जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / Explainer / Year Ender 2021: कोरोना सावटातही विज्ञानात यंदा अनेक शोध! दातांशिवाय हत्तींचा जन्म तर सश्यांचे वाढले कान

Year Ender 2021: कोरोना सावटातही विज्ञानात यंदा अनेक शोध! दातांशिवाय हत्तींचा जन्म तर सश्यांचे वाढले कान

वर्ष 2021 हे जगासाठी तसेच विज्ञान (Science) जगतासाठी संमिश्र होते. या वर्षी कोरोना महामारीमुळे (Covid pandemic) अनेक संशोधन कार्यात व्यत्यय आला. तरीही अनेक संशोधनं खूप मोठी होती. यात जगाला दिलासा देणारी कोविड प्रतिबंधक लस. चीनमध्ये आढळलेलं जीवाश्म नवीन मानवी प्रजाती म्हणून घोषित करणे. हवामान बदलाशी संबंधित संशोधनात दोन अभ्यासातून धक्कादायक माहिती. तर मलेरियावरील लसीने जगाला नवी आशा दिली.

01
News18 Lokmat

वर्ष 2021 मध्ये कोविड महामारी असतानाही वैज्ञानिक क्षेत्रात अनेक उल्लेखनीय गोष्टी झाल्या आहेत. गेल्या दोन वर्षांत कोविड महामारीमुळे संशोधनाचा वेग मंदावला आहे, हे देखील सत्य आहे. मात्र, 2021 मध्ये लसीकरण आणि इतर उपायांमुळे उर्वरित जगाच्या काही कामांना नक्कीच गती मिळाली. 2021 मध्ये केलेल्या संशोधन कार्यात कोविड-19 वर अधिक भर देण्यात आला होता. प्रमुख सहा यशांपैकी दोन कोविड संबंधित संशोधनावर आहेत. आरोग्याव्यतिरिक्त, हवामान बदल आणि मानवी इतिहासाशी संबंधित शोधांनीही प्रमुख शोधांमध्ये स्थान मिळवलं. शास्त्रज्ञांना मानवी विकासाची अधिकाधिक महत्त्वाची माहिती मिळाली. (फोटो: Pixabay/ Nobu Tamura Wikimedia Commons द्वारे)

जाहिरात
02
News18 Lokmat

2021 च्या सर्वात मोठ्या शोधांपैकी मानवी इतिहासातील (Human history) ड्रॅगनमॅनच्या नवीन प्रजातीचा शोध हा सर्वात उल्लेखनीय होता, ज्याने आपल्या मानवी इतिहासात एक नवीन अध्याय जोडला. ही प्रजाती होमोसॅपियन्स आणि निअँडरथल मानवांबरोबरच वाढली. या मानवाचे जीवाश्म (Fossils) एका शेतकरी कुटुंबाने 90 वर्षांपूर्वी आजच्या बांधकाम जागेवरून मिळवले होते. 2018 मध्ये हे विद्यापीठाच्या संग्रहालयाकडे सुपूर्द केले होते. तेव्हापासून त्यावर सखोल अभ्यास सुरू होतं. या वर्षी प्राचीन मानवाच्या नवीन प्रजातीचे जीवाश्म म्हणून याला घोषित करण्यात आलं. त्याचं नामकरण होमो लाँगी (Homo longi) किंवा ड्रॅगन मॅन असं करण्यात आलंय. या शोधातून मानवी उत्क्रांतीबद्दल बरीच माहिती मिळण्याची आशा शास्त्रज्ञांना आहे. (फोटो: Nobu Tamura via Wikimedia Commons)

