अप्सरा रेड्डी असे त्यांचं नाव आहे. तामिळनाडूच्या AIADMK पक्षाच्या त्या जहाल नेत्या असून ट्विटरवर सक्रिय असतात. अलीकडेच तामिळनाडू विधानसभेच्या निवडणुका झाल्या तेव्हा त्या AIADMK च्या स्टार प्रचारक होत्या. त्या जिथे जाईल तिथे गर्दी होत होती. लोकांची त्यांना पाहण्यासाठी झुंबड उडायची. बोलण्यात वाकबगार असलेल्या या नेत्या देशातील अनेक राजकीय पक्षांमध्ये राहिल्या आहेत. देशातील त्या एकमेव राजकीय नेत्या आहेत ज्यांचा प्रवास मुलगा अजयकुमार ते मुलगी अप्सरा असा झाला.
लंडनमध्ये चांगली नोकरी सोडून त्यांनी तामिळनाडूच्या राजकारणात पाऊल ठेवलं. 2016 मध्ये त्यांनी पहिल्यांदा भाजपमध्ये प्रवेश केला. त्यानंतर जयललिता यांनी त्यांना त्यांच्या पक्ष AIADMK मध्ये आणले. त्यांना पक्षाचे प्रवक्ते करण्यात आले. त्यानंतर जानेवारी 2018 मध्ये त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. काँग्रेसने त्यांना पहिले ट्रान्सजेंडर सरचिटणीसपदी बसवले. मात्र, त्यांचा काँग्रेसमधील प्रवास केवळ दोन वर्षांचा होता.
काँग्रेसमध्ये आल्यावर त्यांनी संपूर्ण देशाचे लक्ष वेधून घेतले. राहुल गांधींसोबतचे त्यांचे सर्व फोटो मीडियात प्रसिद्ध झाले. पण दोन वर्षांतच त्यांचा काँग्रेसकडून भ्रमनिरास झाला. त्या पुन्हा AIADMK मध्ये परतल्या. तामिळनाडूमध्ये झालेल्या गेल्या विधानसभा निवडणुकीत त्या त्यांच्या पक्षाच्या स्टार प्रचारक होत्या. त्यांचे भाषण ऐकण्यासाठी मोठी गर्दी होत होती.
अप्सरा यांनी पत्रकारिता आणि प्रसारणाचा कोर्स केला. त्यानंतर त्या लंडनमधील बीबीसी वर्ल्ड सर्व्हिसमध्ये रुजू झाल्या. द हिंदू या दक्षिण भारतातील प्रमुख वृत्तपत्रात त्यांनी काम केलं आहे. राष्ट्रकुल सचिवालयात त्या महत्त्वाच्या पदावर होत्या. यानंतर त्यांना वाटले की असे अनेक मुद्दे आहेत, ज्यासाठी त्यांनी राजकारणात यावे. तसे एक पत्रकार म्हणून त्यांनी अमिताभ बच्चन ते एआर रहमान आणि हॉलिवूड स्टार निकोलस केजसह अनेक सेलिब्रिटींच्या मुलाखतीही घेतल्या आहेत.
एक काळ असा होता की हा समाज त्यांना तुच्छ लेखत होता. अप्सरा रेड्डी मुलापासून मुलगी कशी झाली? चला त्यांचा प्रवास जाणून घेऊ.
आंध्र प्रदेशातील नेल्लोर येथे जन्मलेल्या अप्सरा रेड्डी यांचे खरे नाव अजय रेड्डी होते. अप्सरा रेड्डी यांनी थायलंडमधील येन या हॉस्पिटलमध्ये लिंग बदल करून घेतला. त्यांच्यावर डॉ. सोंभुन थामरुंगरंग यांनी शस्त्रक्रिया केली. अप्सरा यांना पहिले 3 महिने देखरेखीखाली ठेवण्यात आले होते. त्या 8 महिने बँकॉकमध्ये राहिल्या आणि त्यानंतर त्यांची शस्त्रक्रिया झाली.
अप्सरे यांची शस्त्रक्रिया 8 तासांपेक्षा जास्त चालली. त्यानंतर त्यांना दोन तास निरीक्षणाखाली ठेवण्यात आले होते. जेव्हा अप्सरा शुद्धीवर आल्या तेव्हा त्यांना खूप वेदना होत होत्या. तरीही त्या आनंदी होत्या. अप्सराच्या या निर्णयाला तिच्या आईने साथ दिली पण तिचे वडील ऑपरेशनमुळे खूप संतापले. शस्त्रक्रियेनंतर पुढील 4 दिवस अप्सरा रुग्णालयातच राहिल्या, त्यानंतर त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. हार्मोन थेरपीदरम्यान त्यांच्या मनात अनेकदा आत्महत्येचे विचार यायचे.
अप्सरा यांना लहानपणापासूनच वाटायचे की त्यांना पुरुषाचं शरीर मिळालं असलं तरी त्या आतून महिला आहेत. अप्सरा यांना लिंग बदलण्यापूर्वी अनेक समस्यांना सामोरे जावे लागले आहे. शाळा-कॉलेजपासून ते कार्यालयापर्यंत भेदभावही त्यांनी सहन केला आहे. अप्सरा यांनी एक तमिळ शो देखील होस्ट केला आहे.