मराठी बातम्या /बातम्या /explainer /आताच्या युक्रेनमध्येच घडली होती सर्वात भयंकर दुर्घटना, कित्येक वर्षानंतरही जाणवतायेत परिणाम

आताच्या युक्रेनमध्येच घडली होती सर्वात भयंकर दुर्घटना, कित्येक वर्षानंतरही जाणवतायेत परिणाम

चेर्नोबिल दुर्घटना (nuclear disaster at chernobyl) ही अणुप्रकल्प योग्यरित्या हाताळला गेला नाही तर किती मोठा विनाश होऊ शकतो याची कायम जाणीव करुन देणार घटना आहे.

चेर्नोबिल दुर्घटना (nuclear disaster at chernobyl) ही अणुप्रकल्प योग्यरित्या हाताळला गेला नाही तर किती मोठा विनाश होऊ शकतो याची कायम जाणीव करुन देणार घटना आहे.

चेर्नोबिल दुर्घटना (nuclear disaster at chernobyl) ही अणुप्रकल्प योग्यरित्या हाताळला गेला नाही तर किती मोठा विनाश होऊ शकतो याची कायम जाणीव करुन देणार घटना आहे.

कीव, 26 एप्रिल : सोव्हिएत युनियनचे भाग असलेले रशिया आणि युक्रेन (Russia Ukraine war) यांच्यात सध्या घनघोर युद्ध सुरू आहे. पण, याच भूमिवर कधीकाळी इतकी भयंकर घटना घडली होती, की आजही त्याचे परिणाम पहायला मिळतात. 26 एप्रिल 1986 हा देखील इतिहासातील काळा दिवसांपैकी एक आहे. या दिवशी चेर्नोबिल अणु प्रकल्पात इतिहासातील सर्वात भीषण दुर्घटना (nuclear disaster at chernobyl) घडली. पहिल्याच दिवशी 32 लोकांचा तात्काळ मृत्यू झाला तर डझनभर लोक किरणोत्सर्गामुळे गंभीरपणे भाजले गेले. सोव्हिएत युनियनने सुरुवातीला ही घटना दाबण्याचा प्रयत्न केला. पण, स्वीडिश अधिकार्‍यांच्या अहवालानंतर असा अपघात झाल्याचे मान्य केले.

चेर्नोबिल स्टेशन कुठं होतं?

चेर्नोबिल पॉवर स्टेशन युक्रेनची राजधानी कीवच्या उत्तरेस सुमारे 130 किमी अंतरावर प्रिपयेट शहरात होते. त्यावेळी युक्रेन हा सोव्हिएत युनियनचा भाग होता जो सोव्हिएत युनियनच्या विघटनानंतर स्वतंत्र झाला. ते बेलारूस सीमेच्या दक्षिणेस सुमारे 20 किलोमीटर होते. चेर्नोबिल पॉवर स्टेशनमध्ये चार अणुभट्ट्या होत्या. युनिट 1 ची निर्मिती 1970 मध्ये झाली तर युनिट 2 ची निर्मिती 1977 मध्ये झाली. 1983 मध्ये युनिट क्रमांक 3 आणि 4 चे काम पूर्ण झाले. अपघाताच्या वेळी दोन अणुभट्ट्यांचे काम सुरू होते. प्लांटच्या आग्नेय बाजूस प्रिपयेट नदीजवळ एक कृत्रिम तलाव तयार केला गेला. प्लांटला थंड पाणी देण्यासाठी हा तलाव तयार करण्यात आला होता. युक्रेनच्या या भागात लोकसंख्या खूपच कमी होती. अणुभट्टीपासून सुमारे 3 किलोमीटर अंतरावर नवीन स्थायिक झालेले शहर Pripyat होते. तेथे सुमारे 49,000 लोक राहत होते. चेर्नोबिलच्या जुन्या शहरात 12,500 लोक राहत होते. पॉवर प्लांटच्या 30 किमी परिसरात अपघात झाला त्यावेळी एकूण लोकसंख्या सुमारे 1.5 लाख होती.

काय घडलं त्या दिवशी?

26 एप्रिलला अणु प्रकल्पात चाचणी होणार होती. त्यामध्ये पॉवर प्लांटच्या बिघाड स्थितीशी संबंधित चाचणी केली जाणार होती. अशावेळी वीजपुरवठा खंडित झाल्यास अन्य उपकरणे सुरू राहतील का, हे पाहावे लागणार होते. टर्बाइन किती काळ फिरेल आणि त्या स्थितीत वीज पुरवठा करेल का? हे त्याला शोधायचे होते. त्यांना हे जाणून घ्यायचे होते की अणुभट्टी थंड ठेवणारे कुलिंग पंप आणि इतर उपकरणे चालवण्यासाठी ती वीज किती काळ वापरली जाऊ शकते. 25 एप्रिलपासून परीक्षेची तयारी सुरू झाली. दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास टर्बाइन नियंत्रित करणारा किंवा थांबवणारा व्हॉल्व्ह काढण्यात आला. त्यानंतर आपत्कालीन परिस्थितीत रिअॅक्टर थंड ठेवणारी यंत्रणाही बंद करण्यात आली. अणुभट्टीला एक स्वयंचलित स्विच बसवलेला आहे जो आणीबाणीच्या परिस्थितीत अणुभट्टीच्या आत अणुविखंडनाची प्रक्रिया थांबवतो. लगेच तो स्विचही बंद झाला. त्यानंतर अचानक अणुभट्टीतील अणुविखंडनाची प्रक्रिया नियंत्रणाबाहेर गेली.

