जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / Explainer / बाह्य अवकाशात घडणाऱ्या सामान्य पण विचित्र घटनाबद्दल माहिती आहेत का?

बाह्य अवकाशात घडणाऱ्या सामान्य पण विचित्र घटनाबद्दल माहिती आहेत का?

ब्रह्मांडात (Universe) दररोज असंख्या चित्रविचित्र गोष्टी घडत असतात. यातील अनेक घटनांमागचं कारण अद्याप आपल्याला शोधता आलेलं नाही. अशाच काही गोष्टी आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

01
News18 Lokmat

ब्रह्मांडात (Universe) अनेक रहस्ये दडलेली आहेत. यामध्ये विचित्र वस्तू, घटना आणि प्रक्रिया लोकांना तसेच शास्त्रज्ञांना अचंबीत करत असतात. अंतराळात (Space) विपुल प्रमाणात विद्युत चुंबकीय शक्ती आहे, जी आपण अनुभवू शकत नाही. याशिवाय असे अनेक पदार्थही आहेत, जे पृथ्वीवर उपलब्ध नाहीत. चला, अशा अनेक अनोख्या गोष्टींबद्दल बोलूया ज्या आपल्यासाठी खूप विचित्र आहेत. मात्र, अंतराळात सामान्य आहेत. (प्रतिकात्मक फोटो: पिक्साबे)

जाहिरात
02
News18 Lokmat

सामान्यतः पदार्थाच्या घन, द्रव आणि वायू या अवस्था सामान्य मानल्या जातात. याशिवाय, प्लाझ्मा (Plasma) ही एक अशी अवस्था आहे जी खूप कठीणपणे साध्य करता येते. मात्र, अवकाशातील 99.9 टक्के पदार्थ प्लाझ्मा अवस्थेत असतात, ज्यात मुक्त आयन आणि इलेक्ट्रॉन असतात. म्हणजेच, त्यातील पदार्थ (Matter) अत्यंत चार्ज अवस्थेत आहे. प्लाझ्मा सर्व ताऱ्यांमध्ये आढळतो. हे वीज आणि उष्णता यांचे उत्तम वाहक आहे. हे चुंबकीय आणि इलेक्ट्रोमॅग्नेटिक फील्डमुळे प्रभावित होते. सौर वारे फक्त प्लाझ्माच्या रूपात सौर मंडळात पसरतात. (प्रतिकात्मक फोटो: शटरस्टॉक)

जाहिरात
03
News18 Lokmat

आपण पृथ्वीवर (Earth) खूप जास्त किंवा खूप कमी तापमान (Temperature)सहन करू शकत नाही. प्रयोगशाळांमध्येही अशा प्रकारचे तापमान तयार करणे शक्य नाही. मात्र, बुध आणि शुक्र यासारख्या ग्रहांवर कमाल तापमान 500 अंशांच्या आसपास असते. तर किमान तापमान -160 पेक्षा कमी असल्याचे दिसून आले आहे. नासाचे पार्कर सोलर प्रोब जेव्हा सूर्याजवळ पोहोचेल तेव्हा त्याला दोन हजार अंशांच्या तापमानातील फरकाचा सामना करावा लागेल. सूर्यासारख्या ताऱ्यांचे तापमान पाच हजार अंश सेल्सिअसपेक्षाही जास्त असते. अंतराळात कमालीचे तापमान गाठायला वेळ लागत नाही. (प्रतिकात्मक फोटो: पिक्साबे)

जाहिरात
04
News18 Lokmat

पृथ्वीवर सर्व घटक (Elements) आढळत नाहीत. जे मिळतात त्यापैकी बहुतेक पृथ्वीवर तयार करता येत नाहीत. जीवसृष्टीला आधार देणारे बहुतेक पदार्थ देखील पृथ्वीबाहेरील अवकाशातही तयार झाले आहेत. प्रथम विश्वात फक्त हायड्रोजन होता, नंतर हेलियमच्या निर्मितीसाठी परिस्थिती निर्माण झाली आणि ताऱ्यांमध्ये कार्बन, फॉस्फरस, ऑक्सिजन आणि इतर हलके घटकांसह लोहासारखे घटक देखील तयार झाले. सुपरनोव्हा (Supernova) स्फोटासारख्या घटनांमध्ये जड धातूंची परिस्थिती निर्माण झाली. याशिवाय तारे प्रकाशाच्या कारखान्याप्रमाणे काम करतात. अशा प्रकारे अवकाशाला एक प्रकारची वैश्विक किमया (Cosmic Alchemy) म्हणता येईल. (प्रतिकात्मक फोटो: शटरस्टॉक)

