातलं आहे. आतापर्यंत तब्बल 61 लोकांचा या आजारामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. सुकमा जिल्ह्यातील  रेंगडगट्टा गावात अज्ञात आजार पसरला आहे. ज्यामुळे आतापर्यंत 61 बळी गेले आहेत. तर माहितीनुसार 24 लोक आजारी असल्याचं समोर आलं आहे. ग्रामस्थांनी याबाबत जिल्हा प्रशासनाला माहित देत. या समस्येचं निवारण करण्याची मागणी केली. 27 जुलैला ग्रामस्थांनी सुकमा जिल्हाधिकाऱ्यांना एक रिपोर्ट दिला. ज्यात 2022 सालापासून 61 लोकांचा मृत्यू झाला आहे. त्यांच्या हातापायाला सूज आल्याची लक्षणं होती. यात तरुण-तरुणींचाही समावेश आहे. ग्रामस्थांनी हे मृत्यू रोखण्यासाठी, त्याचं कारण आणि त्यावर समस्या शोधण्यासाठी म्हणून तज्ज्ञांची एक टीम गावात पाठवण्याची मागणी केली होती.  त्यानुसार आरोग्य कर्मचारी आणि तज्ज्ञांची टीम या गावात पाठवण्यात आली. हे वाचा - OMG! रुग्णाच्या पोटातून निघाला मोठा स्टिलचा ग्लास; पण शरीरात गेला तरी कसा पाहा इंडिया टीव्हीच्या वृत्तानुसार सुकमाचे जिल्हाधिकारी हरीश एस यांनी सांगितलं की, प्राथमिक तपासानुसार या गावात गेल्या तीन वर्षांत 47 लोकांचा मृत्यू झाला. पण जसा ग्रामस्थांनी दावा केला आहे, तसं त्यांच्या मृत्यूचं कारण एकच नाही. काही मृतांच्या शरीरावर सूज होती आणि याची कारणं वेगवेगळी असू शकतात. लोकांची तपासणी केली असता 41 लोकांच्या शरीरात सूज आणि किडनीची समस्या आहे. त्यांच्या शरीरात युरिक अॅसिट आणि क्रिएटिननची पातळी वाढली होती.  यामागे इतर पर्यावरणीय कारणं असू शकतात किंवा दारू प्यायल्याने किडनीसंबंधी होणारे आजार एक कारण असू शकतं. जिल्ह्याचे मुख्य आरोग्य अधिकारी यशवंत ध्रुव म्हणाले, मृत्यूची कारणं वेगवेगळी आहेत. यात किडनीचे आजार, मलेरिया, वृद्धापकाळात होणारे आजार यांचा समावेश आहे. किती लोकांचा मृत्यू किडनीच्या आजाराने झाला हे अद्याप स्पष्ट नाही. दोन अॅनिमियाचे रुग्ण सापडले आहेत. हे वाचा - दीर्घकाळ कोविड असणाऱ्या आठपैकी एका व्यक्तीला जाणवतात ही लक्षणं; दुर्लक्ष नका करू पाण्याच्या नमुन्याच्या प्राथमिक रिपोर्टनुसार दोन जलस्रोतांमध्ये फ्लोराइडचं प्रमाण अधिक असल्याचं सापडलं आहे. तर काही जलस्रोतांमध्ये लोहतत्वं अधिक आहे. लोह तत्वामुळे समस्या निर्माण होऊ शकतात पण अचानक मृत्यू नाही होऊ शकत. अधिक फ्लोराइडयुक्त पाणी प्यायल्याने हाडं कमजोर होतात. इतर लोकांमध्ये अशी काही लक्षणं नाहीत, असं जिल्हाधिकारी म्हणाल. 20 पैकी दोन जलस्रोतांमध्ये फ्लोराईड अधिक असल्याचं दिसलं त्याचा वापर थांबवण्यात आलं आहे. पिण्याच्या पाण्यासाठी आठ जलस्रोतांचा वापर न करण्याचा सल्ला ग्रामस्थांना देण्यातआला आहे. कारण यात आयर्न जास्त आहे. 8 ऑगस्टला एक तज्ज्ञांची टीम पर्यावरणी कारणांचा अभ्यास करण्यासाठी गावात पाठवली जाईल, असं मुख्य आरोग्य अधिकाऱ्यांनी सांगितलं.
    Published by:Priya Lad
    First published:

    Tags: Chattisgarh, Health, Lifestyle, Serious diseases

    पुढील बातम्या