काय होतं कारण?

रिपोर्ट्सनुसार, याचे कारण रिअॅक्टरची सदोष रचना आणि कंट्रोल रॉडमधील कमतरता आहे. विखंडनातून निर्माण होणारी उष्णता नियंत्रित करण्यासाठी पाण्याचा वापर केला जातो. विखंडन प्रक्रियेदरम्यान निर्माण होणारे अतिरिक्त न्यूट्रॉन पाणी शोषून घेते जेणेकरून प्रक्रिया अनियंत्रित होणार नाही. पाण्याच्या आत वाफेचा फुगा तयार होत राहतो. सामान्यतः सध्या अस्तित्वात असलेल्या अणुभट्टीच्या डिझाईनमध्ये वाफेचे फुगे जास्त असल्यास विखंडन प्रक्रिया मंदावण्याची यंत्रणा असते.

Russia Ukraine War: रशियाची मोठी खेळी, अमेरिका- ब्रिटेनकडून युक्रेनला मिळालेली मदत केली उद्धवस्त

पण, चेर्नोबिल अणुभट्टीची एक कमतरता होती. त्यात जितके अधिक बुडबुडे तितकी विखंडन प्रक्रिया जलद. दुसरीकडे, त्याच्या कंट्रोल रॉडचाही अभाव होता. अणु संयंत्रामध्ये अणुविखंडन प्रक्रियेद्वारे ऊर्जा तयार केली जाते. अणुविखंडन प्रक्रियेत नवीन न्यूट्रॉन तयार होतात. अतिरिक्त न्यूट्रॉन शोषून घेण्यासाठी कंट्रोल रॉडचा वापर केला जातो. अतिरिक्त न्यूट्रॉन नियंत्रित न केल्यास, विखंडन प्रक्रिया नियंत्रणाबाहेर जाईल आणि प्रचंड प्रमाणात ऊर्जा निर्माण होईल, जी अणुभट्टीमध्ये शक्तिशाली स्फोट होण्यापासून रोखू शकत नाही. रिपोर्टनुसार, चेर्नोबिलमध्ये वापरण्यात आलेल्या रॉडचीही कमतरता होती. अपघातानंतर केलेल्या तपासातही रॉडचा वापर व्हायला हवा होता त्यापेक्षा कमी झाल्याचे समोर आले आहे. त्यामुळे अणुभट्टीतील विखंडन प्रक्रिया नियंत्रणाबाहेर गेली.

वाफ वेगाने तयार होऊ लागली, ज्यामुळे अणुभट्टीच्या आत दाब वाढला. यामुळे थोड्याच वेळात दोन शक्तिशाली स्फोट झाले, ज्यामुळे संपूर्ण वातावरणात किरणोत्सारी पदार्थ पसरले. हा स्फोट इतका शक्तिशाली होता की अणुभट्टी आणि त्यावरील छत झाकणाऱ्या हजार टनांहून अधिक प्लेट्स फाटल्या. रिअॅक्टरमध्ये वापरण्यात आलेल्या इंधनाच्या रॉडचा स्फोट झाला. रॉड्स हवेत खूप उंचावर फेकल्या गेल्या, ज्यामुळे वातावरणात किरणोत्सर्गी सामग्री पसरली.

नुकसान

सुरुवातीला चेर्नोबिलमध्ये 32 लोक मरण पावले आणि रेडिएशनमुळे डझनभर भाजले गेले. मग हे रेडिएशन म्हणजेच किरणोत्सर्गी घटक आजूबाजूच्या संपूर्ण वातावरणात पसरले. हिरोशिमा आणि नागासाकीवर टाकलेल्या अणुबॉम्बने जेवढे रेडिएशन तयार केले नव्हते त्यापेक्षा कितीतरी पट जास्त रेडिएशन तयार झाले होते. वाऱ्यामुळे किरणोत्सर्गी घटक उत्तर आणि पूर्व युरोपमध्ये पसरले. या किरणोत्सर्गामुळे झालेल्या कर्करोगाने नंतर सोव्हिएत युनियनमधील सुमारे 5,000 नागरिकांचा मृत्यू झाला. लाखो लोकांच्या आरोग्यावर वाईट परिणाम झाला. 2000 मध्ये, चेर्नोबिलमधील शेवटच्या कार्यरत अणुभट्ट्या देखील बंद करण्यात आल्या.

27 एप्रिल रोजी सोव्हिएत प्रशासनाने प्रिपयेटमधील रहिवाशांना बाहेर काढण्यास सुरुवात केली. सुरुवातीला या प्रकरणावर पडदा टाकण्याचा प्रयत्न सोव्हिएत युनियनकडून करण्यात आला. पण किरणोत्सर्ग हवेत पसरला असल्याने ते लपविणे अवघड होते. रेडिएशन आणि राख स्वीडनच्या रेडिएशन मॉनिटरिंग स्टेशनवर पोहोचली. ते चेर्नोबिलपासून सुमारे 800 मैल होते. हवेत सामान्यपेक्षा 40 टक्के जास्त रेडिएशन आढळून आल्याने स्वीडिश अधिकारी सावध झाले. मग हे रेडिएशन कुठून आले याचा तपास स्वीडनने केला. स्वीडनने मॉस्को सरकारला अपघात झाला का असे विचारले असता सोव्हिएत युनियनने ते मान्य केले.

First published:

Tags: Ukraine news