Home /News /explainer /

वीज अंगावर पडल्यानंतरही वाचू शकतो जीव, फक्त एक काम करावं लागेल

वीज अंगावर पडल्यानंतरही वाचू शकतो जीव, फक्त एक काम करावं लागेल

पावसाळ्यात अनेकदा ढगांमध्ये वीज चमकते (lightning strikes) आणि जमिनीवर पडते. मात्र, ती नेहमीच अपायकारक नसते. विजेमुळे माणसाचे डोके, मान आणि खांदे यांचे सर्वाधिक नुकसान होते. पावसाळ्यात दुपारच्या वेळी विजांचा कडकडाट होण्याची शक्यता सर्वाधिक असते.

पुढे वाचा ...
    मुंबई, 27 मे : दरवर्षी पावसाळ्यात देशातील वेगवेगळ्या भागात वीज अंगावर (lightning strikes) पडल्याने अनेकांचा मृत्यू होतो. जनावरही दगवल्याच्या घटना घडत असतात. यातील बहुतांश घटना या ग्रामीण भागात घडत असल्याने पावसाळ्यात नागरिकांच्या मनात धाकधूक वाढलेली असते. यापासून वाचण्यासाठी काय करायल हवं, याबद्दल माहिती नसल्यानेही अनेकजण याला बळी पडतात. पावसाळ्यातच वीज का पडते? ती टाळता येऊ हे जाणून घेऊया. विजेमुळे माणसाला काय धोका? पावसाळ्यात अनेकदा ढगांमध्ये वीज चमकते आणि जमिनीवरही पडते. मात्र, ती नेहमीच हानिकारक नसते. आकाशीय विजेचे तापमान सूर्याच्या वरच्या पृष्ठभागापेक्षा जास्त असते. ही वीज एक मिलिसेकंदापेक्षा कमी काळ टिकते. आकाशातील विजेमुळे माणसाचे डोकं, मान आणि खांदे यांचे सर्वाधिक नुकसान होते. पावसाळ्यात दुपारच्या वेळी विजांचा कडकडाट होण्याची शक्यता सर्वाधिक असते. NASA च्या अधिकृत आकडेवारीनुसार, पूर्व भारतातील ब्रह्मपुत्रा खोऱ्यात एप्रिल ते मे दरम्यान सरासरी दर महिन्याला जगातील सर्वाधिक वीज चमकते. पण व्हेनेझुएलाच्या माराकाइबो सरोवराचे नाव गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये सर्वाधिक वीज पडणारे ठिकाण म्हणून नोंदवले गेले आहे. येथे दरवर्षी प्रत्येक किलोमीटरवर 250 वेळा वीज चमकते. वीज पडल्याने मृत्यू कसा होतो? वीज अनेक प्रकारे पडू शकते. थेट स्ट्राईक जास्त होत नसला तरी तो सर्वाधिक जीवघेणा मानला जातो. जर वीज थेट एखाद्या व्यक्तीवर पडली तर तो डिस्चार्ज चॅनेलचा एक भाग बनतो. बहुतेक थेट स्ट्राइक खुल्या भागात होतात. झाडाखाली आश्रय घेणाऱ्यांना वीज पडण्याचा धोका जास्त असतो. या घटनेला 'साइड फ्लॅश' म्हणतात. असे तेव्हा घडते जेव्हा वीज व्यक्तीच्या जवळ असलेल्या लांबलचक वस्तूवर पडते आणि विद्युत प्रवाहाचा एक भाग त्या लांब वस्तूद्वारे पीडितपर्यंत पोहोचते. भारतातील मृत्यूंपैकी एक चतुर्थांश मृत्यू हे झाडाखाली किंवा जवळ उभ्या असलेल्या लोकांचे झाले आहेत. आकाशातून वीज पडणे ही अत्यंत गंभीर घटना आहे, जी जीवघेणी आहे. मात्र, पीडितेला योग्य वेळी योग्य उपचार मिळाले तर अनेकांचे प्राण वाचू शकतात. हवामान : Yellow, Orange आणि Red अलर्ट काय आहेत? रंगावरुन असा ओळखा धोका विजेपासून बचाव करण्यासाठी ही खबरदारी घ्या उंच ठिकाणे, पर्वत, शिखरे, पूल इत्यादींवरून खाली किंवा घरी आश्रय घ्या. मोठ्या दगडाखाली उभे राहू नका. तुम्ही घरी असाल तर वादळ किंवा पावसादरम्यान तुमचा टीव्ही, रेडिओ, फ्रीज किंवा इतर विजेच्या वस्तूंचे प्लग काढून टाका. वाहनात असेल तर त्यात थांबा पण दुचाकीपासून दूर राहा कारण त्यात पाय जमिनीवरच राहतात. पावसाळ्यात मोबाईल वापरणे टाळा तलाव, पाणवठे आणि जलतरण तलावापासून अंतर ठेवा, गटातटात उभे राहू नका, तर दूरवर उभे राहा, आजूबाजूला वीज किंवा टेलिफोनच्या तारा नाहीत याची खात्री करा. जमिनीवर अनवाणी उभे राहू नका. इलेक्ट्रिक उपकरणांपासून अंतर ठेवा. झाडाखाली किंवा मोकळ्या मैदानात जाणे टाळा आणि इमारतीखाली लपून स्वतःचे संरक्षण करण्याचा प्रयत्न करा. कोणत्याही प्रकारची मजबूत भिंत एखाद्या व्यक्तीचे प्राण वाचवू शकते. एखाद्या व्यक्तीला वीज पडल्यानंतर काय करावे? विजेच्या धक्क्यानंतर जास्तीकरुन हृदयविकाराच्या झटक्याने व्यक्तीचा मृत्यू होतो. त्यामुळे, सर्वप्रथम पीडितेच्या हृदयाचे ठोके आणि श्वासोच्छवास चालू आहे की नाही हे पहा. जर ती व्यक्ती श्वास घेत नसेल तर त्यांना तोंडाने श्वास देण्याचा (CPR) प्रयत्न करा. जेव्हा हृदयाचे ठोके थांबतात तेव्हा सीपीआरसह छाती जोराने दाबण्याचा प्रयत्न करा. एकाच ठिकाणी दोनदा वीज पडू शकते, त्यामुळे जर तुम्ही अशा ठिकाणी असाल जिथे विजेचा धोका जास्त असेल, तर रुग्णाला ताबडतोब लांब न्या. जेव्हा विजेचा धक्का बसतो तेव्हा एखाद्या व्यक्तीची हाडे मोडली जाऊ शकतात किंवा त्याची दृष्टी किंवा ऐकू येऊ शकते. त्यामुळे या गोष्टी तपासा. जेव्हा विजेचा धक्का बसतो तेव्हा एखाद्या व्यक्तीची हाडे मोडली जाऊ शकतात किंवा त्याची दृष्टी किंवा बहिरेपणा येऊ शकतो. त्यामुळे या गोष्टी तपासा. रुग्णाला तातडीने वैद्यकीय सुविधा द्या.
    Published by:Rahul Punde
    First published:

    Tags: Rain, Rainfall

    पुढील बातम्या