जाहिरात
03
News18 Lokmat

यावर्षी कोविड-19 च्या 19 (Covid-19) लसीवरील (Vaccine) संशोधनावर खूप भर देण्यात आला होता. यामुळे, शास्त्रज्ञांना दोन एमआरएनए (mRNA) लसी विकसित करण्यात यश आले. यावर्षी Pfizer आणि Moderna यासह अनेक लसी लोकांपर्यंत पोहोचल्या, ज्यामुळे या वर्षाच्या मध्यापासून मोठ्या संख्येने लोकांना कोविड-19 पासून सुटका मिळाली. भारतातील 41 टक्क्यांहून अधिक लोकांना लसीचे दोन्ही डोस मिळाले आहेत. त्याचवेळी, 141 कोटी लोकांनी किमान एक डोस घेतला आहे. त्याचवेळी, अमेरिकेतील 61 टक्के लोकसंख्येला दोन्ही डोस मिळाले आहेत. वर्षाच्या अखेरीस ओमिक्रॉन सारख्या प्रकारांचा पुन्हा प्रसार झाल्यामुळे अनेक देशांमध्ये तिसऱ्या लाटेचा धोका आहे. म्हणूनच संपूर्ण लसीकरणावर भर दिला जात आहे. (फाइल फोटो)

जाहिरात
04
News18 Lokmat

या वर्षी हवामान बदलाच्या (Climate change) बातम्याही चर्चेत होत्या. 2015 मधील पॅरिस परिषदेनंतर यंदा ग्लासगो येथे परिषद झाली. दुसरीकडे सर्व संशोधनांमध्ये हवामान बदलाच्या परिणामांचे गांभीर्य अधिक अधोरेखित केले गेले आहे. जगाने जंगलांमध्ये आग, दुष्काळ आणि उष्णतेच्या लाटांच्या घटनांमध्येही वाढ झाली आहे. सर्वात मोठा परिणाम समुद्राच्या आत दिसून आला आहे. वाढत्या तापमानाचा प्रवाळ खडकांवर (Coral Reefs) फार वाईट परिणाम झाला आहे. त्यांच्या ब्लिचिंगमुळे (Bleaching) आता त्यांच्या अस्तित्वाला धोका निर्माण झाला आहे. 2009 पासून एका दशकात आपल्या महासागरांनी त्यांच्या प्रवाळ खडकांपैकी 14 टक्के गमावले आहेत. हवामान बदलामुळे 1950 पासून जगाने अर्धे प्रवाळ खडक गमावले आहेत. हा पर्यावरण आणि सागरी जीवनासाठी मोठा धोका मानला जातो. (प्रतिकात्मक फोटो: shutterstock)

जाहिरात
05
News18 Lokmat

यावर्षी लोकांचे लक्ष बहुधा कोरोना विषाणू आणि कोविड-19 महामारीकडे लागलेले असेल. मात्र, शास्त्रज्ञांनी आरोग्य (Health) क्षेत्रातही मोठी कामगिरी केली आहे. जागतिक आरोग्य संघटनेने मलेरिया (Malaria) रोगावरील पहिल्या लसीला (Vaccine) मान्यता दिली आहे. परजीवीमुळे होणाऱ्या कोणत्याही रोगावरील ही पहिली लस आहे. Mosquirix ब्रँडची ही लस विकसित होण्यासाठी तीस वर्षे आणि 75 कोटी डॉलर्स लागले आहेत. मलेरियामुळे जगात दरवर्षी 5 लाखांहून अधिक लोकांचा मृत्यू होतो, त्यापैकी 2.5 लाखांहून अधिक फक्त मुले असतात. गंभीर मलेरियाच्या प्रकरणांमध्ये ही लस केवळ 30 टक्के प्रभावी असल्याचे आढळून आले आहे, त्यानंतर शास्त्रज्ञांना आशा आहे की ही लस अनेकांचे जीव वाचवू शकते. (प्रतिकात्मक फोटो: shutterstock)

