मराठी बातम्या /बातम्या /explainer /

धक्कादायक! असुरक्षित गर्भपातामुळे भारतात दररोज 8 महिलांचा मृत्यू, Safe Sex आणि अशी काळजी घेणं ठरेल महत्त्वाचं!

धक्कादायक! असुरक्षित गर्भपातामुळे भारतात दररोज 8 महिलांचा मृत्यू, Safe Sex आणि अशी काळजी घेणं ठरेल महत्त्वाचं!

 भारतात गर्भपातामुळे (Abortion) दररोज जवळपास 8 महिलांचा मृत्यू होत असल्याची माहिती समोर आली आहे. त्यातच 67 टक्के गर्भपातांमध्ये महिलांना जीवाचा धोका असतो अशी माहिती संयुक्त राष्ट्र जनसंख्या कोश (UNFPA) च्या जागतिक लोकसंख्येच्या 2022 सालच्या रिपोर्टमधून समोर आली आहे.

भारतात गर्भपातामुळे (Abortion) दररोज जवळपास 8 महिलांचा मृत्यू होत असल्याची माहिती समोर आली आहे. त्यातच 67 टक्के गर्भपातांमध्ये महिलांना जीवाचा धोका असतो अशी माहिती संयुक्त राष्ट्र जनसंख्या कोश (UNFPA) च्या जागतिक लोकसंख्येच्या 2022 सालच्या रिपोर्टमधून समोर आली आहे.

भारतात गर्भपातामुळे (Abortion) दररोज जवळपास 8 महिलांचा मृत्यू होत असल्याची माहिती समोर आली आहे. त्यातच 67 टक्के गर्भपातांमध्ये महिलांना जीवाचा धोका असतो अशी माहिती संयुक्त राष्ट्र जनसंख्या कोश (UNFPA) च्या जागतिक लोकसंख्येच्या 2022 सालच्या रिपोर्टमधून समोर आली आहे.

पुढे वाचा ...

नवी दिल्ली, 08 एप्रिल: भारतात महिलांच्या आरोग्याकडे (Women Health) अनेकदा महिलांकडूनच दुर्लक्ष केलं जातं. अगदी मासिक पाळीपासून ते गर्भधारणा आणि बाळंतपणानंतरही महिलांचं आरोग्य कायमच दुर्लक्षित राहिलं आहे. त्यातच गर्भपातासारख्या मुद्द्यावर तर उघडपणे चर्चाही केली जात नाही. भारतात गर्भपातामुळे (Abortion) दररोज जवळपास 8 महिलांचा मृत्यू होत असल्याची माहिती समोर आली आहे. त्यातच 67 टक्के गर्भपातांमध्ये महिलांना जीवाचा धोका असतो अशी माहिती संयुक्त राष्ट्र जनसंख्या कोश (UNFPA) च्या जागतिक लोकसंख्येच्या 2022 सालच्या रिपोर्टमधून समोर आली आहे.

दरवर्षी जगभरात 12 कोटी 10 लाख महिला कोणत्याही प्लॅनिंगशिवाय म्हणजेच कोणतीही मानसिक तयारी नसताना गर्भवती राहतात. कोणताही विचार केल्याशिवाय प्रेग्नंट राहणाऱ्या जगातील दर सहा महिलांमागे एक महिला भारतातील आहे.

जाणून घ्या आपल्या देशातील गर्भपाताबद्दलचं वास्तव

आजही कोणत्याची चौकशीशिवाय, योग्य ती विचारणा केल्याशिवाय कुठेही गर्भापत (Unsafe Abortion) करून घेणारे अनेक लोक आहेत. आपल्या घरातल्या महिलांच्या आरोग्याबद्दल असे लोक काहीही विचार करत नाहीत. काहीवेळेस लग्नाआधीच मुली प्रेग्नंट राहतात आणि मग मुलीच्या घरचे घाबरून कोणताही विचार न करता कुठेही तिचा गर्भपात करून घेतात. अर्थातच याचा तिच्या आरोग्यावर परिणाम होतोच. अशा परिस्थितीत गर्भपाताची वेळ येऊच नये यासाठी ही काळजी घेतली पाहिजे. याबाबतचं वृत्त दैनिक भास्करमध्ये देण्यात आलं आहे.

