मराठी बातम्या /बातम्या /explainer /night curfew का लावला जातो, कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी खरोखर ठरतो प्रभावी का?

night curfew का लावला जातो, कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी खरोखर ठरतो प्रभावी का?

नाईट कर्फ्यू म्हणजे रात्रीची संचारबंदी होय. यासाठी एक वेळ ठरवण्यात येते. नाईट कर्फ्यू हा फक्त भारतातच नाही, तर विदेशातही लावला गेला आहे.

नाईट कर्फ्यू म्हणजे रात्रीची संचारबंदी होय. यासाठी एक वेळ ठरवण्यात येते. नाईट कर्फ्यू हा फक्त भारतातच नाही, तर विदेशातही लावला गेला आहे.

नाईट कर्फ्यू म्हणजे रात्रीची संचारबंदी होय. यासाठी एक वेळ ठरवण्यात येते. नाईट कर्फ्यू हा फक्त भारतातच नाही, तर विदेशातही लावला गेला आहे.

  मुंबई, 24 डिसेंबर : गेल्या दीड वर्षापासून कोरोनाने (corona) हाहाकार माजवला आहे. कोरोनाच्या नव्या ओमायक्रॉन व्हेरियंटने चिंता वाढवली आहे. ओमायक्रॉन बाधितांचा वाढता आकडा लक्षात घेता उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेशमध्ये नाईट कर्फ्यू (Night Curfew) जारी करण्यात आला आहे. महाराष्ट्रात सुद्धा जमावबंदी लागू करण्यात आली आहे. ओमायक्रॉनचा संसर्ग रोखण्यासाठी राज्य सरकारने हा निर्णय घेतला आहे. कोरोनाची दुसरी लाट आली होती. तेव्हाही अनेक राज्यांनी नाईट कर्फ्यू लावला होता. रात्री संचारबंदी करण्यात आली होती. पण, नागरिक तर दिवसा घराबाहेर पडतात. मग नाईट कर्फ्यूचा काय फायदा असा प्रश्न अनेकांना पडला आहे. अनेकांच्या मनात नाईट कर्फ्यूविषयी शंका आहेत. तर आज आम्ही तुम्हाला रात्री संचारबंदी लावण्यामागची कारणं आणि त्याचे फायदे (Night Curfew Benefit) काय आहेत, हे सांगणार आहोत.

  नाईट कर्फ्यू म्हणजे रात्रीची संचारबंदी होय. यासाठी एक वेळ ठरवण्यात येते. नाईट कर्फ्यू हा फक्त भारतातच नाही, तर विदेशातही लावला गेला आहे. न्यूयॉर्क टाइम्सच्या रिपोर्टनुसार, कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी नाईट कर्फ्यू लावण्यात आल्याचे Pueblo चे महापौर निकोलस ग्रॅडिसर यांनी म्हटलं होतं. 20 ते 50 वर्षे वयोगटातील काही लोक रात्रीच्या वेळी घऱाबाहेर फिरतात आणि मौजमजा करण्यासाठी एकत्र येतात. नाईट कर्फ्यू लावल्यास त्यांना घरातच थांबावे लागते. यामुळे कोरोनाचा प्रसार ऱोखण्यास मदत होते, याबाबत टीव्ही 9 हिंदीने वृत्त दिलं आहे.

  ख्रिसमस आणि हिवाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये लोक फिरायला बाहेर जातात. तसंच नवीन वर्ष लागण्याच्या रात्री म्हणजे 31 डिसेंबरला अनेक जण पार्ट्या करतात. त्यामुळे रात्री संचारबंदी केल्यास गर्दी कमी होते आणि यामुळे संसर्गाचा धोकाही कमी होतो. नाईट कर्फ्यू हा रात्री 8, 10, 11 ते सकाळी 6 या वेळेत लावला जातो. राज्यानुसार या वेळा बदलतात. नाईट कर्फ्यूमुळे लोक एकमेकांच्या संपर्कात न आल्याने कोरोनावर नियंत्रण मिळवण्यास मदत मिळते.

  नाईट कर्फ्यू संदर्भात राजस्थानचे गृह सचिव एनएल मीणा यांनी सांगितले की, 'अनेक लोक रात्रीच्या वेळी जेवायला बाहेर पडतात. हॉटेलमध्ये एकत्र येतात. तसंच बाजारांमध्ये गर्दी करतात. लोक निष्काळजी होतात आणि मार्गदर्शक तत्त्वांचे योग्य पालन करत नाहीत. त्यामुळे गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी हे पाऊल उचलण्यात येते. नाईट कर्फ्यूमुळे कोरोनाचा प्रसार ऱोखण्यात मोठ्या प्रमाणात मदत होते. राजस्थानमध्ये कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी नाईट कर्फ्यू लावण्यात आला होता. नाईट कर्फ्यूचा चांगला परिणाम पाहायला मिळाला होता. बऱ्याच प्रमाणात कोरोना रुग्ण संख्या कमी झाल्याचे त्यांनी सांगितले.

  First published:

  Tags: Night Curfew