आपल्या वेगवेगळ्या प्रकारचे टॅक्स म्हणजेच कर आकारले जातात. मात्र, जगात असे अनेक देश आहेत, जिथे कोणत्याही प्रकारचा टॅक्स आकारला जात नाही.
ओमान देशातील नागरीकांना कोणत्याही प्रकारचा टॅक्स द्यावा लागत नाही. सरकार निर्यातीतून उत्पन्न मिळवून देश चालवते.
बर्मुडा हा ब्रिटीश सरकारच्या अधीन असलेला छोटासा प्रदेश आहे. येथे आयकर टॅक्स नाही. फक्त सोशल सिक्योरिटी, प्रॉपर्टी टॅक्स आणि कस्टम ड्युटी द्यावी लागते.
सौदी अरेबियातील नागरीक कर देत नाहीत. येथील सरकार गॅस आणि तेल निर्यातीतून पैसा कमवते. मात्र, जनता सिक्योरिटी पेमेंट्स आणि कॅपिटल गेन टॅक्स आवश्यक आहे.
कॅमेन हा देखील ब्रिटीश सरकारच्या अधीन असलेलं बेट आहे. येथील नागरीक टॅक्स देत नाही. पण, नागरीक सोशल सिक्योरिटी टॅक्स देऊ शकतात.
श्रीमंत देशांच्या यादी असणाऱ्या कतारमध्येही नागरीक टॅक्समुक्त आहेत. येथे तेल आणि गॅस मुबलक प्रमाणात आहे.
पर्यटनातून बहामास सरकार प्रचंड पैसा कमावते. त्यामुळे नागरीकांना टॅक्स देण्याची गरज पडत नाही. येथे फक्त आयात कर, विमा आणि मालमत्ता कर द्याला लागतो.
बहारीन देशातही नागरीक टॅक्स देत नाहीत. फक्त स्टँप ड्युटी, रिअल इस्टेट ट्रान्सफरवर कर द्यावा लागतो.
मोनाको ह्या जगातील छोट्या देशातही नागरीक कोणताही कर देत नाहीत. येथे आयकर आणि कॅपिटल टॅक्स द्यावा लागत नाही.