जाहिरात
05
News18 Lokmat

सहसा आपल्याला चुंबकीय प्रभाव (Magnetic Effects) फारसा जाणवत नाही. मात्र, सौर वाऱ्याद्वारे (Solar Wind) चार्ज केलेले कण थांबवण्यात पृथ्वीचे चुंबकीय क्षेत्र महत्त्वाची भूमिका बजावते. या कणांच्या आणि चुंबकीय क्षेत्राच्या टक्करीमुळे ध्रुवांच्या आकाशावर अरोरासारख्या घटना दिसतात. ब्रह्मांडात अनेक ठिकाणी चुंबकीय क्षेत्रे आदळतात, त्यामुळे अनेक परिस्थितींमध्ये चुंबकीय स्फोट दिसून येतात. सौर ज्योत कृष्णविवराजवळील क्षेत्र आणि ताऱ्यांजवळील भागात चुंबकीय प्रभाव अधिक दिसून येतो. (प्रतिकात्मक फोटो: शटरस्टॉक)

जाहिरात
06
News18 Lokmat

पृथ्वीवर ऊर्जा हस्तांतरणासाठी संपर्क आवश्यक आहे. मात्र, अंतराळातील कण स्पर्श न करताही ऊर्जा हस्तांतरित करू शकतात. हे हस्तांतरण दृश्यमान नसलेल्या संरचनेद्वारे होते, ज्याला सुपरसोनिक शॉक (Supersonic Shocks) म्हणतात. या संरचनांमधील ऊर्जा प्लाझ्मा लहरी, विद्युत आणि चुंबकीय क्षेत्राद्वारे हस्तांतरित केली जाते. सुपरसोनिक वेगाने वस्तूंच्या प्रवेगामुळे शॉक वेव्ह तयार होतात. याशिवाय ते सौर वारा, सुपरनोव्हा क्लाउड इत्यादींमध्येही तयार होतात. (प्रतिकात्मक फोटो: शटरस्टॉक)

जाहिरात
  • First Published :
जाहिरात
जाहिरात
  • 01 06

    बाह्य अवकाशात घडणाऱ्या सामान्य पण विचित्र घटनाबद्दल माहिती आहेत का?

    ब्रह्मांडात (Universe) अनेक रहस्ये दडलेली आहेत. यामध्ये विचित्र वस्तू, घटना आणि प्रक्रिया लोकांना तसेच शास्त्रज्ञांना अचंबीत करत असतात. अंतराळात (Space) विपुल प्रमाणात विद्युत चुंबकीय शक्ती आहे, जी आपण अनुभवू शकत नाही. याशिवाय असे अनेक पदार्थही आहेत, जे पृथ्वीवर उपलब्ध नाहीत. चला, अशा अनेक अनोख्या गोष्टींबद्दल बोलूया ज्या आपल्यासाठी खूप विचित्र आहेत. मात्र, अंतराळात सामान्य आहेत. (प्रतिकात्मक फोटो: पिक्साबे)

    MORE
    GALLERIES

  • 02 06

    बाह्य अवकाशात घडणाऱ्या सामान्य पण विचित्र घटनाबद्दल माहिती आहेत का?

