जाहिरात
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / हेल्थ / Side Effects Of Mushroom: मशरूम खाणं शरीरासाठी ठरू शकतं हानिकारक; होऊ शकतात 'हे' गंभीर आजार

Side Effects Of Mushroom: मशरूम खाणं शरीरासाठी ठरू शकतं हानिकारक; होऊ शकतात 'हे' गंभीर आजार

Side Effects Of Mushroom: मशरूम खाणं शरीरासाठी ठरू शकतं हानिकारक; होऊ शकतात 'हे' गंभीर आजार

Side Effects Of Mushroom: मशरूम खाणं शरीरासाठी ठरू शकतं हानिकारक; होऊ शकतात 'हे' गंभीर आजार

Side Effects of Mushroom: मशरूममध्ये अनेक पोषक घटक असतात. त्याचा फायदा शरीराला होतो; मात्र मशरूम खाण्याचे काही दुष्परिणामही होऊ शकतात.

  • -MIN READ Trending Desk Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

    मुंबई: 1 सप्टेंबर: मशरूम्सचा वापर आहारातच नाही, तर काही आजार बरे करण्याकरिता औषध म्हणूनही केला जातो. खरं तर याची भाजी केली जात असली, तरी ती वनस्पती नाही. कारण मशरूम ही एक प्रकारची बुरशी आहे. उष्ण किंवा दमट हवामानात जंगलात ती वाढते. त्याची शेतीही केली जाते. मशरूमच्या काही प्रकारांचं आहारात सेवन केलं जातं. मशरूममध्ये अनेक पोषक घटक असतात. त्याचा फायदा शरीराला होतो; मात्र मशरूम खाण्याचे काही दुष्परिणामही (Side Effects Of Mushroom) होऊ शकतात. मशरूम खायला आवडत असेल, तर या दुष्परिणामांची माहितीही घेतली पाहिजे. ‘इंडिया डॉट कॉम’ने त्याबाबतचं वृत्त दिलं आहे. मशरूम खाल्ल्यामुळे कार्डिओव्हॅस्क्युलर, यकृताचे, श्वसनाचे व फुफ्फुसाचे आजार बरे होण्यासाठी मदत होते. याच्या सेवनानं रोगप्रतिकारशक्तीही वाढते. मशरूममध्ये जिवाणूविरोधी गुणधर्म असतात. शरीरातलं वाईट कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी ते मदत करतं. इतके सगळे फायदे असूनही मशरूमचे काही दुष्परिणामही आहेत.

    • थकवा - काही वेळा मशरूम खाल्ल्यानंतर थकवा येणं, झोप येणं (Feeling Sleepy) अशी लक्षणं दिसून येतात. तुम्हाला मशरूम खाणं मानवत नसेल, तर ते खाल्ल्यानं अस्वस्थ वाटू शकतं. तुमची ऊर्जा कमालीची कमी होऊ शकते. गळून गेल्यासारखं वाटू शकतं.
    • त्वचेवर अ‍ॅलर्जी – काही वेळा मशरूम खाल्ल्यामुळे त्वचेवर अ‍ॅलर्जी (Skin Reactions) येऊ शकते. त्वचेवर रॅश येणं, जळजळ होणं असे प्रकार घडू शकतात.
    • पोट बिघडणं – मशरूम हा बुरशीचा प्रकार (Type Of Fungi) असल्यानं काही वेळा पोट बिघडू शकतं. डायरिया, उलट्या होऊ शकतात. प्रत्येकाच्या शरीराला मशरूम खाणं मानवत नाही.
    • भ्रम निर्माण होणं – काही वेळा मशरूम खाल्ल्यानं बुद्धिभ्रमाची (Absent Mindedness) समस्या होऊ शकते. मशरूम खाल्ल्यानंतर थोडा काळ वास्तवाची जाणीव राहत नाही. मॅजिक मशरूम किंवा जंगली मशरूम खाल्ल्यानं काही वेळा हे घडू शकतं. त्यातल्या सायलोसायबीन नावाच्या घटकामुळे काही काळासाठी बुद्धिभ्रम निर्माण होतो.

    **हेही वाचा:** Cervical Cancer Vaccine : महाभयंकर कॅन्सरवर पुण्याने दिला जबरदस्त फॉर्म्युला; सीरमने लाँच केली पहिली स्वदेशी लस मशरूममध्ये भरपूर फायबर्स (High Fiber Food) असतात. तसंच जीवनसत्त्वं व खनिजंही असतात. ज्यांना वजन कमी करण्याचं डाएट करायचं असेल, त्यांच्यासाठी हा लो कॅलरी असलेला उत्तम पदार्थ आहे. मशरूमच्या हजारो जाती आहेत. दमट हवामानात जंगली भागात ही मशरूम्स वाढतात. मशरूमच्या काही प्रजाती खाण्यासाठी उत्तम समजल्या जातात. त्यात अँटी ऑक्सिडंट्स व अँटी कॅन्सर गुणधर्मही असतात; मात्र मशरूम खाण्यामुळे काही जणांना त्रास उद्भवू शकतो. काहींना अ‍ॅलर्जीही असते. त्यामुळेच मशरूम पहिल्यांदा खाणार असाल, तर त्याची पूर्ण माहिती घ्या.

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात