मराठी बातम्या /बातम्या /explainer /Death Anniversary Periyar : पेरियार ज्यांनी वयाच्या 70व्या वर्षी 40 वर्षांनी लहान मुलीशी केला विवाह, काय होतं कारण?

Death Anniversary Periyar : पेरियार ज्यांनी वयाच्या 70व्या वर्षी 40 वर्षांनी लहान मुलीशी केला विवाह, काय होतं कारण?

Death Anniversary Periyar : ई.व्ही. रामास्वामी म्हणजेच पेरियार हे दक्षिण भारतातील दिग्गज नेते होते. एका धार्मिक हिंदू कुटुंबात जन्मलेले पेरियार हे धर्माचे कट्टर विरोधक होते. लहानपणापासूनच त्यांनी ब्राह्मणवाद आणि हिंदू धर्माच्या दुष्कृत्यांवर प्रहार केला.

Death Anniversary Periyar : ई.व्ही. रामास्वामी म्हणजेच पेरियार हे दक्षिण भारतातील दिग्गज नेते होते. एका धार्मिक हिंदू कुटुंबात जन्मलेले पेरियार हे धर्माचे कट्टर विरोधक होते. लहानपणापासूनच त्यांनी ब्राह्मणवाद आणि हिंदू धर्माच्या दुष्कृत्यांवर प्रहार केला.

Death Anniversary Periyar : ई.व्ही. रामास्वामी म्हणजेच पेरियार हे दक्षिण भारतातील दिग्गज नेते होते. एका धार्मिक हिंदू कुटुंबात जन्मलेले पेरियार हे धर्माचे कट्टर विरोधक होते. लहानपणापासूनच त्यांनी ब्राह्मणवाद आणि हिंदू धर्माच्या दुष्कृत्यांवर प्रहार केला.

पुढे वाचा ...

मुंबई, 24 डिसेंबर : इ.व्ही. रामास्वामी म्हणजेच पेरियार हे दक्षिण भारतातील दिग्गज नेते होते. असे नेते ज्यांनी दक्षिण भारतीय राज्यांच्या राजकारणाची दिशा निश्चित केली. पेरियार हे धर्माचे कट्टर विरोधक होते. ब्राह्मणवाद आणि हिंदू धर्माच्या कर्मकांडावर त्यांनी हल्ला केला. त्यांनी केवळ धार्मिक ग्रंथांची होळी केली नाही तर रावणाला आपला नायक मानले. 24 डिसेंबर 1973 रोजी त्यांचे निधन झाले. पेरियार यांनी दुसऱ्यांदा लग्न केल्यावर प्रचंड नाराजी होती. यामुळे अण्णादुराई यांच्या नेतृत्वाखाली त्यांच्या चाहत्यांचा एक वर्ग त्यांच्यापासून दूर गेला.

उत्तर भारतातील नवीन पिढ्यांना पेरियार यांच्याबद्दल फारसे माहिती नाही. पेरियार कोण आहेत? त्यांनी आयुष्यभर सनातनी हिंदुत्वालाच विरोध केला नाही तर हिंदीच्या सक्तीच्या शिक्षणालाही त्यांचा तीव्र विरोध होता. त्यांनी वेगळ्या द्रविडनाडूचीही मागणी केली होती. त्यांचे राजकारण शोषित आणि दलितांभोवती फिरत होते.

पेरियार यांचे खरे नाव ईव्ही रामास्वामी होते. ते तमिळ राष्ट्रवादी, राजकारणी आणि सामाजिक कार्यकर्ते होते. त्यांचे चाहते त्यांना आदराने 'पेरियार' म्हणायचे. पेरियार म्हणजे पवित्र आत्मा किंवा आदरणीय व्यक्ती. त्यांनी 'आत्म सन्मान आंदोलन' जे 'द्रविड आंदोलन' म्हणूनही प्रसिद्ध आहे. यासाठी त्यांनी जस्टिस पार्टीची स्थापना केली, जी नंतर 'द्रविड कळघम' बनली. पेरियार यांना आशियाचा सॉक्रेटिस असेही म्हटले जात असे. त्यांच्या विचारांनी ते क्रांतिकारी आणि तर्कवादी मानले जात होते. त्यांचा जन्म एका धार्मिक हिंदू कुटुंबात झाला. मात्र, त्यांचा ब्राह्मणवादाला तीव्र विरोध होता. त्यांनी केवळ ब्राह्मण ग्रंथांची होळी केली नाही तर रावणालाही आपला नायक मानले होते.

हिंदू धर्मातील निरर्थक गोष्टींची उडवायचे खिल्ली

इरोड वेंकट रामास्वामी नायकर यांचा जन्म 17 सप्टेंबर 1879 रोजी इरोड, तामिळनाडू येथे झाला. वडील व्यंकटप्पा नायडू हे श्रीमंत व्यापारी होते. घरोघरी भजन आणि प्रवचनांची मालिका सुरू असायची. मात्र, लहानपणापासून ते प्रवचनात सांगितलेल्या गोष्टींच्या सत्यतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करायचे. हिंदू महाकाव्ये आणि पुराणातील परस्परविरोधी आणि बेताल गोष्टींची खिल्ली उडवत असत. बालविवाह, देवदासी प्रथा, विधवा पुनर्विवाह यांच्या विरोधात असतानाच महिला आणि दलितांच्या शोषणाच्या पूर्णपणे विरोधात होते. यातूनच त्यांनी हिंदू वर्ण व्यवस्थेवर बहिष्कार टाकला. हिंदू धर्मग्रंथही जाळले.

