मॉस्को, 25 फेब्रुवारी : रशियाने युक्रेनविरोधातील हल्ले (Russian Attacks on Ukraine) तीव्र केले आहेत. युक्रेनची राजधानी कीवमध्ये (Kyiv) सायरन ऐकू येत आहेत. हा युक्रेनवरील हल्ला नसून विशेष लष्करी कारवाई असल्याचे रशियाचे म्हणणे आहे. युक्रेनच्या अनेक भागात लष्करी तळांवर हल्ले होत आहेत. युक्रेनमधून भारतीयांना परत करण्याची प्रक्रियाही सुरू आहे. दरम्यान, भारतीय दूतावासाने भारतीयांसाठी मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत की जर त्यांना हल्ल्याचे सायरन ऐकू आले तर गुगल मॅपवरून जवळील बॉम्ब शेल्टर्स (Bomb Shelters) शोधा. बॉम्ब शेल्टर म्हणजे काय ते जाणून घेऊया. बॉम्ब शेल्टर काय? बॉम्ब शेल्टर ही युद्धाच्या परिभाषेत एक संज्ञा आहे. सर्वसाधारण शब्दात सांगायचं झालं तर अशी एक बंद जागा जी लोकांना बॉम्ब आणि क्षेपणास्त्रांसारख्या स्फोटक शस्त्रांच्या प्रभावापासून संरक्षण करण्यासाठी तयार केली जाते. हे सहसा एक खोली किंवा क्षेत्र असते जे जमिनीखाली असते, विशेषत: बॉम्बच्या प्रभावापासून संरक्षण करण्यासाठी डिझाइन केलेले असते, ज्याचा वापर हवाई हल्ल्यांदरम्यान आश्रय म्हणून केला जातो. या मध्ये काय होते? बॉम्ब शेल्टरमध्ये पिण्याचे पाणी, पॅकेज केलेले अन्न, आपत्कालीन औषधे, बॅटरीवर चालणारे रेडिओ, आपत्कालीन फ्लॅश किंवा टॉर्च, स्पेअर बॅटरी इ. अशा अनेक विशेष सुविधा असतात. अशा ठिकाणी किमान तीन दिवसांच्या गरजांसाठी वस्तू साठवल्या जातात. कीव मध्ये कोणते ठिकाण? बॉम्ब शेल्टर सर्वत्र किंवा शहरात औपचारिकपणे बांधलेले नाहीत. कारण, शहरात अशी अनेक ठिकाणे असतात जी गरज पडल्यास बॉम्ब निवारा म्हणून काम करू शकतात किंवा बॉम्ब निवारा म्हणून वापरली जाऊ शकतात. सध्या कीवच्या मेट्रो स्थानकांचा वापर यासाठी केला जात आहे. एवढेच नाही तर उड्डाणपुलाच्या खालच्या भागाच्या कडा काही वेळा बॉम्ब निवारा म्हणूनही काम करतात. तीन वर्षांपूर्वीच रशियाने युक्रेनवर हल्ला करण्याची योजना आखली होती का? कीवच्या लोकांना धोका रशियन सैन्य केवळ युक्रेनच्या लष्करी तळांवर हल्ले करत आहे. यात नागरिक आणि नागरी ठिकाणांवर हल्ला केला जाणार नाही, असे आश्वासन रशियाने दिले आहे. पण, युक्रेनचे लोक धोका ओळखत आहेत. कीवचे लोक शहराच्या भूमिगत मेट्रो स्टेशनमध्ये आश्रय घेत आहेत. हे मेट्रो नेटवर्क देशातील सर्वात जुने आणि सर्वात मोठे भूमिगत नेटवर्क आहे, ज्यापैकी बहुतेकांना आधीच बॉम्ब शेल्टर मानले जाते. सर्व प्रकारे हल्ला रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी रशियन टेलिव्हिजनवर लष्करी कारवाईची घोषणा केल्यानंतर रशियाने युक्रेनचे हवाई तळ आणि हवाई संरक्षण यंत्रणा नष्ट केल्याचे जाहीर केले आहे. कीवसह अनेक शहरांवर क्षेपणास्त्रेही डागण्यात आली. रशियन सैन्याने अनेक दिशांनी युक्रेनमध्ये प्रवेश केला आहे.
भारतीयांची स्थिती तत्पूर्वी, भारतीय दूतावासाने (भारतीय) लोकांना सांगितले आहे की, ते कीवच्या दिशेने येत असतील तर ते ज्या शहरात येत आहेत त्याच शहरात परत जा. मार्शल लॉ लागू झाल्यानंतर, मोठ्या संख्येने लोक कीवमधील मेट्रो स्टेशनकडे जात आहेत. युक्रेनमध्ये सुमारे 18,000 भारतीय असून त्यापैकी बहुतांश विद्यार्थी आहेत. एअर इंडियाच्या विमानाला युक्रेनला पाठवण्यात आले होते, परंतु, युक्रेनमधील व्यावसायिक उड्डाणासाठी विमानतळ बंद झाल्यामुळे त्यांना परतावे लागले. युक्रेनमध्ये सायकलस्वारावर तोफगोळा पडतानाचा थेट Live Video आता काय भारतीय परराष्ट्र मंत्रालय आता युक्रेनमधून भारतीयांना बाहेर काढण्यासाठी इतर पर्यायांवर काम करत आहे. भारतीय दूतावासाच्या मदतीसाठी आणखी लोकांना पाठवले जात आहे. मंत्रालय फोनद्वारे अनेक भारतीय विद्यार्थ्यांच्या संपर्कात आहे. सध्या भारतीय विद्यार्थी कोणत्याही संकटात नसल्याचे सांगण्यात येत आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.