जाहिरात
मराठी बातम्या / Explainer / Decathlon वर MP मोईत्रा का भडकल्या; तुम्हीही नेहमी तुमचा फोन नंबर मॉलमध्ये सांगता का? जाणून घ्या कायदा आणि प्रकरण

Decathlon वर MP मोईत्रा का भडकल्या; तुम्हीही नेहमी तुमचा फोन नंबर मॉलमध्ये सांगता का? जाणून घ्या कायदा आणि प्रकरण

Decathlon वर MP मोईत्रा का भडकल्या; तुम्हीही नेहमी तुमचा फोन नंबर मॉलमध्ये सांगता का? जाणून घ्या कायदा आणि प्रकरण

Mahua Moitra Decathlon Controversy: टीएमसी खासदार महुआ मोईत्रा यांनी डेकॅथलॉन स्टोअरविरोधात सोशल मीडियावर आघाडी उभारली आहे. काय आहे प्रकरण? चला जाणून घेऊ.

  • -MIN READ
  • Last Updated :

नवी दिल्ली, 28 एप्रिल : तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोईत्रा पुन्हा एकदा चर्चेत आल्या आहेत. महुआ यांनी ट्विटरवर, डेकॅथलॉन (Decathlon) या स्पोर्टिंग ब्रँडविरोधात तक्रार केली आहे. महुआ या त्यांच्या वडिलांसाठी ट्राउजर्स खरेदी करण्यासाठी दिल्ली एनसीआरमधील अन्सल प्लाझा येथील शोरूममध्ये गेल्या होत्या. त्यांना बिलिंग काउंटरवर फोन नंबरसंदर्भात आणि ईमेल आयडीसंदर्भात विचारणा करण्यात आली. यानंतर संतापलेल्या महुआ यांनी त्यांचा संपर्क क्रमांक आणि ईमेल आयडी (Email ID) देण्यास नकार दिला आणि स्टोअरमधूनच ट्विट केले. यात, डेकॅथलॉन गोपनीयता आणि ग्राहक कायद्यांचे उल्लंघन करत असल्याचे त्यांनी म्हटले आहे. यासंदर्भात ग्राहक संरक्षण कायदा काय सांगतो चला जाणून घेऊया. काय आहे प्रकरण? महुआ मोईत्रा यांनी आपल्या ट्विटमध्ये लिहिले की, ‘अन्सल प्लाझा येथे डेकॅथलॉन इंडियाकडून वडिलांसाठी 1499 रुपयांचे ट्राउझर खरेदी करण्यासाठी आलो आहे. मॅनेजर म्हणत आहेत की खरेदी करण्यासाठी मला माझा मोबाइल नंबर आणि ईमेल आयडी सांगावा लागेल. Decathlon India माफ करा, तुम्ही गोपनीयता कायदे आणि ग्राहक कायद्यांचे उल्लंघन करत आहात. मी सध्या दुकानात आहे. UK मध्ये शॉपिंग करताना वेगळा अनुभव तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोइत्रा इथेच थांबल्या नाहीत आणि त्यांनी अनेक ट्विट केले, यातील एका ट्विटमध्ये असेही लिहिले की, ‘मी नेहमी डेकॅथलॉन यूकेमधून वस्तू खरेदी करते. पण त्यांनी मला कधीच माझा मोबाईल नंबर विचारला नाही. जेव्हा एखाद्याला पेपरलेस पावती हवी असेल तेव्हा ईमेल मागितला जातो. अशा परिस्थितीत कंपनीची भारतीय शाखा ग्राहकांना फसवत असल्याचे स्पष्ट होत आहे, हे योग्य नाही.’ आजपर्यंत हिंदी देशाची राष्ट्रभाषा का झाली नाही? भाषेपायी गेलेत कित्येकांचे जीव कायद्यानुसार ग्राहकांना खालील सहा ग्राहक हक्क आहेत: सुरक्षिततेचा अधिकार माहिती मिळण्याचा अधिकार निवडण्याचा अधिकार ऐकण्याचा अधिकार निवारण मागण्याचा अधिकार ग्राहक जागृतीचा अधिकार गोपनीयता कायदा गोपनीयतेचा अधिकार देशात सर्वांना आहे. त्यानुसार सरकारी अथवा कोणत्याही अधिकृत कारणाशिवाय कोणतीही व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीची खाजगी माहिती परवानगीशिवाय घेऊ शकत नाही. कुठल्याही ठिकाणी असं होत असल्यास हे गोपनीयता कायद्याचं उल्लंघन समजलं जातं. ग्राहकांच्या हक्कामध्येही याचे अधिकार येतात. याविरोधात तक्रार करण्याचाही अधिकार ग्राहकाला असतो.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात