मराठी बातम्या /बातम्या /explainer /Explainer : 9-9-6 कामाच्या संस्कृतीला तरुणाई करतेय विरोध, 12 तास कामाचं काय आहे हे प्रकरण?

Explainer : 9-9-6 कामाच्या संस्कृतीला तरुणाई करतेय विरोध, 12 तास कामाचं काय आहे हे प्रकरण?

चीनमध्ये दिवसा 12 तास काम करण्याच्या प्रकाराचा 20 ते 30 वयोगटातील तरुण उघडपणे निषेध करत आहेत. त्याचबरोबर, ते आठवड्यातून 6 दिवस कामाच्याही विरोधात आहेत.

चीनमध्ये दिवसा 12 तास काम करण्याच्या प्रकाराचा 20 ते 30 वयोगटातील तरुण उघडपणे निषेध करत आहेत. त्याचबरोबर, ते आठवड्यातून 6 दिवस कामाच्याही विरोधात आहेत.

चीनमध्ये दिवसा 12 तास काम करण्याच्या प्रकाराचा 20 ते 30 वयोगटातील तरुण उघडपणे निषेध करत आहेत. त्याचबरोबर, ते आठवड्यातून 6 दिवस कामाच्याही विरोधात आहेत.

बीजिंग, 14 जून : चीनमध्ये कंपन्यांची खूपच मनमानी सुरू आहे, त्या स्वतःच्या अनुषंगाने कामगारांच्या कामाचे तास निश्चित करतात आणि नंतर ते वाढतच जातात. कर्मचार्‍यांवर यामुळं कामाचा मोठा दबाव येत असल्याच्या अनेक बातम्या आहेत. याशिवाय चीनमध्ये अन्न-धान्यापासून घरांच्या किंमती वाढत आहेत, मात्र, लोकांना त्या तुलनेत पगारही कमी आहे. या सर्व प्रकारामुळं रागाच्या भरात आणि सर्वांनाचा धडा शिकवण्यासाठी काही चिनी तरुणांनी एक नवीन मोहीम (campaign by Chinese youth) सुरू केली आहे. या मोहिमेचं नाव 'lying flat’ असं आहे. आता चीन सरकार तरुणांच्या या निर्णयामुळं घाबरले आहे.

तरुणांचा या उंदरांच्या शर्यतीला नकार 

चीनमध्ये दिवसा 12 तास काम करण्याच्या प्रकाराचा 20 ते 30 वयोगटातील तरुण उघडपणे निषेध करत आहेत. त्याचबरोबर, ते आठवड्यातून 6 दिवस कामाच्याही विरोधात आहेत. मिलेनियल्सकडून ही मोहीम सुरू करण्यात आली आहे. दिवसाचे 12 तास काम केल्यावर लोकांकडे काहीच वेळ शिल्लक राहत नसून जेवण झाल्यावर हे लोक त्यांना जेथे जागा मिळेल तेथे लगेच झोपी जातात.

एका फोटोनं वादाला तोंड फोडलं

काही दिवसांपूर्वी चिनी सोशल मीडिया विबोवर एक फोटो व्हायरल झाला होता. यात तीन चिनी तरुण दुचाकीवरून कुठेतरी जाताना दिसत होते, त्यातील एकाने मोटार सायकलवर हातात लॅपटॉप उघडला होता आणि काम करत असताना सायकल चालवत होता. त्यांची चौकशी केली असता, असे निष्पन्न झाले की, ते तरुण शिंगुआ विद्यापीठातील असून त्यांचे शैक्षणिक काम करीत होते. यानंतरच चिनी तरुणांवर कामाचे किती दडपण आहे आणि त्यांच्या ताणतणावाबाबत चर्चेला वेग आला.

चीनमधील वाढत्या कंपन्यांच्या स्पर्धेविषयी बर्‍याच वर्षांपासून बोलले जात आहे. या कंटाळवाण्या पद्धतीला (Neijuan) असं म्हटलं जातं. म्हणजे लोकांना कामाव्यतिरिक्त कोणत्याही गोष्टीसाठी किंवा मनोरंजनासाठी वेळच मिळत नाही. सायकल चालवताना अभ्यास करणार्‍या तरुणाचे चित्र या पिळवणुकीचं बोलकं उदाहरण होतं. या फोटोवरून झालेल्या चर्चेवरून चिनी वृत्तसंस्था सीजीटीएनने, असं सांगितलं होतं की चीनी तरुणांवर कामाचा इतका दबाव आहे की, त्यांना थोडावेळ सायकल चालवत घरी किंवा कोठेही पोहोचणे यातही वेळ वाया घालवला जातोय असं वाटतं आणि ते सायकलवरच अभ्यास किंवा इतर काही काम करू लागतात.

9-9-6 संस्कृती म्हणजे काय

अतिशय तणावपूर्वक कामाच्या या पद्धतीला चीनी तरूण "9-9-6" पद्धत असे म्हणतात. यात लोकांना आठवड्यातील 6 दिवस सकाळी 9 ते रात्री 9 पर्यंत काम करावे लागत आहे. जर त्यांनी ते केले नाही तर एकतर त्यांची नोकरी जावू शकते किंवा कमी पैशांमुळं त्यांच्याकडं खायला आणि जगण्यासाठी पैसा राहू शकत नाही, अशी स्थिती आहे.

अती काम करण्याच्या या संस्कृतीत अग्रभागी अलिबाबाचे संस्थापक

इनसाइडरच्या अहवालात नमूद केले आहे की, सन 2019 मध्ये प्रसिद्ध चायनीज उद्योगपती, अलिबाबाचे संस्थापक जॅक मा यांनी आठवड्यातून 72 तास काम करणं हे आपल्याला मिळालेलं वरदान आहे असं म्हटलं होतं. चीनचे कामगार धोरण अधिकृतपणे दिवसा 8 तास काम असे असले तरी ते केवळ कागदावर आहे. खरं तर, परिस्थिती अशी आहे की तेथे कर्मचार्‍यांपासून ते अकुशल कामगारापर्यंत सर्वांना दिवसाला 12 ते 16 तास काम करण्यास भाग पाडले जाते.

ताण-तणावामुळे मृत्यू

कामाचे तास वाढल्यामुळं कर्मचारी वेळेवर घरी पोहचू शकत नाहीत. त्यांच्या नात्यात अंतर येऊ लागलं आहे. या सर्व कारणांमुळे नैराश्य, तणाव यासारख्या समस्या वाढल्या आहेत. या वर्षीच येथील मुख्य ई-कॉमर्स कंपनी पिंडुडूओमध्ये मोठ्या कामाच्या दबावामुळं दोन कर्मचार्‍यांचा मृत्यू झाला. रात्री दीड वाजेपर्यंत काम केल्यावर एका कर्मचारी काम करता-करता अचानक खाली कोसळला आणि तेथेच त्याचा मृत्यू झाला. या घटनेवरून मोठा गदरोळ होण्यापूर्वीच ती दडपण्यात आली.

हे वाचा - मुंबईत चक्क केक आणि पेस्ट्रीतून ड्रग्जचा पुरवठा; NCBचा बेकरीवर छापा, महिलेसह तिघांना अटक

कामाच्या या भयाणक पद्धतीमुळं चीनी तरुण वैतागले आहेत आणि काम सोडून घरी राहणे पसंत करत आहेत. 12-12 तासांची कामाची पद्धत रद्द करण्यासाठी हे तरुण आंदोलन करण्याच्या तयारीत आहेत. चीनी सरकारलाही तरुणांनी घेतलेल्या भूमिकेची भीती वाटत असून त्यांना देशातील काम मागे पडण्याची भीती आहे.

First published:
top videos

    Tags: China, Worker