ईशा अंबानी आणि आनंद पिरामल विवाह बंधनात अडकणार!

ईशा अंबानी आणि आनंद पिरामल विवाह बंधनात अडकणार!

रिलायन्सचे प्रमुख मुकेश आणि नीता अंबानी यांची मुलगी ईशा अंबानी हिचा विवाह ठरला असून आनंद पिरामल हा ईशाचा होणार पती आहे.

  • Share this:

मुंबई,ता.06 मे: रिलायन्सचे प्रमुख मुकेश आणि नीता अंबानी यांची मुलगी ईशा अंबानी हिचा विवाह ठरला असून आनंद पिरामल हा ईशाचा होणार पती आहे.

येत्या डिसेंबरमध्ये ईशा आणि आनंदचा विवाह होणार आहे. उद्योगपती अजय आणि स्वाती पिरामल यांचा आनंद हा मुलगा आहे. आनंद आणि ईशा यांची अनेक वर्षांपासून मैत्री आहे. तसंच दोन्ही कुटुंबामध्ये चार दशकांपेक्षा अधिक काळ जिव्हाळ्याचे संबंध आहेत. आनंद हे परिमल रिएल्टीचे संस्थापक आहेत.

तर ईशा या रिलायन्स जिओ आणि रिलायन्स रिटेल या दोन कंपन्यांच्या संचालक मंडळावर आहेत. आनंदने ईशाला महाबळेश्वर इथल्या एका मंदिरात प्रपोज केलं होतं. त्यानंतर अंबानी आणि पिरामल या दोन्ही कुटुंबीयांनी एकत्र जेवण घेत हा प्रसंग साजरा केला.

 

First published: May 6, 2018, 7:51 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading