वाढत्या लोकसंख्येमुळे जगभरात परिस्थिती गंभीर होत चालली आहे. दरवर्षी जागतिक लोकसंख्या दिनी असं वाटतं की वाढत्या लोकसंख्येमुळे आपण कुठे चाललो आहोत.
जगाची लोकसंख्या दररोज किती वाढत आहे हे तुम्हाला माहीत आहे का? हा आकडा ऐकून तुम्हालाही धक्का बसेल. जगात दररोज सुमारे 02 ते 04 लाख मुलं जन्माला येत आहेत. जगात दर अडीच सेकंदाला एक बाळ जन्माला येते. हा दर तासाला सुमारे 9000 इतका आहे.
भारतातही ज्या पद्धतीने लोकसंख्या वाढत आहे, त्यावरून असे दिसते की येत्या एक-दोन वर्षांत भारताची लोकसंख्या चीनला मागे टाकेल.
जगाची लोकसंख्या 100 कोटी होण्यासाठी 1800 वर्षे लागली. पण, त्यानंतर लोकसंख्येचा स्फोट होत आहे. यात विकसनशील देशात वाढणारी लोकसंख्या मोठी समस्या आहे.
धर्माच्या आधारे बघितले तर जगात सर्वात जास्त लोकसंख्या ख्रिश्चनांची आहे, तर मुस्लिम दुसऱ्या क्रमांकावर आहेत. जगातील 31 टक्के ख्रिश्चन आणि 23 टक्के मुस्लिम आहेत.