    सामान्यतः पदार्थाच्या घन, द्रव आणि वायू या अवस्था सामान्य मानल्या जातात. याशिवाय, प्लाझ्मा (Plasma) ही एक अशी अवस्था आहे जी खूप कठीणपणे साध्य करता येते. मात्र, अवकाशातील 99.9 टक्के पदार्थ प्लाझ्मा अवस्थेत असतात, ज्यात मुक्त आयन आणि इलेक्ट्रॉन असतात. म्हणजेच, त्यातील पदार्थ (Matter) अत्यंत चार्ज अवस्थेत आहे. प्लाझ्मा सर्व ताऱ्यांमध्ये आढळतो. हे वीज आणि उष्णता यांचे उत्तम वाहक आहे. हे चुंबकीय आणि इलेक्ट्रोमॅग्नेटिक फील्डमुळे प्रभावित होते. सौर वारे फक्त प्लाझ्माच्या रूपात सौर मंडळात पसरतात. (प्रतिकात्मक फोटो: शटरस्टॉक)

    MORE
    GALLERIES

  • 03 06

    बाह्य अवकाशात घडणाऱ्या सामान्य पण विचित्र घटनाबद्दल माहिती आहेत का?

    आपण पृथ्वीवर (Earth) खूप जास्त किंवा खूप कमी तापमान (Temperature)सहन करू शकत नाही. प्रयोगशाळांमध्येही अशा प्रकारचे तापमान तयार करणे शक्य नाही. मात्र, बुध आणि शुक्र यासारख्या ग्रहांवर कमाल तापमान 500 अंशांच्या आसपास असते. तर किमान तापमान -160 पेक्षा कमी असल्याचे दिसून आले आहे. नासाचे पार्कर सोलर प्रोब जेव्हा सूर्याजवळ पोहोचेल तेव्हा त्याला दोन हजार अंशांच्या तापमानातील फरकाचा सामना करावा लागेल. सूर्यासारख्या ताऱ्यांचे तापमान पाच हजार अंश सेल्सिअसपेक्षाही जास्त असते. अंतराळात कमालीचे तापमान गाठायला वेळ लागत नाही. (प्रतिकात्मक फोटो: पिक्साबे)

    MORE
    GALLERIES

  • 04 06

    बाह्य अवकाशात घडणाऱ्या सामान्य पण विचित्र घटनाबद्दल माहिती आहेत का?

    पृथ्वीवर सर्व घटक (Elements) आढळत नाहीत. जे मिळतात त्यापैकी बहुतेक पृथ्वीवर तयार करता येत नाहीत. जीवसृष्टीला आधार देणारे बहुतेक पदार्थ देखील पृथ्वीबाहेरील अवकाशातही तयार झाले आहेत. प्रथम विश्वात फक्त हायड्रोजन होता, नंतर हेलियमच्या निर्मितीसाठी परिस्थिती निर्माण झाली आणि ताऱ्यांमध्ये कार्बन, फॉस्फरस, ऑक्सिजन आणि इतर हलके घटकांसह लोहासारखे घटक देखील तयार झाले. सुपरनोव्हा (Supernova) स्फोटासारख्या घटनांमध्ये जड धातूंची परिस्थिती निर्माण झाली. याशिवाय तारे प्रकाशाच्या कारखान्याप्रमाणे काम करतात. अशा प्रकारे अवकाशाला एक प्रकारची वैश्विक किमया (Cosmic Alchemy) म्हणता येईल. (प्रतिकात्मक फोटो: शटरस्टॉक)

    MORE
    GALLERIES

  • 05 06

    बाह्य अवकाशात घडणाऱ्या सामान्य पण विचित्र घटनाबद्दल माहिती आहेत का?

    सहसा आपल्याला चुंबकीय प्रभाव (Magnetic Effects) फारसा जाणवत नाही. मात्र, सौर वाऱ्याद्वारे (Solar Wind) चार्ज केलेले कण थांबवण्यात पृथ्वीचे चुंबकीय क्षेत्र महत्त्वाची भूमिका बजावते. या कणांच्या आणि चुंबकीय क्षेत्राच्या टक्करीमुळे ध्रुवांच्या आकाशावर अरोरासारख्या घटना दिसतात. ब्रह्मांडात अनेक ठिकाणी चुंबकीय क्षेत्रे आदळतात, त्यामुळे अनेक परिस्थितींमध्ये चुंबकीय स्फोट दिसून येतात. सौर ज्योत कृष्णविवराजवळील क्षेत्र आणि ताऱ्यांजवळील भागात चुंबकीय प्रभाव अधिक दिसून येतो. (प्रतिकात्मक फोटो: शटरस्टॉक)

    MORE
    GALLERIES

  • 06 06