>> गर्भनिरोधक साधनांचा वापर करून सुरक्षित सेक्स (Safe Sex) करा.

>> कंडोमचा (Use Condoms) वापर करु शकता.

>> तुमचं कुटुंब पूर्ण झालं असेल असं तुम्हाला वाटत असेल, तर पुरुष किंवा महिला नसबंदी (Family Planning Operation) करून घेऊ शकतात.

हे वाचा-ना गोळ्या-औषधं, ना इंजेक्शन; आता अगदी सहज होणार मधुमेहावर उपचार, संशोधकांनी शोधली ही नवी पद्धत

>> मुला-मुलींना शाळेत असतानाच सेक्स एज्युकेशनबद्दल (Sex Education In School) माहिती दिली गेली पाहिजे

>> डॉक्टरांच्या सल्ल्यानेच कॉन्ट्रासेप्टिव्ह पिल्सचा (गर्भनिरोधक गोळ्या) वापर करा.

ॲबॉर्शन म्हणजेच गर्भपात. महिलांच्या गर्भाशयामधून गर्भ काढून टाकण्याच्या प्रक्रियेला गर्भपात असं म्हणतात असा याचा साध्या भाषेतील अर्थ होतो. मूल आईच्या गर्भात 37 आठवडे असतं. जर 24 आठवड्यांआधी हा गर्भ काढून टाकला गेला तर त्याला गर्भपात असं म्हटलं जातं. काही वेळेस गर्भपात नैसर्गिकरित्या (Natural Abortion) होऊ शकतो. म्हणजे एखाद्या अपघातात गर्भवती महिला जखमी झाली किंवा पाय घसरून पडणं किंवा एखादं चुकीचं औषध घेतलं तर अशा वेळेस पोटातल्या बाळाचा मृत्यू होतो. मग अशावेळेस पोटातून बाळाला बाहेर काढण्यासाठी गर्भपात केला जातो. तर काही वेळेस मात्र आई पोटात वाढणाऱ्या बाळाला जन्म देऊ इच्छित नसेल तर औषधे किंवा अन्य उपायांनी गर्भपात केला जातो. खरं तर डॉक्टरांच्या सल्ल्याने (Doctor’s Advice) आणि त्यांच्या देखरेखीखाली गर्भपात करुन घेणं हेच सगळ्यांत योग्य आहे. अल्ट्रासाउंड म्हणजेच सोनोग्राफी (Ultrasound sonograpy) केल्यानंतर गर्भपात केला जाऊ शकतो की नाही याचा निर्णय डॉक्टर घेतात.

गर्भपात करण्याचे आहेत दोन प्रकार

मेडिकल ॲबॉर्शन (Medical Abortion)- यामध्ये औषधं देऊन गर्भपात केला जातो. औषधांमुळे गर्भाशयाचं अस्तर (लायनिंग) निघून जातं.यामुळे भ्रूण (एम्र्बियो) गर्भाशयापासून वेगळा होऊन नष्ट होतो.

सर्जिकल ॲबॉर्शन- (Surgical Abortion)- यामध्ये डी अँड सी (डायलेशन आणि क्युरेटेज) केलं जातं. म्हणजेच शस्त्रक्रिया करून भ्रूण गर्भाशयातून काढून टाकला जातो. प्रेग्नन्सीच्या कितव्या महिन्यानंतर या ऑपरेशनद्वारे गर्भपात होऊ शकतो हे डॉक्टरांच्या तपासणीनंतरच स्पष्ट होतं. आपल्या देशात 1971 मध्ये गर्भापाताबद्दलचा पहिला कायदा तयार करण्यात आला. मेडिकल टर्मिनेशन ऑफ प्रेग्नन्सी ॲक्ट -1971 (Medical Termination of Pregnancy Act 1971) असं या कायद्याचं नाव आहे. या कायद्यानुसार फक्त आणि फक्त सर्टिफाईड डॉक्टरांनाच गर्भपात करण्याची परवानगी देण्यात आली आहे. योग्य प्रशिक्षण न घेतलेल्या लोकांनी गर्भपात करणं हा कायद्याने गुन्हा आहे.

हे वाचा-मानवी शरीरात सापडला नवा अवयव; गंभीर आजारांवर उपचार होणार शक्य

गर्भपाताबद्दलचा कायदा काय सांगतो?

