Home /News /explainer /

Space and Height : अंतराळात गेल्यानंतर माणसाची उंची का वाढते? पृथ्वीवर आल्यावर त्यांचं काय होतं?

Space and Height, Space Wonder, Space research, Human Height : अंतराळात गेल्यावर मानवाची उंची वाढते हे खरे आहे का? इंटरनॅशनल स्पेस स्टेशनवर राहणाऱ्या अंतराळवीरांवर केलेल्या संशोधनातून असे दिसून आले आहे की अंतराळात राहताना त्यांची उंची वाढते. ही वाढ कशी असते हे जाणून घेणं खूप मनोरंजक आहे. विशेष म्हणजे वाढलेली उंची असलेली व्यक्ती परत आल्यावर त्यांचं काय होतं?

पुढे वाचा ...
  निळं आकाश, गडद ढग, चंद्र आणि ताऱ्यांपेक्षा आपल्याला अवकाशाबद्दल जास्त माहिती नाही. सामान्यत: संशोधक आणि संशोधकांसाठी राखीव असलेल्या अंतराळाविषयी अनेक मनोरंजक आणि विचित्र गोष्टी आहेत ज्यांची सामान्य माणूस कल्पनाही करू शकत नाही. विज्ञान कल्पनेपेक्षा अवकाशाचे जग अधिक आश्चर्यकारक आहे.

  अंतराळात सहा महिने घालवल्यानंतर अंतराळवीर त्यांच्या वास्तविक उंचीपेक्षा सुमारे तीन टक्के उंच होतात. याचं कारण म्हणजे पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणाचा त्यांच्यावर कोणताही परिणाम होत नाही, त्यामुळे त्यांची उंची वाढते. खरतंर ही उंची तात्पुरती असून जमिनीवर परत आल्यानंतर काही महिन्यांत पूर्वीसारखी होते.

  जर तुम्ही अंतराळात पाणी उकळलं तर तो पृथ्वीपेक्षा पूर्णपणे वेगळा अनुभव असेल. जमीनीवर उकळत्या पाण्यात शेकडो हजारो बुडबुडे तयार होतात. मात्र, अंतराळात पाणी गरम केल्यास एकच मोठा बुडबुडा तयार होतो. याचं कारण शोधले असता पृथ्वीचे गुरुत्वाकर्षण याला कारणीभूत असल्याचे समोर आले. अंतराळात पाणी उकळण्याच्या वेगळ्या पद्धतीने प्रेरित होऊन, शास्त्रज्ञ अवकाशयानांना त्वरीत थंड करण्याचे मार्ग शोधत आहेत.

  सुमारे 30 वर्षांच्या प्रयोगांनी हे सिद्ध केले आहे की जंतू अवकाशात वेगाने वाढतात आणि पृथ्वीवर वाढणाऱ्या जीवाणूंपेक्षा ते अत्यंत धोकादायक असतात. इथं जीवाणूंची आनुवंशिकता बदलते. यावर सातत्याने प्रयोगही केले जात असून त्यांच्या माध्यमातून वैद्यकीय शास्त्रात काहीतरी नवीन करता येईल, अशी अपेक्षा आहे.

  भविष्यात अवकाशात जायचे असेल तर सोडा किंवा कोक पिण्याचा मोह सोडा. स्पेसमध्ये गुरुत्वाकर्षण नसल्यामुळे गॅसचे बुडबुडे निष्क्रीय होतात आणि सोडा प्यायल्यानंतरही ढेकर येत नाही आणि पोटात विचित्र भावना जाणवते. अंतराळवीरांची ही अडचण लक्षात घेऊन ऑस्ट्रेलियात स्पेस बिअरवर प्रयोग सुरू आहेत.

  फुलांचा सुगंध अवकाशात पूर्णपणे बदलतो. इथं तापमान, आर्द्रता आणि अनेक कारणांमुळे वनस्पतीपासून तयार होणारे तेलकट घटक प्रभावित होतात, त्याचा परिणाम सुगंधावर होतो. एका जपानी परफ्यूम कंपनीने या जगातील वेगळा सुगंध टिपण्याचा प्रयत्न करत तो त्यांच्या एका परफ्यूम कुपीत आणण्याचा प्रयत्न केला.

  स्पेसमधील घामही तुम्हाला घाम फोडू शकतो. इथे गुरुत्वाकर्षण नसल्यामुळे घाम येतो पण सुकत नाही की टपकत नाही. यामुळे घाम जिथं असतो, तिथंच राहतो.

  Published by:Rahul Punde
  First published:

  Tags: Space, Space Centre, Spacecraft

  पुढील बातम्या