जाहिरात
06
News18 Lokmat

हवामान बदलासाठी (Climate change) मानव निर्मित गोष्टी फार पूर्वीपासून जबाबदार मानले जात आहेत. ग्लोबल वॉर्मिंग (Global warming) असो किंवा अंटार्क्टिकावरील ओझोनच्या थराला पडलेले छिद्र असो, या सगळ्याला मानवनिर्मित उत्सर्जन जबाबदार आहे. पण यावर्षी एका अभ्यासाने या परिणामाची खोली सांगून सर्वांनाच आश्चर्यचकित केले आहे. प्राण्यांच्या (Animals) विकास प्रक्रियेवर मानवाचा प्रभाव पडतो. एका अभ्यासात हस्तिदंतीशिवाय मोठ्या संख्येने हत्ती (Elephants ) विकसित होताना दिसले. आज अर्ध्याहून अधिक मादी आफ्रिकन हत्तींचा जन्म दातांशिवाय होत आहे. हवामान बदलाचा सामना करण्यासाठी प्राणी त्यांच्या आकारासह त्यांच्या सवयी बदलत असल्याचे एका मोठ्या अभ्यासात आढळून आले आहे. काही पक्ष्यांचे वजन वाढले आहे, वटवाघुळांचे पंख वाढले आहेत, सशांना लांब कान आले आहेत. (प्रतिकात्मक फोटो: shutterstock)

जाहिरात
07
News18 Lokmat

कोविड-19 च्या (Covid-19) बाबतीत या वर्षी संपूर्ण जगाचे लक्ष लसीकरणाकडे (Vaccination) होते. मात्र, एका वर्षाच्या अभ्यासानंतर मर्क कंपनीला अँटीव्हायरल औषधाच्या (Antiviral Drug) तिसऱ्या टप्प्यातील चाचणीचे अतिशय उत्साहवर्धक परिणाम मिळाले आहेत. या वर्षी ऑक्टोबरमध्ये, कंपनीने डेटा सादर केला आहे जो दर्शवितो की मोलनुपीरावीर कोविड -19 मुळे रुग्णालयात जाणाऱ्या रुग्णांची संख्या निम्म्याने कमी करू शकते. यानंतर कंपनीने आपला निकालही एफडीएला दिला आहे. यूकेनेही यासाठी परवानगी दिली आहे. यानंतर, नोव्हेंबरच्या उत्तरार्धात, एफडीएने त्याच्या आपत्कालीन वापरास मान्यता दिली. याशिवाय, इतर औषधांवर चाचण्या सुरू आहेत ज्यांचे परिणाम समाधानकारक आहेत. (प्रतिकात्मक फोटो: shutterstock)

जाहिरात
  • First Published :
जाहिरात
जाहिरात
  • 01 07

    Year Ender 2021: कोरोना सावटातही विज्ञानात यंदा अनेक शोध! दातांशिवाय हत्तींचा जन्म तर सश्यांचे वाढले कान

    वर्ष 2021 मध्ये कोविड महामारी असतानाही वैज्ञानिक क्षेत्रात अनेक उल्लेखनीय गोष्टी झाल्या आहेत. गेल्या दोन वर्षांत कोविड महामारीमुळे संशोधनाचा वेग मंदावला आहे, हे देखील सत्य आहे. मात्र, 2021 मध्ये लसीकरण आणि इतर उपायांमुळे उर्वरित जगाच्या काही कामांना नक्कीच गती मिळाली. 2021 मध्ये केलेल्या संशोधन कार्यात कोविड-19 वर अधिक भर देण्यात आला होता. प्रमुख सहा यशांपैकी दोन कोविड संबंधित संशोधनावर आहेत. आरोग्याव्यतिरिक्त, हवामान बदल आणि मानवी इतिहासाशी संबंधित शोधांनीही प्रमुख शोधांमध्ये स्थान मिळवलं. शास्त्रज्ञांना मानवी विकासाची अधिकाधिक महत्त्वाची माहिती मिळाली. (फोटो: Pixabay/ Nobu Tamura Wikimedia Commons द्वारे)