खाली दिलेल्या 5 परिस्थितींमध्ये गर्भपात करणं कायदेशीररित्या योग्य आहे.

>> गर्भपात न केल्यास महिलेला शारीरिक धोका किंवा तिच्या मानसिक आरोग्यावर परिणाम होणार असेल तर.

>> महिला आधीपासूनच मानसिकरित्या आजारी असेल किंवा कोणत्यातरी मानसिक किंवा शारीरिक आजाराने ग्रासलेली असेल तर.

>> महिला किंवा तिच्या कुटुंबातील सदस्यांना असलेला आजार मुलामध्येही येण्याची शक्यता असेल आणि ते त्याच्यासाठी धोकादायक असेल तर.

>> गर्भवती महिला आपल्या मुलाचं पालनपोषण करण्यास सक्षम नसेल किंवा तिची आर्थिक परिस्थिती चांगली नसेल तर.

>> बलात्कारामुळे एखादी महिला प्रेग्नंट राहिली असेल तर.

यावरून हे तर लक्षात आलं असेलच की कधीही आपल्याला हवं तेव्हा गर्भापत केला जाऊ शकत नाही किंवा प्रेग्नसीच्या कोणत्याही टप्प्यात तुम्हाला वाटलं की आता आपल्याला मूल नको, म्हणून गर्भपात करु शकतो, तर असं करता येत नाही. मार्च 2021 मध्ये टर्मिनेशन ऑफ प्रेग्नन्सी ॲक्टमध्ये (Termination Of Pregnancy Act) काही बदल करण्यात आले.

या नव्या कायद्यात काय आहे ?

>> आधी गर्भधारणेच्या केवळ 20 आठवड्यापर्यंतच गर्भपाताला परवानगी देण्यात आली होती; पण आता ही कालमर्यादा वाढवून 24 आठवडे करण्यात आली आहे. पण काही विशेष केसेसमध्येच हा चार आठवड्यांचा काळ वाढवून मिळू शकतो. विशेष केस म्हणजे बलात्कारामुळे महिला गर्भवती राहिली असेल तर, महिलेचं मॅरिटल स्टेटस म्हणजेच वैवाहिक स्थितीत बदल झाले असतील तर, अल्पवयीन मुलगी प्रेग्नंट राहिली तर अशा प्रकरणांमध्ये ही चार आठवड्याची मर्यादा वाढवून दिली जाऊ शकते.

>> याआधी 12 ते 20 आठवड्यांपर्यंत गर्भवती असेल तर दोन रजिस्टर्ड (नोंदणीकृत) डॉक्टरांकडून सल्ला घेणं आवश्यक होतं. आता नव्या कायद्यानुसार 20 आठवड्यांपर्यंतचा गर्भ असेल तर त्याचा गर्भपात करण्यासाठी फक्त एकाच डॉक्टरची परवानगी असेल तरी पुरेसे आहे. 20 ते 24 आठवड्यांपर्यंतचा गर्भपात करण्यासाठी मात्र दोन डॉक्टरांची परवानगी आवश्यक आहे.

>> पूर्वी फक्त विवाहित स्त्री आणि तिचा पती यांच्या परवानगीनेच गर्भपात केला जात होता. आता नव्या कायद्यानुसार गर्भवती महिला आणि तिचा जोडीदार यांच्या परवानगीने गर्भपात केला जाऊ शकतो. या प्रकरणी मुलगी अविवाहितही असू शकते.

>> महिलेच्या पोटात वाढणाऱ्या बाळाला काही व्यंग असल्याचं डॉक्टर किंवा मेडिकल बोर्डानं (Medical Board) सांगितलं असेल तर त्या आधारावर गर्भपातासाठी परवानगी मिळू शकते. या गर्भपातासाठी कोणतीही कालमर्यादा नाही. प्रत्येक राज्य त्यांच्या अनुषंगाने ही मर्यादा घालू शकतं.

>> गर्भपात केल्या जाणाऱ्या महिलेबाबतची सर्व माहिती गुप्त राखण्यात यावी असाही नियम या कायद्यात आहे.