अन् ते नास्तिक झाले

वयाच्या 15 व्या वर्षी वडिलांसोबतच्या मतभेदामुळे त्यांनी घर सोडले. ते काशीला गेले. तिथे धर्माच्या नावावर जे काही घडताना पाहिले, त्यामुळे ते नास्तिक झाले. आपल्या शहरात परतल्यानंतर ते नगरपालिकेचे प्रमुख झाले. केरळमध्ये त्यांनी काँग्रेसच्या वायकोम आंदोलनाचे नेतृत्व केले. ज्यात मंदिरांकडे जाणाऱ्या रस्त्यावर दलितांना जाण्याला विरोध होता.

काँग्रेसमध्ये प्रवेश केला अन् सोडचिठ्ठी

चक्रवर्ती राजगोपालाचारी यांच्या पुढाकाराने ते 1919 मध्ये काँग्रेसचे सदस्य झाले. असहकार आंदोलनात भाग घेतल्यानंतर अटकही झाली. 1922 मध्ये ते मद्रास प्रेसिडेन्सी काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष बनले. यावेळी त्यांनी सरकारी नोकऱ्या आणि शिक्षणात आरक्षणाचा प्रस्ताव ठेवला. पण, काँग्रेसमध्ये तो मंजूर न झाल्याने 1925 मध्ये त्यांनी काँग्रेस पक्ष सोडला. त्यांच्या लक्षात आलं की हा पक्ष मनाने दलितांसोबत नाही.

दलितांच्या समर्थनार्थ आंदोलन

काँग्रेस सोडल्यानंतर त्यांनी दलितांच्या समर्थनार्थ आंदोलन सुरू केले. पेरियार यांनी 1944 मध्ये त्यांच्या जस्टिस पार्टीचे नाव बदलून द्रविड कळघमअसे ठेवले. त्यामुळे द्रमुक (द्रविड मुनेत्र कळघम) पक्षाचा उदय झाला. सत्तेच्या राजकारणापासून त्यांनी स्वतःला दूर ठेवले. आयुष्यभर ते दलित आणि महिलांची स्थिती सुधारण्यात गुंतले होते.

हिंदीला विरोध

सी. राजगोपालाचारी 1937 मध्ये मद्रास प्रेसिडेन्सीचे मुख्यमंत्री झाले तेव्हा त्यांनी शाळांमध्ये हिंदी भाषा शिकवणे अनिवार्य केले. त्यानंतर पेरियार हे हिंदीविरोधी चळवळीचे नेते म्हणून उदयास आले. यामुळे हिंसक आंदोलनांचा जन्म झाला. 1938 मध्ये त्यांना अटक करण्यात आली. त्याचवर्षी पेरियार यांनी हिंदीच्या निषेधार्थ 'तामिळनाडू फॉर तमिळ' ही घोषणा दिली. हिंदी लागू झाल्यावर तमिळ संस्कृती नष्ट होईल आणि तमिळ समाज उत्तर भारतीयांच्या अधीन असेल, असं त्याना वाटत होतं.

दुसरा विवाह

त्यांची पत्नी नागम्माई यांचे 1933 मध्ये निधन झाले. 15 वर्षांनंतर त्यांनी दुसरे लग्न केले. तेव्हा त्यांचे वय 69 वर्षे होते तर दुसऱ्या पत्नीचे वय 30 वर्षे होते. या लग्नावरूनही वाद झाला होता. त्यांच्या पक्षाच्या लोकांनी त्यांना असे न करण्यास सांगितले. त्यांची दुसरी पत्नी मनीमाई ही पेरियार यांची वैयक्तिक सचिव होती. पेरियार यांनी असा युक्तिवाद केला की मनीमाईने ज्या प्रकारे आपली काळजी घेतली, त्यामुळे आपण तिच्याशी लग्न करावे असे वाटले. या लग्नानंतर त्यांच्या पक्षातही नाराजी पसरली होती.

जीवन प्रवास

1879: 17 सप्टेंबर रोजी ई.व्ही. रामास्वामी यांचा जन्म

1898: वयाच्या 19 व्या वर्षी नागम्माईशी विवाह

1904: पेरियार काशीला गेले आणि नास्तिक झाले

1919: भारतीय राष्ट्रीय काँग्रेसमध्ये सामील झाले

१९२२: मद्रास प्रेसिडेन्सी काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष

1925: काँग्रेसमधील आपल्या पदाचा राजीनामा

1924: पेरियार यांनी वायकॉम सत्याग्रह आयोजित केला

1925: 'सेल्फ रिस्पेक्ट' चळवळ सुरू केली

1929: युरोप, रशिया आणि मलेशियासह अनेक देशांचा प्रवास

१९२९: 'नायकर' हे आडनाव वगळले.

1938: 'तमिळनाडू फॉर तमिळ' हा नारा दिला

1939: जस्टिस पार्टी पक्षाचे अध्यक्ष झाले

1944: जस्टिस पार्टीचे नाव 'द्रविड कळघम' असे ठेवण्यात आले.

1948: त्याच्यापेक्षा 40 वर्षांनी लहान असलेल्या मुलीशी लग्न केले

१९४९: पेरियार आणि अण्णादुराई यांच्यातील मतभेदांमुळे द्रविड कळघममध्ये फाळणी

1973: 24 डिसेंबर रोजी निधन

First published:

Tags: Tamilnadu