    MORE
    GALLERIES

  • 02 07

    Year Ender 2021: कोरोना सावटातही विज्ञानात यंदा अनेक शोध! दातांशिवाय हत्तींचा जन्म तर सश्यांचे वाढले कान

    2021 च्या सर्वात मोठ्या शोधांपैकी मानवी इतिहासातील (Human history) ड्रॅगनमॅनच्या नवीन प्रजातीचा शोध हा सर्वात उल्लेखनीय होता, ज्याने आपल्या मानवी इतिहासात एक नवीन अध्याय जोडला. ही प्रजाती होमोसॅपियन्स आणि निअँडरथल मानवांबरोबरच वाढली. या मानवाचे जीवाश्म (Fossils) एका शेतकरी कुटुंबाने 90 वर्षांपूर्वी आजच्या बांधकाम जागेवरून मिळवले होते. 2018 मध्ये हे विद्यापीठाच्या संग्रहालयाकडे सुपूर्द केले होते. तेव्हापासून त्यावर सखोल अभ्यास सुरू होतं. या वर्षी प्राचीन मानवाच्या नवीन प्रजातीचे जीवाश्म म्हणून याला घोषित करण्यात आलं. त्याचं नामकरण होमो लाँगी (Homo longi) किंवा ड्रॅगन मॅन असं करण्यात आलंय. या शोधातून मानवी उत्क्रांतीबद्दल बरीच माहिती मिळण्याची आशा शास्त्रज्ञांना आहे. (फोटो: Nobu Tamura via Wikimedia Commons)

    MORE
    GALLERIES

  • 03 07

    Year Ender 2021: कोरोना सावटातही विज्ञानात यंदा अनेक शोध! दातांशिवाय हत्तींचा जन्म तर सश्यांचे वाढले कान

    यावर्षी कोविड-19 च्या 19 (Covid-19) लसीवरील (Vaccine) संशोधनावर खूप भर देण्यात आला होता. यामुळे, शास्त्रज्ञांना दोन एमआरएनए (mRNA) लसी विकसित करण्यात यश आले. यावर्षी Pfizer आणि Moderna यासह अनेक लसी लोकांपर्यंत पोहोचल्या, ज्यामुळे या वर्षाच्या मध्यापासून मोठ्या संख्येने लोकांना कोविड-19 पासून सुटका मिळाली. भारतातील 41 टक्क्यांहून अधिक लोकांना लसीचे दोन्ही डोस मिळाले आहेत. त्याचवेळी, 141 कोटी लोकांनी किमान एक डोस घेतला आहे. त्याचवेळी, अमेरिकेतील 61 टक्के लोकसंख्येला दोन्ही डोस मिळाले आहेत. वर्षाच्या अखेरीस ओमिक्रॉन सारख्या प्रकारांचा पुन्हा प्रसार झाल्यामुळे अनेक देशांमध्ये तिसऱ्या लाटेचा धोका आहे. म्हणूनच संपूर्ण लसीकरणावर भर दिला जात आहे. (फाइल फोटो)

    MORE
    GALLERIES

  • 04 07

    Year Ender 2021: कोरोना सावटातही विज्ञानात यंदा अनेक शोध! दातांशिवाय हत्तींचा जन्म तर सश्यांचे वाढले कान