इतके कडक नियम असूनही कोणत्याही डॉक्टरकडून किंवा अनेकदा बनावट डॉक्टरकडूनही परवानगी नसतानाही गर्भपात केले जातात आणि महिलांच्या आरोग्याशी खेळ केला जातो.

हे वाचा- निरोगी राहण्यासाठी आजपासूनच करा हे 7 संकल्प; दीर्घायुष्याचं सोपं गुपीत

खरं तर नको असताना गर्भधारणा टाळण्याचे काही उपाय आहेत. गर्भनिरोधक गोळ्या (Contraceptive Pills) त्यापैकीच एक. पण अजूनही गर्भनिरोधक गोळ्यांबाबत काही गैरसमज आहेत. या गोळ्या ठराविक काळातच घेतल्या गेल्या पाहिजेत. शक्यतो डॉक्टरांच्या सल्ल्यानेच गर्भनिरोधक गोळ्या घेतल्या जाव्यात. काही गोळ्या गर्भधारणेच्या 10 आठवड्यांमध्ये तर काही गोळ्या डॉक्टरांच्या सल्ल्यानं गर्भधारणेच्या 24 आठवड्यांच्या आत घेतल्या जऊ शकतात. कोणत्याही प्रकारे गर्भपातासाठी गोळ्या घ्यायच्या असतील तर डॉक्टरांचा सल्ला नक्कीच घ्या. गोळ्या घेतल्यानंतर दोन आठवड्यांनी पूर्ण चेकअप करा. तुम्हाला हृदयाच्या, मधुमेह, अस्थमा, अशक्तपणा सारख्या समस्या असतील तर स्वत:च्या डोक्याने या गोळ्या घेऊ नका. खरं तर डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय गर्भपाताच्या गोळ्या विकणं हा मेडिकल टर्मिनेशन ऑफ प्रेग्नन्सी ॲक्टनुसार गन्हा आहे. अशा गोळ्या विकण्याआधी चिठ्ठीचा फोटो आणि बिलाचं रेकॉर्ड ठेवणं आवश्यक आहे. पण अनेक ठिकाणी सर्रास या गोळ्या विकल्या जातात.

अनावश्यक गर्भधारणा टाळण्यासाठी पुरुषांनी नसबंदी करणं किंवा पुरुषांनी सेक्स करताना कंडोम वापरणं (Use of condom during sex) हा सगळ्यात संरक्षित आणि सोपा उपाय आहे. पण त्याकडे दुर्लक्ष केलं जातं. आपल्या देशात तर प्रत्येक 10 पुरुषांमागे एकच पुरुष कंडोमचा वापर करतो. नसबंदी केल्यास शारीरिक अशक्तपणा येईल किंवा आपल्यातलं पुरुषत्व संपेल किंवा आपण ओझं उचलू शकणार नाही किंवा आपल्याला एखादा आजार होईल असे गैरसमज पुरुषांमध्ये अजूनही सर्रास आहेत. राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षण (NFHS) नुसार फॅमिली प्लॅनिंग करणाऱ्या महिलांची संख्या वाढली आहे. 10 पैकी चार महिला अनावश्यक गर्भधारणा होऊ नये यासाठी ऑपरेशन करून घेतात, पण पुरुषांची संख्या मत्र नगण्य आहे.

संयुक्त राष्ट्रांच्या रिपोर्टनुसार देशात टीनएज प्रेग्नन्सीच्या प्रमाणात 1 टक्का घट झाली आहे. तरीही यावर अजून भरपूर काम होणं गरजेचं आहे. आता 15 ते 19 वर्षांमधील मुलीही गर्भवती राहण्याचं प्रमाण वाढलं आहे. 1000 मुलींमधील 43 इतकं हे प्रमाण आहे. त्यामुळे या वयोगटातील मुलींना गर्भधारणेबद्दल, सेक्सबद्दल जागरुक करण्याची, योग्य ती माहिती देण्याची गरज आहे. खरं तर कंडोम वापरल्यास महिलांच्या आरोग्यावरही परिणाम होत नाही. पण प्रत्यक्षात महिलांना गर्भनिरोधक गोळ्या किंवा गर्भपातासारखी पावलं उचलावी लागतात. त्यामुळे या विषयामध्ये सर्वच स्तरांवर जागरुकता करण्याची गरज आहे.

First published:

Tags: Sex education