Home /News /heatlh /

Benefits of Drinking Warm Water: हिवाळ्यात कोमट पाणी पिण्याचे फायदे माहिती आहे का? अनेक समस्यांपासून होईल सुटका

Benefits of Drinking Warm Water: हिवाळ्यात कोमट पाणी पिण्याचे फायदे माहिती आहे का? अनेक समस्यांपासून होईल सुटका

Benefits of Drinking Warm Water: हिवाळ्यात पाणी पिण्याचं प्रमाण अचानक कमी झाल्याने याचे शरीरावर अनेक दुष्परिणाम होतात. मात्र, हिवाळ्यात जर कोमट पाणी पिलात तर त्याचे अनेक फायदे होतात. या संदर्भात आज जाणून घेऊया.

    मुंबई, 8 डिसेंबर : आपल्या शरीरासाठी पाणी (Water) अतिशय महत्त्वाचा घटक आहे. आपल्या शरीराच्या एकूण वजनामध्ये 60-70 टक्के वाटा पाण्याचा असतो. पाण्यामुळे शरीरातील अनेक अवयवांचं कार्य सुरळीत राहण्यासाठी मदत होते. त्यामुळे दररोज पुरेसं पाणी पिण्याचा सल्ला तज्ज्ञ देतात. उन्हाळ्यामध्ये शरीर हायड्रेटेड ठेवण्यासाठी जास्त पाण्याची आवश्यकता असते, ही गोष्ट आपल्याला माहितीच आहे. उन्हाळ्यात (Summer) आपोआप आपण जास्त पाणी पितो. मात्र, हिवाळ्यामध्ये (Winter) वातावरणात गारवा असल्यामुळं आपण कमी पाणी पितो. आपल्याला असं वाटत की हिवाळ्यात शरीर हायड्रेटेड ठेवण्यासाठी जास्त पाणी लागत नाही. मात्र, आपला हा समज एकदम चुकीचा आहे. कारण, उन्हाळ्यापेक्षा हिवाळ्यामध्ये डिहायड्रेशन (Dehydration) होण्याची जास्त भीती असते. त्यामुळं हिवाळ्यात थंड नाही तर निदान कोमट पाणी (Warm Water) तरी प्यायलंच पाहिजे. हिवाळ्यात कोमट पाणी प्यायल्याचे इतरही अनेक फायदे आहेत. ब्लड सर्क्युलेशन सुधारतं उन्हाळ्याच्या तुलनेत हिवाळ्यामध्ये आपलं ब्लड प्रेशर (Blood pressure) म्हणजेच रक्तदाब जास्त असतो. कारण, थंडीमध्ये आपल्या रक्तवाहिन्या आकुंचन पावतात. कोमट पाणी प्यायल्यास आकुंचन पावलेल्या रक्तवाहिन्या आपल्या मूळ आकारात येण्यास मदत होते परिणामी ब्लड सर्क्युलेशन (Blood circulation) प्रक्रियाही सुधारते. मात्र, याच्या प्रभावावर फारच कमी प्रमाणात संशोधन झालेलं आहे. अंगदुखीवर आराम हिवाळ्याच्या दिवसांत अनेकांना अंगदुखीचा (Bodypain) आणि सांधेदुखीचा (Joint pain) जास्त त्रास होतो. अशा परिस्थितीत कोमट पाणी प्यायल्यास स्नायूंवरील ताण आणि डोकेदुखीपासून आराम मिळतो. शिवाय, मासिक पाळीच्या (Periods) वेळी होत असलेली पोटदुखीदेखील कमी होते. पचनशक्ती सुधारते एका अभ्यासानुसार, कोमट किंवा गरम पाणी प्यायल्यानं तुमचा मेटाबॉलिझम रेट (Metabolism rate) सुधारतो. त्यामुळं पचनाशी संबंधित सर्व अडचणी दूर होतात. थंड पाण्यापेक्षा गरम पाणी शरीरात लवकर विघटित होतं. त्यामुळे बद्धकोष्ठता, मूळव्याध आणि फिशर यांसारख्या घातक आजारांचा धोकाही कमी होतो. नाक आणि घशाच्या समस्यांपासून होते सुटका हिवाळ्यात चहासारखे गरम पेय सर्दी, खोकला, घसा खवखवणं यापासून त्वरित आराम देते. चहा प्रमाणंच कोमट पाणीदेखील सर्दी, खोकला आणि कफ या समस्यांवर उपयुक्त ठरते. कोमट पाण्यामुळं या समस्यांची तीव्रता कमी होते, कारण त्यामध्ये बॅक्टेरियाशी लढण्याची क्षमता असते. थंडीच्या कुडकुडीत मिळते ऊब काही लोकांना अजिबात थंडी सहन होत नाही. थंडीनं त्यांचं शरीर सतत थरथरत असतं. अशा परिस्थितीत गरम पाणी (Hot Water) प्यायल्यास थरथर थांबू शकते. गरम पाणी शरीराला ऊब देऊन तुमचं शरीर गरम ठेवण्याच काम करतं. वजन कमी (Weight loss) करण्यास उपयोगी हिवाळ्यात मेटाबॉलिझम रेट कमी झाल्यामुळं आपलं वजन वाढू लागतं. अनेक अभ्यासांमध्ये असा दावा केला गेला आहे की, गरम पाणी आपल्या चयापचय प्रणालीला चालना देतं आणि शरीरात साठलेली चरबी कमी करतं. त्यामुळे वाढत्या लठ्ठपणावर नियंत्रण ठेवण्यासाठी दिवसाची सुरुवात गरम पाण्याने करावी. सध्या हिवाळा ऋतू सुरू आहे. त्यामुळं पाण्याअभावी आपलं शरीर डिहायड्रेट होणार नाही याची सर्वांनी काळजी घ्यावी. शरीरातील पाण्याचं प्रमाण संतुलित ठेवण्यासाठी हिवाळ्यात कोमट पाण्याचा वापर करण्यास हरकत नाही.
    Published by:Rahul Punde
    First published:

    Tags: Drink water, Freshwater, Water

    पुढील बातम्या