    या वर्षी हवामान बदलाच्या (Climate change) बातम्याही चर्चेत होत्या. 2015 मधील पॅरिस परिषदेनंतर यंदा ग्लासगो येथे परिषद झाली. दुसरीकडे सर्व संशोधनांमध्ये हवामान बदलाच्या परिणामांचे गांभीर्य अधिक अधोरेखित केले गेले आहे. जगाने जंगलांमध्ये आग, दुष्काळ आणि उष्णतेच्या लाटांच्या घटनांमध्येही वाढ झाली आहे. सर्वात मोठा परिणाम समुद्राच्या आत दिसून आला आहे. वाढत्या तापमानाचा प्रवाळ खडकांवर (Coral Reefs) फार वाईट परिणाम झाला आहे. त्यांच्या ब्लिचिंगमुळे (Bleaching) आता त्यांच्या अस्तित्वाला धोका निर्माण झाला आहे. 2009 पासून एका दशकात आपल्या महासागरांनी त्यांच्या प्रवाळ खडकांपैकी 14 टक्के गमावले आहेत. हवामान बदलामुळे 1950 पासून जगाने अर्धे प्रवाळ खडक गमावले आहेत. हा पर्यावरण आणि सागरी जीवनासाठी मोठा धोका मानला जातो. (प्रतिकात्मक फोटो: shutterstock)

    MORE
    GALLERIES

  • 05 07

    Year Ender 2021: कोरोना सावटातही विज्ञानात यंदा अनेक शोध! दातांशिवाय हत्तींचा जन्म तर सश्यांचे वाढले कान

    यावर्षी लोकांचे लक्ष बहुधा कोरोना विषाणू आणि कोविड-19 महामारीकडे लागलेले असेल. मात्र, शास्त्रज्ञांनी आरोग्य (Health) क्षेत्रातही मोठी कामगिरी केली आहे. जागतिक आरोग्य संघटनेने मलेरिया (Malaria) रोगावरील पहिल्या लसीला (Vaccine) मान्यता दिली आहे. परजीवीमुळे होणाऱ्या कोणत्याही रोगावरील ही पहिली लस आहे. Mosquirix ब्रँडची ही लस विकसित होण्यासाठी तीस वर्षे आणि 75 कोटी डॉलर्स लागले आहेत. मलेरियामुळे जगात दरवर्षी 5 लाखांहून अधिक लोकांचा मृत्यू होतो, त्यापैकी 2.5 लाखांहून अधिक फक्त मुले असतात. गंभीर मलेरियाच्या प्रकरणांमध्ये ही लस केवळ 30 टक्के प्रभावी असल्याचे आढळून आले आहे, त्यानंतर शास्त्रज्ञांना आशा आहे की ही लस अनेकांचे जीव वाचवू शकते. (प्रतिकात्मक फोटो: shutterstock)

    MORE
    GALLERIES

  • 06 07

    Year Ender 2021: कोरोना सावटातही विज्ञानात यंदा अनेक शोध! दातांशिवाय हत्तींचा जन्म तर सश्यांचे वाढले कान

    हवामान बदलासाठी (Climate change) मानव निर्मित गोष्टी फार पूर्वीपासून जबाबदार मानले जात आहेत. ग्लोबल वॉर्मिंग (Global warming) असो किंवा अंटार्क्टिकावरील ओझोनच्या थराला पडलेले छिद्र असो, या सगळ्याला मानवनिर्मित उत्सर्जन जबाबदार आहे. पण यावर्षी एका अभ्यासाने या परिणामाची खोली सांगून सर्वांनाच आश्चर्यचकित केले आहे. प्राण्यांच्या (Animals) विकास प्रक्रियेवर मानवाचा प्रभाव पडतो. एका अभ्यासात हस्तिदंतीशिवाय मोठ्या संख्येने हत्ती (Elephants ) विकसित होताना दिसले. आज अर्ध्याहून अधिक मादी आफ्रिकन हत्तींचा जन्म दातांशिवाय होत आहे. हवामान बदलाचा सामना करण्यासाठी प्राणी त्यांच्या आकारासह त्यांच्या सवयी बदलत असल्याचे एका मोठ्या अभ्यासात आढळून आले आहे. काही पक्ष्यांचे वजन वाढले आहे, वटवाघुळांचे पंख वाढले आहेत, सशांना लांब कान आले आहेत. (प्रतिकात्मक फोटो: shutterstock)

    MORE
    GALLERIES

  • 07 07